टीव्हीएस क्रेडिट हा संपूर्ण भारतातील लाखो ग्राहकांसाठी विश्वसनीय क्रेडिट पार्टनर आहे. टीव्हीएस क्रेडिट तुम्हाला ऑनलाईन फसवणूकीच्या कृतींविषयी जागरूक राहण्याची विनंती करते. फसवणूक हा कार्ड होल्डरच्या माहितीशिवाय क्रेडिट/डेबिट कार्ड तपशिलाचा बेकायदेशीर वापर आहे. ईमेल, त्वरित मेसेजिंग, वेबसाईट आणि फोन कॉल्स हे पर्सनल डाटा चोरी करण्याचे सामान्य स्रोत आहेत. म्हणून, फसवणूकीचा धोका दूर करण्यासाठी अज्ञात वेबसाईटवर तुमचा बँक अकाउंट नंबर, पिन नंबर, सीव्हीव्ही इ. सारखी कोणतीही गोपनीय माहिती शेअर करू नका.
फसवणूकीचे ट्रान्झॅक्शन कसे टाळावे हे जाणून घेण्यापूर्वी, विविध प्रकारच्या ऑनलाईन फसवणूकींविषयी जाणून घ्या:
- फिशिंग: फसव्या वेबसाईटवर किंवा बनावट ईमेलवर लॉगिन क्रेडेंशियल किंवा कार्ड तपशील शेअर केल्यावर कस्टमरना फिशिंग होण्याची शक्यता असते. अपरिचित स्त्रोतांमध्ये खासगी माहिती सबमिट केल्यामुळे वैयक्तिक डाटा चोरी होऊ शकतो.
- पेज जॅकिंग: कस्टमरना वेगवेगळ्या वेबसाईटवर पुनर्निर्देशित केले जाते कारण हॅकर्स मूळ वेबसाईट पेज आणि संभाव्य डाटाला हायजॅक करतात.
- खोटी मर्चंट ओळख: कस्टमरना विश्वास ठेवायला भाग पाडले जाते की बनावट मर्चंट अकाउंट प्रत्यक्षात वैध बिझनेस अकाउंटशी संबंधित आहे. स्त्रोत विश्वासार्ह असल्याचे गृहीत धरून अनेकजण सापळ्यात अडकतात.
आता, तुम्हाला संभाव्य ऑनलाईन फसवणूकीचे धोके माहित आहेत, तर आपण फसवणूकीचे ट्रान्झॅक्शन कसे टाळावे आणि तुमचे अकाउंट सुरक्षित कसे ठेवावे हे पाहूया:
- कॉलवर गोपनीय फायनान्शियल माहिती शेअर करू नका: जेव्हा तुम्हाला तुमचा सीव्हीव्ही पिन, कार्ड तपशील किंवा अकाउंट नंबर शेअर करण्यास सांगितले जाईल, तेव्हा कृपया कॉलवर ते शेअर करू नका. त्याचप्रमाणे, अपरिचित/अज्ञात वेबसाईट आणि लिंकवर तुमचे फायनान्शियल तपशील शेअर करू नका.
- अटॅचमेंट आणि डाउनलोडसह सावधगिरी बाळगा: जेव्हा तुम्हाला ईमेलच्या स्त्रोताविषयी खात्री नसेल तेव्हा लिंकवर क्लिक करू नका किंवा अटॅचमेंट उघडू नका. अज्ञात अटॅचमेंट डाउनलोड केल्याने तुमच्या डिव्हाईसवर व्हायरस येऊ शकतात.
- अधिकृत वेबसाईटला भेट द्या: मूळ वेबसाईट लिंकशी जुळणारे डोमेनचे नाव आणि यूआरएल असू शकतात. यूआरएल व्यवस्थित तपासा आणि कोणतेही पेमेंट करण्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाईटवर आला आहात याची खात्री करा.
- कधीही कार्ड तपशील ऑनलाईन सेव्ह करू नका: प्रत्येकवेळी तुम्ही ऑनलाईन पेमेंट करताना, कार्ड तपशील मॅन्युअली एन्टर करा आणि पुन्हा वापरण्यासाठी सेव्ह करू नका. पेमेंट पूर्ण झाल्यावर लगेचच तुमच्या अकाउंटमधून लॉग-आऊट करा.
तुम्हाला फसवणूकीच्या ट्रान्झॅक्शनचा संशय असल्यास तुम्ही काय करू शकता?
जर तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटमध्ये अनोळखी डेबिट/क्रेडिट कृतीची शंका असेल तर त्वरित कस्टमर केअर डिपार्टमेंटला समस्या रिपोर्ट करा आणि तक्रार करा. आरबीआयच्या नियमांनुसार, बँकेला सूचित केल्यानंतर, 90 दिवसांच्या आत तक्रारीचे निराकरण करावे लागते.
जेव्हाही पर्सनल तपशील वेबसाईटवर शेअर केले जातात तेव्हा टीव्हीएस क्रेडिट तिच्या कस्टमर्सच्या तपशिलाची गोपनीयता सुनिश्चित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते. एक जबाबदार कस्टमर बना; आवश्यक माहिती मिळवत राहा आणि तुमची फायनान्शियल माहिती फसवणूक करणाऱ्यांपासून सुरक्षित ठेवा.
तुमची सुरक्षा हे आमचे सर्वात महत्त्वाचे प्राधान्य आहे.