“आपल्या सर्वांना भय वाटतं. नेमकं आपल्याला काय समजत नाही" - रॉबर्ट लंग्डन, द लॉस्ट सिम्बॉल
लोन प्रक्रियेच्या दरम्यान किचकट कागदपत्र प्रक्रियेचा अनुभव, त्रासदायक विलंब आणि खराब कस्टमर सर्व्हिसचा अनुभव आपल्या शत्रूला देखील येऊ नये असे आपल्याला वाटते. या सर्वांची चिंता करण्याचे दिवस आता संपले आहेत. क्रेडिट प्राप्त करणे आता सोपे आहे. जवळपास संपुष्टात आलेल्या पेपरवर्कसह आणि पूर्वीपेक्षा अधिक कस्टमर-फ्रेंडली प्रक्रियेसह, आता कार, बाईक किंवा एलईडी टीव्हीसाठी तुम्हाला हवे असलेले फायनान्स प्राप्त करणे सुलभ बनले आहे.
असे असूनही लोन बाबतचे अनेक मिथके अद्यापही निश्चितच दिसून येतील. खरंतर समाजात सेव्हिंग्स हे योग्य आणि लोन घेणं एकप्रकारचे निंदनीय बाब मानली जाते. त्यामुळे अनेक भारतीय हे लोन परतफेडी विषयी साशंक असल्यामुळे लोन घेणे टाळतात. अशाप्रकारच्या भीतीला खतपाणी घातलं गेलं फायनान्शियल संस्थांनी उभ्या केलेल्या प्रतिमेतून. जिथे लोन घेणाऱ्यांवर अनेक प्रश्नांचा भडिमार केला जातो आणि त्यांना विविध अडथळ्यांच्या स्पर्धेला सामोरे जावे लागते.
मिथके एकप्रकारे फुग्यासारखी असतात. उंचीवर जाऊ शकतात किंवा खालीही येऊ शकतात. त्यांच्यामध्ये केवळ गॅस भरलेला असतो. एका छोट्याश्या टाचणीने फुग्यातील हवा गायब होऊ शकते.. या पोस्टमध्ये लोन घेण्याविषयीचे सर्वसाधारण मिथकांविषयी जाणून घेणार आहोत आणि त्याविषयीचे गैरसमज दूर करणार आहोत.
1. माझ्या प्रोफाईल मुळे मला कधीच लोन मिळणार नाही!
लोनचा लाभ घेण्यासाठी अनेकांची प्रोफाईल 'पुरेशी' नाही हे आढळून येणारं सर्वसाधारण मिथक आहे.. त्यांचा समज असावा कदाचित त्यांचे वेतन पुरेशे नसावे, क्रेडिट रेकॉर्डचा अभाव ( किंवा खराब सिबिल स्कोअर) किंवा त्यांचे भाड्याचे घर त्यांच्या समस्येतील अडथळा ठरू शकते.
तुमच्यासाठी आनंदाची बातमी येथे आहे - तुमची प्रोफाईल कशीही असली तरीही तुम्ही निश्चितपणे लोन घेऊ शकाल! फायनान्स पुरवठादारांकडे विविध प्रोफाईल्स साठी अनुरुप विविध श्रेणीच्या स्कीम असतात.. तुमचे वय, उत्पन्न, व्यवसाय आणि निवासाचे ठिकाण जेव्हा तुम्ही अप्लाय कराल. तेव्हा सर्वप्रथम हे तपशील समोर येतील. यापैकी कोणत्याही तपशिलामुळे तुमचे ॲप्लिकेशन कॅन्सल होण्याची शक्यता नाही. पुढचं पाऊल टाका आणि आत्मविश्वासानं अप्लाय करा!
2. माझ्या क्षमतेपेक्षा अधिकचे पेपरवर्क असेल का?
पेपरवर्क. शब्द कानी पडला तरी कागदपत्रांचे फोल्डर डोळ्यासमोर येतात. पानांवर स्वाक्षरी करण्यासाठी पेन आणि एखादं महत्वाचं डॉक्युमेंट विसरले तर काय होईल हा विचार मनात येतात. हे मागील काळात खरे असले तरी, ते आता नाही. आजमितिला एनबीएफसी द्वारे ई-केवायसी आणि ई-साईन अंमलबजावणी करण्याचा विचार करीत आहे. या सर्वांसाठी केवळ काही सेकंदाची आवश्यकता भासू शकते. हे सर्व ऑनलाईन आहे आणि यासाठी किमान पेपरवर्कची आवश्यकता भासेल!
3. यासाठी खूप कालावधी लागेल!
खरंतर मिथकं हे चटणीच्या डागासारखे असतात. ते सहजासहजी दूर जात नाही.. लोन मंजूर होण्यासाठी आता महिने, आठवडे किंवा अगदी दिवसही लागत नाहीत. तुमच्या लोन ॲप्लिकेशनची प्रत्येक प्रक्रिया - तुमच्या तपशिलाच्या प्रवेशापासून ते क्रेडिट मंजुरी प्रक्रियेपर्यंत - डिजिटल आहे आणि अशाप्रकारे, जवळपास त्वरित पूर्ण केले जाते. बहुतांश प्रकरणांमध्ये, तुमच्या लोनला मंजूर होण्यासाठी काही तासांपेक्षा जास्त वेळ लागत नाही. दुसऱ्या शब्दांत, मंजुरी प्रक्रियेचा सामान्य कालावधी केवळ T20 मॅच कालावधी पर्यंतच आहे!
4. माझ्यासाठी इंटरेस्ट रेट्स खूप जास्त असू शकतात!
बँका आणि एनबीएफसी मधील सेल्स मॅनेजर दररोज अनेक समस्या सोडवतात, परंतु काही तासांत प्रत्येक पॉप-अप करणारा एक प्रश्न "इंटरेस्ट रेट परवडणारे असतील का?" . इंटरेस्ट रेट मुख्यत्वे तुमच्या प्रोफाईलवर अवलंबून असताना, तुम्ही दीर्घ कालावधी निवडून तुमचे ईएमआय किफायतशीर बनवू शकता. तसेच, नेहमीच चांगली सवलत आणि ऑफर प्राप्त करण्याचे काम करू शकतात - त्यांच्याबद्दल विचारण्यास विसरू नका!
लोन हे भार किंवा दडपण नाही - खरं तर, तुमची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचा स्मार्ट मार्ग आहे ज्याची दीर्घकाळ प्रतीक्षा न करता किंवा नंतरच्या तारखेपासून ते बंद करण्याची आवश्यकता नाही! वरील मिथकांमुळे तुमचं पुढील पाऊल टाकायला विसरु नका लोन साठी अप्लाय करणे. सर्वोत्कृष्ट, समृद्ध आणि अधिक परिपूर्ण आयुष्य जगण्यासाठी पाऊल टाका - तुम्हाला सुरू करण्यासाठी फक्त एक सोयीस्कर आणि वेळेवर लोन घेणे आवश्यक आहे.