टीव्हीएस क्रेडिट मध्ये दोन महिन्यांची इंटर्नशिप सुरू करण्यापूर्वी माझ्या मनात शंकांची वादळे होती. कारण रिटेल-ब्रँडिंगच्या अज्ञात जगात मी पाऊल टाकणार होते. इंटर्नशिप खरोखरच अविश्वसनीय आणि परिपूर्ण अनुभव प्रदान करणारी होती. मार्केटिंगच्या पुस्तकात चर्चा केलेल्या संकल्पना प्रत्यक्षात अनुभवणं मला शक्य ठरलं. एका अर्थानं मी भाग्यवानचं ठरले.
आमच्यासाठी 4 मे रोजी व्हर्च्युअल परिचय सत्राचे आयोजन करण्यात आले. निवडलेल्या इंटर्न्स ग्रुपला संस्थेतील सीनिअर लीडर्सने संबोधित केले. संस्थेची संस्कृती आणि तत्वे याबद्दल त्यांनी आम्हाला परिपूर्ण स्वरुपाचे मार्गदर्शन प्रदान केले. आम्हाला कंपनीमधील विविध विभागांच्या कार्यांचा, त्यांच्या उत्पादने आणि नवकल्पनांचा संक्षिप्त आढावा दिला गेला. नवीन प्रॉडक्ट इनोव्हेशन मुळे आम्ही सर्वच जण भारावलो आणि कंपनी साठी इनोव्हेशन आणि प्रॉडक्ट पोर्टफोलिओचा विस्तार किती महत्वपूर्ण ठरू शकतो याचे आकलन प्राप्त झाले.
मार्केटिंग इंटर्न्सला प्रोजेक्ट बाबत मार्केटिंगचे हेड आणि सीआरएम श्री. चरणदीप सिंह यांनी संबोधित केले. त्यानंतर ब्रँडिंग आणि कम्युनिकेशनच्या चीफ मॅनेजर आणि माझ्या मार्गदर्शिका श्रीमती प्रीता एस यांच्यासोबत माझा परिचय करुन देण्यात आला. माझा प्रोजेक्ट हा कस्टमर अनुभव आणि रिटेल ब्रँडिंग संबंधित होता. ज्यामध्ये मला आव्हानात्मक कामांचा अनुभव प्राप्त झाला. सर्वात महत्वाचे आव्हान वर्क फ्रॉम होमचे होते. कारण सहकाऱ्यांसोबत संवाद साधण्याची कमी संधी मला उपलब्ध होणार होती. आणि मला पीअर टू पीअर लर्निंगची कमी जाणवली. तथापि, प्रत्यक्ष दृष्टीने, मला समजले की यामुळे मला विविध कल्पनांचा शोध घेण्याची आणि साध्य समाधान मिळण्याची स्वातंत्र्य मिळाले.
प्रोजेक्टचा भाग म्हणून मला की प्रमाणात प्रायमरी आणि सेकंडरी रिसर्च करावा लागला. प्रायमरी रिसर्च मध्ये कस्टमरच्या टीव्हीएस क्रेडिट मधील विविध ब्रँचमध्ये आणि अन्य एनबीएफसी मधील वर्तवणूक अभ्यासाचा समावेश होता. प्रायमरी रिसर्च हा अनेक प्रश्नावलींच्या सहाय्याने करण्यात आला. यामध्ये केवळ टीव्हीएस क्रेडिट ब्रँच, डीलरशिपला भेट देण्यात आली नाही. तर स्पर्धात्मक घटकांना देखील समाविष्ट करण्यात आले.
सेकंडरी रिसर्च हा डाटा संकलन करणे आणि वास्तव माहिती प्राप्त करणे, ब्रँडिंग, ब्रँडिंग गाईडलाईन्स आणि बँक, एनबीएफसी आणि अन्य संबंधित इंडस्ट्री मध्ये त्यांचे विविध स्वरुप समजावून घेणे यांचा समावेश होतो.
पुढील टप्प्यात प्रत्यक्ष कस्टमरचा अनुभव घ्यायचा होता. ज्यामध्ये कस्टमरचा प्रवासाचे ट्रॅकिंग समाविष्ट होते. हे माझ्यासाठी निश्चितच नवीनच होते.. हाच क्षण माझा विश्वास असा समजला की मी मार्केटिंग प्रोफेशनल बनू शकेल.
इंटर्नशिप मुळे माझ्या पूर्वीच्या गृहितकाबाबत असणारा संकुचितपणा नष्ट झाला. परंतु यामुळे माझ्या कामाप्रती व्यापक दृष्टीकोन प्राप्त झाला.. प्रत्यक्ष विचारमंथनातील कल्पना आणि अशाप्रकारच्या कल्पना प्रत्यक्षात साकारणे यामधील अडथळे आणि अंतर प्रत्यक्षात स्पष्ट झाले.. अशा काळात, माझ्या मार्गदर्शकांनी मला प्रोत्साहित केले आणि लक्ष्य प्राप्तीच्या दिशेनं पाऊल उचलण्यास सक्षम बनविले आणि माझ्या प्राथमिक उद्दिष्टापासून माझं लक्षं विचलित करू दिलं नाही.. खरंतर माझ्यासाठी हा वेक-अप कॉलच म्हणावा लागेल. ज्यामुळे यशस्वीपणे प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी इनपुट्स मिळाले.
अखेरीस, अपार कष्ट घेतल्यानंतर मला आशेचा किरण दिसला आणि कंपनीच्या ब्रँड वॅल्यू सोबत सुसंगत असलेल्या शिफारशी मी उपस्थित करू शकले. मी ब्रँड मूल्यांचे महत्त्व देखील जाणून घेतले आणि मला हे देखील समजले की, ब्रँड वॅल्यू बाबतीत तडजोड कधीही पर्याय नसतो.
मला टीव्हीएस क्रेडिट मध्ये मोठ्या प्रमाणात शिकण्यास चालना मिळाली आणि सर्वंकष क्षमतांचा विकास साधू शकले आणि मला शब्दांत सर्वकाही व्यक्त करणं शक्य नाही. व्हर्च्युअल इंटर्नशिप असूनही टीव्हीएस क्रेडिट मध्ये उत्कृष्ट सपोर्ट सिस्टीम होती आणि माझ्या कल्पनांचा शोध घेण्याचे आणि प्रोत्साहन देण्याचे स्वातंत्र्य माझ्याकडे होते.
माझ्या सहकारी इंटर्न्सला माझा नेहमीच सल्ला असेल. तुमच्या मनात शंका असल्यास तत्काळ विचारा.