"पैसे कमविण्यासाठी पैसे लागतात" ही जुनी म्हण तंतोतंत खरी आहे.
मर्यादित भांडवलासह लघु बिझनेस चालवणे सोपे काम नाही. तुम्ही क्रेडिटवर विक्री करतानाही तुम्हाला कच्च्या मालासाठी, वाहतूक आणि इतर गोष्टींसाठी आगाऊ पेमेंट करणे आवश्यक असते. यादरम्यान, तुमच्या खर्चासाठी देखील फंडिंगची आवश्यकता असेल. कमी भांडवल म्हणजे कामात व्यत्यय! अशा चक्रामध्ये जेव्हा कॅश फ्लो थांबते, तेव्हा तुम्ही काय करू शकता?
प्रतीक्षा करणे म्हणजे वेळ गमावणे आणि बिझनेस संधी गमावणे आणि लोन मिळविण्याचा प्रयत्न करणे यासाठी देखील सिक्युरिटी म्हणून आवश्यक असलेल्या मालमत्ता किंवा मौल्यवान वस्तूंसह अधिक वेळ आवश्यक असेल. अनेक लेंडर पैसे देऊ करतात मात्र त्यांचा इंटरेस्ट रेट नेहमी अव्वाच्या सव्वा असतो! अशा परिस्थितीत, तुम्हाला वाटते ना की:
– जर सिक्युरिटी शिवाय आणि वाजवी इंटरेस्ट रेट्ससह जलद लोन मिळविण्याचा मार्ग असता तर!
आता चांगली बातमी.
अनसिक्युअर्ड लोन उपलब्ध आहे पात्र, विश्वासार्ह कर्जदारांसाठी ज्यांना त्यांचा लघु बिझनेस वाढवण्यासाठी पैसे हवे असतात.
अनसिक्युअर्ड बिझनेस लोन्स म्हणजे काय?
अनसिक्युअर्ड लोन हे तुमच्या क्रेडिट स्कोअरवर आधारित लेंडरच्या विवेकबुद्धीनुसार तुम्हाला दिलेले लोन असते. यासाठी तुम्हाला तारण म्हणून काहीही गहाण ठेवण्याची आवश्यकता नसते. हे एक बिझनेस लोन आहे जे तुम्हाला तात्पुरत्या रोखीच्या संकटातून तारून नेण्यास आणि तुमचा बिझनेस वाढविण्यास मदत करेल. हे परवडणाऱ्या इंटरेस्ट रेट्समध्ये येते आणि जेव्हा तुम्हाला जलदरित्या पैसे हवे असतात आणि तेही कोणत्याही सिक्युरिटी शिवाय तेव्हा हा चांगला पर्याय आहे.
अनसिक्युअर्ड बिझनेस लोन लघु बिझनेसला लाभदायक ठरण्याचे तीन मार्ग?
- जलद लोन मंजुरी आणि डिस्बर्सल: अनसिक्युअर्ड लोन हा तुमच्या बिझनेससाठी पैसे कर्ज घेण्याचा सर्वात जलद मार्ग आहे. तुम्हाला फक्त ऑनलाईन अप्लाय करणे आवश्यक आहे आणि त्वरित मंजुरी मिळते. या प्रोसेसमध्ये खूपच कमी डॉक्युमेंटेशन समाविष्ट आहे आणि कोणतीही दीर्घ प्रक्रिया नाही.
- अंतिम वापरामध्ये सुलभता आणि लवचिकता आहे: अनसिक्युअर्ड लोन्ससह खूप डॉक्युमेंटेशन आणि लोन रक्कम वापराकडे दुर्लक्ष असलेल्या पारंपरिक लोनच्या विरुद्ध, तुम्हाला योग्य वाटणाऱ्या कोणत्याही हेतूसाठी पैसे वापरण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य आहे - तुम्ही त्याचा वापर तुमच्या बिझनेससाठी सामग्री खरेदी करण्यासाठी, अतिरिक्त मार्केटिंग खर्चासह तुमची विक्री वाढविण्यासाठी किंवा युटिलिटी बिल भरण्यासाठी देखील करू शकता. तुमच्या बिझनेसवर खर्च करण्यासाठी पैसे हे तुमचेच आहेत.
- तुमचे बिझनेस ऑपरेशन्स सुरळीत करा: काही वेळा अशा असतात जेव्हा रोखीचा अभाव तुमचा बिझनेस सुरळीत चालविण्यात अडथळा ठरू शकतो. ऑर्डर्समध्ये हंगामी वाढ होऊ शकते किंवा तातडीची ऑर्डर असू शकते ज्यासाठी पैसे त्वरित उभे करणे आवश्यक असते. अनसिक्युअर्ड बिझनेस लोनसह तुम्ही अशा रोखीच्या संकटावर मात करू शकता.
टीव्हीएस क्रेडिट येथील अनसिक्युअर्ड लोन्स बिझनेस मालकाला कोणत्याही चिंता किंवा दीर्घकालीन डॉक्युमेंटेशन आणि प्रक्रियेशिवाय त्यांची पूर्ण क्षमता आणि नफा मिळविण्यास मदत करते.
टीव्हीएस क्रेडिट अनसिक्युअर्ड लोन्सचे फीचर्स
- तुम्ही ₹1 लाख ते 25 लाखांपर्यंत लोन्स घेऊ शकता
- रिपेमेंट कालावधी 3 वर्षांपर्यंत
- आकर्षक इंटरेस्ट रेट
- किमान डॉक्युमेंटेशन
- जलद तत्वतः मंजुरी
डॉक्युमेंटेशन
- ओळखीचा पुरावा, ॲड्रेसचा पुरावा, स्वाक्षरी व्हेरिफिकेशन आणि फोटो यासारखी KYC डॉक्युमेंट्स.
- मागील 12 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
- मागील तीन वर्षांचे तुमचे इन्कम टॅक्स रिटर्न.
थेट अप्लाय करण्यासाठी भेट द्या टीव्हीएस क्रेडिट वेबसाईट, आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.