प्रारंभी मी टीव्हीएस क्रेडिट सोबत माझा प्रवास सुरू करण्यास उत्सुक होतो! केवळ टीव्हीएस क्रेडिट नव्हे तर टीव्हीएस क्रेडिट ग्रुपचा भाग म्हणून एनबीएफसी सोबत हा माझा पहिलाच अनुभव होता.. तथापि, देशभरातील लॉकडाउन मुळे माझ्या उत्साहावर विरजण पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. माझी अन्य काही फर्म्स सोबत इंटर्नशिप रद्द झाल्यामुळे मी तसा चिंताग्रस्त होतो. जेव्हा टीव्हीएस क्रेडिटने इंटर्नशिप सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. तो माझ्यासाठी निश्चितच सुखद स्वरुपाचा धक्का होता.. कोविड परिस्थितीचा विचार करुन व्हर्च्युअल इंटर्नशिप घेण्याच्या निर्णयामुळे माझ्या वरील ताण निश्चितच हलका झाला.
एचआर डिपार्टमेंटचे श्री. विक्रम यांनी पहिल्या दिवसाच्या व्हर्च्युअल इंटर्नशिपचे संनियंत्रण केले.. आम्हाला कंपनी - विभाग आणि कार्य प्रणाली या विषयी संक्षिप्त अवगत करण्यात आले. या वार्तालाप मध्ये वरिष्ठ मॅनेजमेंट टीम मधील सदस्यांसोबत मौलिक सेशन्सचे आयोजन करण्यात आले होते.
या परिचयानंतर माझी नेमणूक डेब्ट कलेक्शन डिपार्टमेंट मध्ये करण्यात आली. मला श्री. मणीगंधन, श्री. कलाईसेल्व्हन आणि श्री. पियूष यांचे मार्गदर्शन लाभले. मला त्यांनी कलेक्शन टीम्सचा ओव्हरव्ह्यू दिला आणि कंपनी मधील कलेक्शन टीम बाबत अवगत केले. मला भविष्यात प्रोजेक्टवर काम करण्यास असाईन करण्यात आले, ‘एनबीएफसी मधील कलेक्शनच्या विकसित पद्धती‘.
मला भारतातील टॉप एनबीएफसी द्वारे कार्यरत विविध तांत्रिक अंमलबजावणी सह विविध कलेक्शन स्ट्रॅटेजी बाबत रिसर्च करावा लागला होता.. माझा प्रोजेक्ट प्रवास व्यस्त होता. तथापि, वेळेच्या मर्यादांसह काम करण्यास मला मदत केली आणि अधिक कार्यक्षम होण्यासाठी नवीन मार्ग शोधण्यात मला मदत केली. जसे म्हटले आहे ‘ना वेदना, ना फळ’.
श्री. पियूष यांचे प्रोजेक्ट काळात मला संपूर्ण सहकार्य लाभले. दर दिवशी त्यांच्या सोबत दोन मीटिंग्स होत होत्या आणि प्रत्येक मीटिंग्स मध्ये टास्क आणि डेडलाईन दिल्या जात होत्या. मला नेहमीच माझ्या मर्यादेच्या पलीकडे काम करण्यास मिळाले आणि ज्यामुळे माझी इंटर्नशिप मौल्यवान ठरली.
हे नेहमीच काम करत नव्हते, मात्र. व्हर्च्युअल इंटर्नशिप असूनही श्री. विक्रम यांनी को-इंटर्न सोबत व्हर्च्युअल संवाद सेशनचे आयोजन केले. मजेशीर खेळांच्या दरम्यान सुप्त गुणांचे प्रकटीकरण झाले. व्यस्त कामकाजाच्या दिवसानंतर विरंगुळा प्रदान करण्यास परिपूर्ण संधी होती.
टीव्हीएस क्रेडिट सोबतच्या माझ्या इंटर्न शिप प्रवासामुळे मला संपूर्ण एनबीएफसी सेक्टर बद्दल जाणून घेण्यास फायदा मिळाला. या क्षेत्रातील दिग्गजांनी दिलेल्या दृष्टीकोन मुळे माझ्या ज्ञानात भर पडली. वैयक्तिक स्तरावर काम, वेळेचे व्यवस्थापन आणि उत्पादकता यांच्या दृष्टीकोनातून वाढ झाली. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, माझ्या कल्पना प्रभावीपणे कशा मांडाव्यात याचे आकलन झाले.
मला टीव्हीएस क्रेडिट कुटुंबाचा भाग बनण्याची ही संधी दिल्याबद्दल मी संपूर्ण टीमला धन्यवाद देऊ इच्छितो. मला खरंतर आश्चर्य वाटले. माझे स्वप्न प्रत्यक्षात साकारले.