नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी म्हणून, आम्ही भारतीयांना मोठे स्वप्न बघण्यास सक्षम बनवण्याचे आणि सर्ववेळ,सर्वकाळ आमचे फायनान्शियल प्रॉडक्ट्स प्रदान करून त्यांच्या आकांक्षांच्या पूर्तीसाठी सहकार्यात्मक भागीदारीचे उद्दिष्ट बाळगतो. आमचा उद्देश भारतीयांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि फायनान्शियल समावेशनात प्रगती करण्यासाठी योगदान देणाऱ्या अनुरूप प्रॉडक्ट्ससह सक्षम बनविण्याचे आहे. ब्रँड म्हणून, आमच्याकडे विश्वास, मूल्य आणि सेवेचा समृद्ध वारसा आहे. जो 129 देशांमध्ये कार्यरत असलेल्या भारतातील ऑटोमोटिव्ह कम्पोन्टटंच्या अग्रगण्य पुरवठादारांपैकी एक असलेल्या 113 वर्षांच्या जुन्या टीव्हीएस ग्रुप मधील आमच्या विश्वासार्ह वारसाकडून घेतला आहे.
प्रत्येक भारतीयाच्या आकांक्षाची पूर्ती करण्याच्या मिशन सह आमच्या प्रवासाला वर्ष 2010 मध्ये आरंभ झाला. विविध अडथळ्यांवर मात करीत आजवर अनेक यशाचे मापदंड गाठले आहे.
आमचे व्हिज्युअल नेमोनिक 'अस्पायरमार्क', उर्ध्व दिशेने उड्डाण चिन्हांकित करते. जे विकास आणि आशावाद यांचे प्रतीक आहे आणि एक ब्रँड म्हणून टीव्हीएस क्रेडिट द्वारे आपल्या कस्टमर्स साठी सर्व आकांक्षांच्या पूर्ती साठी स्वप्नांच्या उड्डाणांना चिन्हांकित करतो.
आमचा वर्डमार्क ठळक, आत्मविश्वासपूर्ण आहे आणि ज्यामधून आमची भविष्यातील दमदार वाटचाल प्रतीत होते.
आमच्या ब्रँड मध्ये निळा आणि हिरवा रंगाचा समावेश आहे. आमच्या पॅरेंट ग्रुपच्या आयडेंटिटी मधून निळा रंग प्राप्त असून त्याद्वारे स्वातंत्र्य, प्रेरणा, आत्मविश्वास आणि स्थैर्य सूचित होते. दुसऱ्या बाजूला, हिरव्या रंगातून विकास, सुसंवाद आणि नूतनीकरण सूचित होते.
आम्ही नेहमीच विश्वास जपण्याचा प्रयत्न करतो. आमच्या कृतीतून आमच्या कस्टमरचा विश्वास जिंकतो.
आम्ही दृष्टीकोनात सर्जनशीलता जोपासतो. अडथळ्यांवर मात करण्यासाठी नावीन्यता आणि सर्वोत्तम उपायांचे सहाय्य घेतो.
क्रियाशीलता आमच्या कार्यप्रणालीचा आधार आहे. ज्याद्वारे आम्हाला कस्टमरच्या गरजांचे आकलन करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते.
आम्ही कस्टमरच्या गरजांप्रती सहानुभूती बाळगतो आणि त्यांची विशिष्ट परिस्थिती जाणून घेण्यासाठी प्रयत्नशील असतो.
'सर्वकाही शक्य' असल्याचं तत्वज्ञान आम्ही मानतो आणि कृतीत परावर्तित करण्यासाठी कटिबद्धता जोपासतो.