2018 संपत आले आहे आणि पृथ्वी सूर्याभोवती आणखी एक महत्त्वाच्या घडामोडींनी युक्त अशी प्रदक्षिणा पूर्ण करणार आहे. महान नवकल्पना, प्रगती आणि उलथापालथीचे आणखी एक वर्ष आपण अनुभवले आहे. अनेक सिद्धांत आणि यथास्थिती यापुढे अप्रस्तुत आहेत. ब्लॉकचेन, इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांसारखी तंत्रज्ञान आता 'पुढील मोठी गोष्ट' राहिलेली नाही – ती खरी आहेत आणि आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांची उपस्थिती जाणवत आहे.
हे वर्ष संपत आले आहे आणि 2019 सुरू होणार आहे आणि आपणा सर्वांना आशा आहे की ते आपल्या पेटाऱ्यात यश, आश्चर्य आणि लांब झेपेचा खजिना आणेल. पण, या वर्षी नेमके काय घडणार आहे हे सांगणे कठीण आहे, परंतु काही कौशल्ये आहेत जी या येत्या बारा महिन्यांत आणि पुढेही चांगल्या स्थितीत राहण्यास नक्कीच मदत करतील.
येथे, 2019 मध्ये तुमच्याकडे असणे आवश्यक असलेल्या कौशल्यांची यादी आहे.
- सर्जनशीलता : या लिस्ट मधील अन्य कौशल्यांविषयी सीईओ आणि सल्लागार यांची वैविध्यपूर्ण मते असू शकतात. तरी सर्वांचे निश्चितच एकमत आहे 21व्या शतकामध्ये सर्जनशीलता हे कर्मचाऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचे कौशल्य आहेएसटी-दैनंदिन समस्यांचे निराकरण करण्यासाठी नवीन मार्ग शोधणे किंवा संपूर्णपणे नवीन प्रॉडक्ट, प्रोसेस किंवा प्रतिमान तयार करणे असो, सर्जनशीलतेइतके महत्त्वाचे काहीही नाही. हे केवळ एंटरप्राइझ आणि नवकल्पनांना चालना देणारे इंधनच नाही, तर आपल्या व्हीयूसीए जगात उद्भवणार्या असाधारण परिस्थितींना हाताळण्याची आमची जन्मजात क्षमता देखील आहे.
2030 च्या 85% नोकऱ्या आज अस्तित्वात देखील नाहीत. ही वस्तुस्थिती दर्शवते की नवीन समस्यांवरील उपायांबद्दल जाणून घेणे किती महत्त्वाचे आहे. विभ्रमी दृष्टीकोन आत्तापर्यंत काम करत असेल, परंतु भविष्य या दृष्टिकोनाशी संबंधित नाही कारण भविष्याची मागणी सर्जनशीलतेची आहे. - सहानुभूती: प्रत्येक क्षेत्रातील उद्योगांनी ‘कस्टमर हा राजा’ या म्हणीवर विश्वास ठेवण्यास सुरुवात केली आहे. तथापि, सहानुभूतीची खरी भावना नसताना त्या फक्त पोकळ बाता आहेत.
सहानुभूती असणे हे फक्त दयाळू असण्यापेक्षा अधिक आहे. तुमचे कस्टमर, सहकारी किंवा तुम्ही ज्यांच्याशी संपर्क साधता त्यांच्या दृष्टीकोनातून गोष्टी पाहण्याची क्षमता तुम्हाला एक नवीन आणि फायदेशीर दृष्टीकोन देते. परिणामी, यशस्वी प्रॉडक्ट्स तयार होतात, कर्मचारी प्रेरित होतात आणि प्रभावी संवाद शक्य होतो, या सर्वांमुळे उत्तरलक्षी कस्टमर सर्व्हिस, उत्कृष्ट कर्मचारी संबंध, यूजरला केंद्रस्थानी ठेवून डिझाइन केलेली प्रॉडक्ट्स आणि सर्वत्र आनंद मिळतो. - तंत्रज्ञान साक्षरता: जीवनाच्या प्रत्येक पैलूला संगणकाचा स्पर्श झालेला आहे. डिजिटल क्रांती प्रत्येक उद्योगात पसरली आहे, त्यामुळे तुम्ही प्रोग्रामर किंवा इतर कोणत्याही प्रकारचे तंत्रज्ञ नसले तरीही, आजच्या घडीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या नवकल्पनांसह राहणे पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. नवीन तंत्रज्ञान, ॲनालिटिक्स, बिग डाटा आणि आर्टिफिशियल इंटेलिजंस इत्यादींशी ताळमेळ राखणे, तुम्हाला ते अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास आणि तुमच्या कामाच्या ठिकाणी नवीन बदलांसाठी स्वतःला तयार करण्यात मदत करते. डिजिटलायझेशनमुळे दर काही वर्षांनी अनेक व्यवसाय अचानक अप्रचलित होतात. डिजिटल आघाडीवर स्वतःला अपग्रेड केल्याने तुम्ही कॉर्पोरेट डायनासोर बनण्याची रिस्क नाही याची खात्री होईल.
- शिकण्याची, शिकलेल्या गोष्टी विसरण्याची आणि पुन्हा शिकण्याची क्षमता: एल्विन टॉफलर यांचे एक प्रसिद्ध भाष्य आहे, “21 व्या शतकातील निरक्षर ते नसतील ज्यांना लिहिता-वाचता येत नाही, परंतु ते असतील जे शिकू शकत नाहीत, नवीन गोष्टी शिकण्यासाठी आधीच शिकलेल्या गोष्टी सोडू शकत नाहीत आणि पुन्हा शिकू शकत नाहीत.”
बदलाला विरोध केल्यामुळे अनेक मोठ्या कॉर्पोरेट संस्थांवर परिणाम झाला आहे ज्या त्यांच्या आजूबाजूला होत असलेल्या महत्त्वपूर्ण बदलांची दखल घेण्यात अपयशी ठरल्या किंवा ज्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. कार्य करण्याच्या जुन्या पद्धती आता संबंधित नाहीत. तुम्ही नेमकी बदलाची दिशा जाणून घेणे आणि त्यानुसार स्वत: मार्गक्रमण करणे निश्चितच महत्वाचे आहे. तुमचे सहकारी, स्पर्धक आणि उद्योगावर सतत लक्ष ठेवा, जेणेकरून तुम्ही बदलांशी झटपट जुळवून घेऊ शकाल आणि त्यांचा जास्तीत जास्त लाभ घेऊ शकाल.
- विविधतेची प्रशंसा : वर्कफोर्स आता प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सीमांच्या पलिकडे जात असल्यामुळे, तुमचे सहकारी तुमच्यापेक्षा वेगळ्या राष्ट्रीयत्वाचे, संस्कृतीचे आणि धर्माचे असण्याची अधिक शक्यता आहे. 21व्या शतकामधील टीमएसटी केवळ क्रॉस-फंक्शनल नाहीत; त्या वेगवेगळ्या भौगोलिक आणि सांस्कृतिक अडथळ्यांना न जुमानता त्यांचा प्रभाव पाडतात आणि डिझाईननुसार - ही विविधता नवीन दृष्टीकोन आणि अंतर्दृष्टी आणते. विविधतेची प्रशंसा करण्यासाठी आणि आत्मसात करण्यासाठी स्वत:ला तयार केल्याने तुम्हाला आजच्या बहुसांस्कृतिक कामाच्या ठिकाणी भरभराट करण्यास मदत होईल.
- समतोल वृत्ती: बदल सतत वेगाने घडत असल्याने, त्याबरोबर जुळवून घेण्याचे तुमचे प्रयत्न नेहमीच फळ देणार नाहीत हे स्वाभाविक आहे. एका म्हणीत म्हटल्याप्रमाणे, तुम्ही काही जिंकता, काही हरता. पण महत्त्वाचे म्हणजे तुम्ही यशाला तुमच्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका, कारण ते आत्मसंतुष्टतेचे बीज पेरते किंवा तुमच्या अपयशामुळे निराश होऊ नका, कारण ते तुम्हाला पुन्हा प्रयत्न करण्यापासून परावृत्त करते. तुमच्या वाट्याला येणाऱ्या प्रत्येक अनुभवातून शिका आणि तुम्ही काल होता त्यापेक्षा आज स्वतःला चांगले बनवण्याचा प्रयत्न करा.
- फोकस: आपल्या स्मार्टफोन्सवरील मेसेजिंग ॲप्सच्या सततच्या सूचनांपासून ते सोशल मीडिया ॲप्सद्वारे झटपट संतोषाच्या जवळजवळ अप्रतिम आकर्षणापर्यंत, जग तुमचे लक्ष आणि एकाग्रता विचलित करण्यासाठी अनेक बाधांनी भरलेले आहे, ज्यामुळे टाळाटाळ करण्याची सवय लागते. बर्याचदा आपण आपले ध्येय विसरतो आणि अनावश्यक गोष्टींमध्ये अडकतो ज्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नसते. नेहमी लक्षात ठेवा की योग्य गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे ही यशस्वी करिअर आणि जीवनाची गुरुकिल्ली आहे आणि जेव्हा तुम्ही तुमच्या प्राधान्यांची जाणीव ठेवता तेव्हा तुम्ही हे करू शकाल.
- पूर्वज्ञान: सतत बदलणाऱ्या आणि स्पर्धात्मक असलेल्या जगात, भविष्याचा सुज्ञपणे अंदाज लावणे तुमच्या हिताचे आहे. या अर्थाने, स्पर्धक, उद्योग आणि बिझनेसच्या वातावरणातील बदलांची अपेक्षा करणे आणि त्याचा अंदाज घेणे महत्त्वाचे आहे. तुम्ही जितक्या लवकर तयारी कराल, तितका जास्त वेळ तुम्हाला जुळवून घेण्यासाठी मिळेल - आणि तुम्हाला त्याचे आश्चर्य वाटणार नाही.
- सांख्यिकी: बिग डाटा क्रांती आणि ॲनालिटिक्स, सांख्यिकी मॉडेलिंग आणि मशीन लर्निंग इत्यादींच्या आगमनामुळे, गणित आणि संख्यांचे किमान मूलभूत ज्ञान असणे आवश्यक बनले आहे. तथापि, याचा अर्थ असा नाही की तुम्हाला प्रगत किंवा जटिल गणिते माहित असणे आवश्यक आहे, परंतु जर तुम्हाला संख्या आणि संख्यात्मक डाटा यात गती असेल तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
- अपयशासाठी तयार राहणे: “जॉन ए शेड यांनी शतकापूर्वी लिहिले होते, "बंदरात जहाज सुरक्षित असते, परंतु बंदरात राहण्यासाठी जहाजे बांधली जात नाहीत". हे विधान तंतोतंत खरे आहे, विशेषत: आजच्या वेगवान बदलांच्या आणि सतत विकसित होत असलेल्या प्रतिमानांच्या काळात. शहाणपणाने जोखीम पत्करून बरेच काही साध्य केले जाऊ शकते, कारण नशीब केवळ धाडसी लोकांना अनुकूल असते. परंतु, ही झेप घेताना, तुम्हाला अपयश स्वीकारण्याची आणि त्यातून शिकण्याची तयारी असली पाहिजे जेणेकरून तुमचे भविष्यातील प्रयत्न यशस्वी होतील.
- गती: जितके जलद तितके चांगले! हे व्हीयूसीए जग परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी थोडाच वेळ देते. सक्रिय, चलाख आणि कृती करण्यास तयार असणे महत्वाचे आहे, जेणेकरुन तुम्ही संधी उत्पन्न होताच प्राप्त करू शकता आणि स्पर्धकांच्या खूप आधी संधींचा फायदा घेऊ शकता.
- विविध कौशल्ये शिकणे: सल्लागार अनेकदा विविध कौशल्ये असलेल्या व्यावसायिकांबद्दल बोलतात. तुमच्या मुख्य कार्यक्षेत्रात तुमची सखोल निपुणता असणे हे निश्चितच महत्त्वाचे असले तरी, तुमच्या मुख्य कार्यक्षेत्राबाहेर काम करण्याची क्षमता मिळविण्यासाठी गुंतवणूक केल्याने प्रचंड फायदे मिळतील आणि तुम्हाला तुमच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यास मदत होईल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या स्वत:च्या क्षेत्राबाहेर चांगले सहयोग करू शकता आणि स्टार परफॉर्मर बनू शकता.
- विनम्रता: कोणत्याही गोष्टीवर अति आत्मविश्वास नसावा! अहंकार आणि अति आत्मविश्वासामुळे अनेक चांगले व्यावसायिक आणि संस्था अपयशी ठरल्या आहेत. भूतकाळातील कामगिरीवर अवलंबून राहणे थांबवा, आपल्या कमतरतांची जाणीव ठेवा आणि प्रत्येकाकडून आणि प्रत्येक गोष्टीकडून शिकण्याची सवय लावा.
- कस्टमर-केंद्रित: तुम्ही तुमच्या मॅनेजरला रिपोर्ट करू शकता, जे त्यांच्या वरिष्ठ व्यक्तीला रिपोर्ट करू शकतात, परंतु तुम्हाला किंवा तुमच्या कंपनीतील इतर कोणालाही सगळ्यात मोठ्या बॉसला - 'कस्टमर'ला नाराज करणे परवडणार नाही. संस्थेच्या प्रत्येक पैलूने - सेल्स पासून ते फायनान्स, ऑपरेशन्स आणि अगदी ह्यूमन रिसोर्सपर्यंत - कस्टमरना प्रदान केलेल्या मूल्याच्या संबंधात त्यांच्या निर्णयांचे सतत पुनरावलोकन केले पाहिजे. कस्टमरला प्रत्येक क्रियाकलाप आणि उपक्रमाच्या केंद्रस्थानी ठेवून, तुम्ही एक चांगली व्यवसाय संस्कृती निर्माण कराल आणि प्रत्येक वेळी कस्टमर तुमच्या सेवा वापरतील तेव्हा त्यांना आनंद होईल.
- डिझाईन थिंकिंग: सहानुभूती आणि कस्टमर टिकवून ठेवण्यावर अथक लक्ष केंद्रित करणे ही यशाची गुरुकिल्ली असली तरी, या आदर्शांना आनंद देणारी प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेसमध्ये बदलण्यासाठी फ्रेमवर्क असणे देखील महत्त्वाचे आहे. केंद्रस्थानी असलेल्या यूजरसह, डिझाइन थिंकिंग यूजरच्या दृष्टीकोनातून समस्या परिभाषित करून, त्यांच्या गरजांवर जोर देऊन आणि प्रक्रियेच्या पुनरावृत्तीद्वारे चांगले परिणाम मिळविण्यासाठी सतत पूर्वकल्पना तपासून मूल्य निर्माण करण्यात मदत करते. हा दृष्टिकोन कस्टमरला प्रॉडक्ट विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर केंद्रबिंदू ठेवतो, ज्यामुळे तुम्हाला कस्टमरच्या वास्तविक गरजा पूर्ण करणारे प्रॉडक्ट तयार करता येते.
- सिस्टीम थिंकिंग: समजा तुम्ही फुटबॉल टीममधील एक खेळाडू आहात. तुमचे काम फक्त बॉलला किक करणे एवढेच नाही तर तो दुसऱ्या खेळाडूकडे जाईल याची खात्री करणे देखील आहे, जो त्याला गोलच्या जवळ नेईल. सिस्टीम थिंकिंग या दृष्टीकोनावर कार्य करते. संस्थेची प्रत्येक सिस्टीम परिणाम देणार्या मोठ्या सिस्टीमशी कशी जोडलेली आहे हे समजण्यात हे तुम्हाला मदत करते. तुमची भूमिका काय आहे आणि ते संस्थेच्या सुधारणेसाठी कसे योगदान देते हे समजून घेणे तुम्हाला तुमची नेमकी स्थिती जाणून घेण्यास मदत करेल आणि तुमच्यासह प्रत्येकाला फायदा होईल अशा प्रकारे काम करेल.
- 'पुढे काय होईल' मानसिकता: तुम्ही काहीही करा, त्याचा दूरगामी परिणाम होतो. तुमच्या कृतींमुळे कोणते परिणाम, आव्हाने आणि संधी निर्माण होतील हे समजून घेणे तुम्हाला त्यांच्यासाठी तयार होण्यास मदत करेल. हे तुम्हाला ते उद्भवण्यापूर्वी रणनीती बनविण्यात आणि त्यांना अधिक चांगले हाताळण्यात मदत करते.
- आर्थिक साक्षरता: केवळ अकाउंटंट्स आणि इन्व्हेस्टमेंट बँकर्ससाठी फायनान्स समजून घेणे महत्त्वाचे नाही. तुमच्या संस्थेची तसेच तुमच्या जीवनाची आर्थिक वास्तविकता समजून घेणे तुम्हाला तुमच्या संसाधनांना अनुकूल करणारे निर्णय घेण्यास अनुमती देते, अशा प्रकारे त्यांचा जास्तीत जास्त लाभ मिळवता येतो. खर्चातील वाढ आणि घट, महागाई, शेअर बाजारातील चढ-उतार आणि फायनान्सचे अद्भुत जग या प्रत्येक संकेताकडे लक्ष द्या आणि तुमच्यापुढे अमाप शक्यता असतील.
- मोठ्या उद्देशाची प्रशंसा: तुम्ही ऑफिसमध्ये करत असलेले काम तेवढ्यावरच संपत नाही; हे मोठ्या उद्दिष्टामध्ये योगदान देते. हा दृष्टिकोन तुमच्या कामाला नवीन अर्थ देतो, तुम्हाला जबाबदारीची आणि उद्दिष्टाची जाणीव देतो.
तुम्हाला आढळेल की ही कौशल्ये केवळ नवीन शब्दच नव्हेत ज्यांना कोणताही खरा अर्थ नाही; ही सदाबहार कौशल्ये आहेत जी तुम्हाला तुमच्या सभोवतालच्या वेगाने बदलणाऱ्या जगामध्ये तुमची स्थिती मजबूत करण्यात मदत करतील. सतत प्रवाहात राहण्यासाठी हे महत्त्वाचे आहे की आपण केवळ तरंगत राहू शकत नाही तर काळाच्या महासागरात उद्भवणाऱ्या प्रत्येक लाटेवर स्वार होऊ शकतो. 2019 अफाट शक्यतांचे वचन देत असताना, ते आम्हाला आव्हानही देते आणि गेल्या वर्षीपेक्षा थोडे चांगले होण्याची प्रेरणा देते. 2018 पेक्षा अधिक बलवान, वेगवान, चलाख, अधिक सर्जनशील बनण्याची आणि अधिक सहानुभूती दाखवण्याची ही संधी आहे.