नवकल्पनांनी प्रेरित, अनुभव संपन्न मार्गदर्शन
आमचा बोर्ड आठ डायरेक्टर्सची एक निपुण टीम आहे, उद्योजकीय जगताचा व्यासंगी अनुभव आणि अष्टपैलू कार्य निपुणता आमच्या निर्णय प्रक्रियेचा आधार ठरते.
श्री. वेणु श्रीनिवासन हे एक कार्य निपुण अभियंता आहेत आणि यूएसए स्थित पर्ड्यू विद्यापीठातून व्यवस्थापशास्त्रात पदवी संपादित केली आहे. वर्ष 1979 मध्ये त्यांनी सुंदरम-क्लेटन या टीव्हीएस मोटरच्या होल्डिंग कंपनीचे सीईओ म्हणून पदभार स्वीकारला आणि भारतातील दुचाकी उद्योग जगतात क्रांती घडवून आणण्याचं सर्वोपतरी श्रेय त्यांच्या नावावर आहे. त्यांनी भारतातील संयुक्त उपक्रम आणि नवीन पिढीच्या दुचाकींचा परिचय करून दिला. त्यामुळे भारतीय कंपन्यांना जागतिक दर्जाचे बनण्याचा आणि उत्कृष्टतेची वचनबद्धता आणि नाविन्यपूर्ण संस्कृती आत्मसात करून अपवादात्मक उत्पादने तयार करण्याचा मार्ग प्रशस्त झाला. वर्ष 2014 मध्ये कोरिया गणराज्याच्या अध्यक्षांकडून ऑर्डर ऑफ डिप्लोमॅटिक सर्व्हिस मेरिट, वर्ष 2004 मध्ये अखिल भारतीय व्यवस्थापन संघटनेकडून जेआरडी टाटा कॉर्पोरेट लीडरशिप पुरस्कार आणि वर्ष 2010 आणि 2020 मध्ये भारताच्या राष्ट्रपतींकडून अनुक्रमे पद्मश्री आणि पद्म भूषण पुरस्कार यासह अनेक प्रशंसा आणि पुरस्कार मिळाले आहेत. वर्ष 2019 मध्ये टोटल क्वालिटी मॅनेजमेंट (टीक्यूएम) मधील त्यांच्या योगदानाबद्दल डेमिंग ‘डिस्टींग्विश्ड सर्व्हिस अॅवॉर्ड फॉर डिसिमिनेशन अँड प्रमोशन ओव्हरसीज’ प्राप्त करणारे ते पहिले भारतीय उद्योगपती ठरले आहेत. सध्या, श्री. श्रीनिवासन टीव्हीएस मोटर कंपनीचे मानद अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
श्री. सुदर्शन वेणु यांनी यू.एस. मधील पेन्सिल्व्हेनिया विद्यापीठातील 'जेरोम फिशर प्रोग्राम इन मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी' मधून ऑनर्स पदवी संपादित केली आहे. त्यांनी पेन्सिल्व्हेनिया विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनीअरिंगमधून यांत्रिक अभियांत्रिकीमध्ये विज्ञान आणि व्हार्टन स्कूलमधून अर्थशास्त्र विषयात विज्ञान पदवी प्राप्त केली आहे, याव्यतिरिक्त, त्यांनी युनायटेड किंगडममधील वॉर्विक विद्यापीठाच्या वॉर्विक मॅन्युफॅक्चरिंग ग्रुपमधून आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी संपादित केली. त्यांच्या मास्टर्स प्रोग्राम दरम्यान, श्री. वेणु यांनी सुंदरम-क्लेटन लिमिटेड आणि टीव्हीएस मोटर कंपनी लिमिटेडच्या डाय कास्टिंग विभागामध्ये प्रत्यक्ष कार्यानुभव घेतला. टीव्हीएस मोटरचा आफ्रिका, आशियान आणि लॅटिन अमेरिकेत आंतरराष्ट्रीय विस्तार करण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. फोर्ब्स इंडिया या अग्रगण्य व्यावसायिक मासिकाने श्री वेणु यांना इंडिया इंक. चे जेननेक्स्ट लीडर म्हणून गौरव केला आहे. ते सध्या टीव्हीएस मोटर कंपनी लिमिटेड आणि टीव्हीएस होल्डिंग्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत.
वर्ष 1984 मध्ये, श्री. राधाकृष्णन यांनी ग्रुप मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीला आरंभ केला. वर्ष 1984 ते 1995 पर्यंत, त्यांनी सुंदरम-क्लेटन लिमिटेड मध्ये विविध पदे भूषवली,या दरम्यान ब्रेक्स डिव्हिजनने डेमिंग ॲप्लिकेशन प्राईझ आणि जपान क्वालिटी मेडल वर नाव कोरले. त्यानंतर, वर्ष 2000 मध्ये, श्री. राधाकृष्णन टीव्हीएस मोटर कंपनीमध्ये बिझनेस प्लॅनिंगचे प्रमुख म्हणून सहभागी झाले आणि ऑगस्ट 2008 पासून कंपनीचे सीईओ म्हणून कार्यरत आहेत.
श्री. बी. श्रीराम हे उल्लेखनीय कारकीर्द असलेले एक कुशल व्यावसायिक आहेत. ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स (पूर्वीचे इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ बँकर्स), मुंबईचे सर्टिफाईड असोसिएट आहेत आणि त्यांनी इंडियन अकॅडमी ऑफ इंटरनॅशनल लॉ अँड डिप्लोमसी, नवी दिल्ली येथून आंतरराष्ट्रीय कायदा आणि डिप्लोमसी मध्ये डिप्लोमा, तसेच, ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन, नवी दिल्ली येथून एआयएमए मॅनेजमेंट मधील डिप्लोमा पूर्ण केला आहे. ते ऑनर्स पदवीधर आहेत आणि त्यांनी सेंट स्टीफन्स कॉलेज, दिल्ली विद्यापीठातून भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवी देखील संपादित केली आहे.
त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत, श्री. श्रीराम यांनी जुलै 2014 ते जून 2018 या कालावधीत आयडीबीआय बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक यासह विविध कार्यकारी पदांवर काम केले आहे. डिसेंबर 1981 मध्ये त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये परिविक्षाधीन अधिकारी म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि बँक आणि ग्रुपमध्ये क्रेडिट अँड रिस्क, रिटेल, ऑपरेशन्स, आयटी, ट्रेझरी, इन्व्हेस्टमेंट बँकिंग आणि इंटरनॅशनल ऑपरेशन्स यासारख्या महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या आहेत.
श्री. श्रीराम सध्या आयसीआयसीआय बँकेच्या मंडळावर स्वतंत्र संचालक म्हणून आणि बँकेच्या विविध समितीचे सदस्य/अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. अन्य कंपन्यांच्या मंडळावर स्वतंत्र संचालक म्हणूनही काम करतात. याव्यतिरिक्त, त्यांनी काही सल्लागार पदावर देखील महत्वाच्या भूमिका बजावल्या आहेत.
श्री. आर. गोपालन हे एक जाणकार आणि कुशल व्यक्ती आहेत ज्यांनी भारतातील आर्थिक क्षेत्राच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. ते एक अनुभवी व्यक्ती आहेत ज्यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक उल्लेखनीय पदे भूषवली आहेत. ते सध्या पंतप्रधानांच्या नियंत्रणाखाली येणाऱ्या सार्वजनिक उपक्रम निवड मंडळाचे (पीईएसबी) सदस्य म्हणून काम करतात. पीईएसबी मधील त्यांच्या भूमिकेपूर्वी, श्री. गोपालन यांनी जुलै 2012 मध्ये सेवानिवृत्ती होईपर्यंत भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव म्हणून काम केले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी जी-20 बैठका, एडीबी, जागतिक बँक आणि आयएमएफ बैठकांसह विविध आंतरराष्ट्रीय मंचांमध्ये भारताचे प्रभावीपणे प्रतिनिधित्व केले. त्यांनी भांडवली बाजाराच्या कार्यात अनेक बदल केले आणि पायाभूत सुविधांमध्ये नवीन धोरण उपाय सुरू केले. आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव म्हणून काम करण्यापूर्वी, श्री गोपालन यांनी वित्त मंत्रालयाच्या आर्थिक सेवा विभागाच्या सचिवाची भूमिका पार पाडली, जिथे त्यांनी बँकिंग, इन्श्युरन्स आणि पेन्शन सुधारणांचे पर्यवेक्षण केले. या भूमिकेत, त्यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँका (पीएसबी), इन्श्युरन्स कंपन्या आणि विकास आर्थिक संस्थांना (डीएफआय) धोरण मार्गदर्शक तत्त्वे, विधायी आणि इतर प्रशासकीय बदलांद्वारे समर्थन दिले, त्यांच्या कामगिरीचे परीक्षण केले आणि एनबीएफसी, खाजगी बँका आणि परदेशी बँकांसाठी धोरणे तयार केली. त्यांनी उद्योग, बँका आणि आर्थिक संस्था यांच्यात समन्वय साधला आणि व्यापार वाटाघाटींसाठी डब्ल्यूटीओ च्या विविध मंत्रीस्तरीय बैठकांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. श्री. गोपालन यांनी बोस्टन विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी आणि जॉन एफ केनेडी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, हार्वर्ड विद्यापीठातून सार्वजनिक प्रशासन आणि व्यवस्थापन विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.
श्रीमती उडानकट या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या विधिज्ज्ञ आहेत. कॉर्पोरेट आणि एम अँड ए लॉ मध्ये विशेष तज्ज्ञता मिळविली आहे. आपल्या वकिली विषयक कामकाजात जागतिक दृष्टीकोनाचा अवलंब केला आहे. त्या बॉम्बे इनकॉर्पोरेटेड लॉ सोसायटी आणि लॉ सोसायटी ऑफ इंग्लंड अँड वेल्स सह नोंदणीकृत सॉलिसिटर आहेत. दोन दशकांहून अधिक कायदेशीर अनुभवासह, ते क्लायंट आणि बोर्डसाठी धोरणात्मक सल्लागार आहेत, विशेषत: एम अँड ए आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स तत्त्वांमध्ये त्यांच्या कौशल्यासाठी मान्यताप्राप्त.
श्रीमती उनाडकट यांनी कॉर्पोरेट गव्हर्नन्स, नेतृत्व, संघटनात्मक वातावरण आणि निर्णय घेण्यावर लक्ष केंद्रित करून बोर्डाला प्रभावशील कार्याच्या बाबत मार्गदर्शन केले आहे. या संदर्भात, त्यांनी अनेक कार्यशाळांचे नेतृत्व केले आहे आणि डायरेक्टर डेव्हलपमेंट साठी सर्वसमावेशक दृष्टीकोनासह 300 पेक्षा जास्त डायरेक्टरला प्रशिक्षित केले आहे. इरिस मधील या जबाबदारी सोबतच त्यांनी अनेक पब्लिक कंपन्यांच्या (लिस्टेड आणि अनलिस्टेड) बोर्डवर इंडिपेंडंट डायरेक्टर म्हणून सेवा बजावली आहे.
त्या “वुमेन ऑन बोर्ड” रिसर्च प्रकल्पात सह-लेखक म्हणून भूमिका बजावली आहे आणि भारतातील कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि एम अँड ए डील्स बाबत माध्यमात अभ्यासपूर्ण भाष्य करतात
डॉ. दीपाली पंत जोशी या डॉक्टरेट आहेत, त्यांनी अलाहाबाद युनिव्हर्सिटीतून मास्टर्स डिग्री प्राप्त केली आहे, लखनऊ युनिव्हर्सिटीतून लॉ ग्रॅज्यूएट आहेत आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटीने हार्वर्ड युनिव्हर्सिटी हार्वर्ड एशिया सेंटर पोस्ट-डॉक्टरल वर्क इन फायनान्स अँड इकॉनॉमिक्स (आरबीआयच्या सेकंडमेंट नुसार) पूर्ण केले आहे. त्यांच्याकडे मॅक्रो-इकॉनॉमिक्स पॉलिसीजच्या निर्मितीचा चार दशकांहून अधिक अनुभव आहे. डॉ. दीपाली पंत जोशी 1981 मध्ये डायरेक्ट रिक्रूट ग्रेड B ऑफिसर म्हणून सहभागी झाल्या आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून दीर्घ आणि प्रतिष्ठित करिअर नंतर निवृत्त झाल्या. त्यांनी डिपार्टमेंट ऑफ रूरल प्लॅनिंग आणि क्रेडिट अँड फायनान्शियल इन्क्ल्युजन डिपार्टमेंट आणि कस्टमर सर्व्हिस अँड फायनान्शियल एज्यूकेशन डिपार्टमेंट सह आरबीआय मधील विविध डिपार्टमेंट्सचे नेतृत्व केले. आरबीआय सोबत त्यांच्या प्रदीर्घ करिअर दरम्यान, त्यांनी काही महत्त्वाच्या पदांवर देखील काम केले होते जसे:
त्यांनी चिफ जनरल मॅनेजर इनचार्ज रूरल प्लॅनिंग क्रेडिट डिपार्टमेंट, प्लॅनिंग कमिशन, सरकारी प्रायोजित योजनांच्या तर्कसंगतीकरणावरील मेंबर 12th प्लॅन ग्रुप, मायक्रोफायनान्स सेक्टर मधील हित आणि चिंता विषयी मालेगाम कमिटी, स्मॉल बिझनेस आणि कमी उत्पन्न असणारी कुटुंबे यांच्यासाठी सर्वसमावेशक सर्व्हिसेस वरील कमिटी आणि फायनान्शियल इन्क्ल्युजन आणि पेमेंट सिस्टीम एक्स्पर्ट ग्रुप वरील G-20 इंडिया एक्स्पर्ट म्हणून इतर महत्त्वाच्या असाईनमेंट देखील हाताळल्या आहेत.
त्यांची अर्थशास्त्र, आर्थिक समावेशन आणि शाश्वत विकास या विषयावरील विविध पुस्तके प्रकाशित आहे.
श्री. टी.सी.सुशील कुमार हे लाईफ इन्श्युरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी) मधून जानेवारी 2021 मध्ये मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. जवळपास चार दशकांचे त्यांचे समृद्ध करिअर ठरले आहे. आपल्या कार्यकाळाच्या दरम्यान, श्री. कुमार यांनी एलआयसी मध्ये विविध पदांवर मोठी भूमिका बजावली. ज्यामध्ये मॅनेजिंग डायरेक्टर, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि झोनल मॅनेजर म्हणून भारत तसेच परदेशात आपली सेवा बजावली. त्यांनी मार्केटिंग, सीआरएम, एचआर, फायनान्स, ऑडिट, कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि इन्व्हेस्टमेंट यासारख्या प्रमुख डिपार्टमेंटचे व्यवस्थापन केले आणि मॉरिशसमध्ये एलआयसीच्या परदेशी कामकाजाचे नेतृत्व केले.
श्री कुमार हे विश्लेषण आणि स्ट्रॅटेजिक बिझनेस प्लॅनिंगच्या सखोल ज्ञानासाठी ओळखले जातात, त्यांच्या मार्गदर्शनाखाली एलआयसीला पहिल्या वर्षाच्या प्रीमियम इन्कम आणि मार्केट लीडरशीप ग्रोथ मध्ये महत्वपूर्ण टप्पे गाठण्यास मदत झाली. त्यांनी मिलेनियल्सना लक्ष्य करीत मार्केट रिसर्च प्रोग्रामची सुरूवात केली, परिणामी 2020-21 मध्ये 100,000 पेक्षा जास्त नवीन एजंट्स जोडले गेले. त्यांनी रिअल-टाइम ऑटोमेटेड बिझनेस डाटा संकलन आणि विश्लेषण यांची देखील अंमलबजावणी केली, धोरणात्मक निर्णयक्षमता वाढवली.
एलआयसी मधील त्यांच्या जबाबदारीच्या व्यतिरिक्त श्री. कुमार यांनी ॲक्सिस बँक लिमिटेड, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लिमिटेड, लक्ष्मी मशीन वर्क्स आणि नॅशनल म्युच्युअल फंड (मॉरिशस) सह अनेक प्रमुख कंपन्यांच्या बोर्ड वर आपली सेवा प्रदान केली आहे. सध्या ते मनप्पुरम फायनान्स लिमिटेड, फिलिप्स कार्बन ब्लॅक लिमिटेड आणि फर्स्ट सोर्स सोल्यूशन्स लिमिटेडच्या बोर्डवर इंडिपेंडंट डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत.
साईन-अप करा आणि मिळवा नवीन अपडेट्स आणि ऑफर्स