टीव्हीएस क्रेडिट सारख्या प्रतिष्ठित संस्थेत इंटर्न म्हणून काम करणं निश्चितच माझ्यासाठी उत्कंठा वाढविणारे होते.. तथापि, कोविड-19 उद्रेकामुळे माझ्या मनात अनिश्चितता निर्माण झाली होती. इंटर्नशिप होऊ शकेल किंवा नाही.
तथापि, टीव्हीएस क्रेडिटने इंटर्नशिप कोणत्याही अडथळ्यांशिवाय होण्याची सुनिश्चिती दिली.. परिस्थितीनुसार, इंटर्नशिप व्हर्च्युअल होती. तथापि, इंटर्न्स साठी शिकण्याच्या कोणत्याही संधी सोबत तडजोड न करता हे करण्यात आले. मला व्हर्च्युअल इंटर्नशिप घेण्याच्या पद्दतीचे विशेष कौतुक वाटले. माझी ही पहिली इंटर्नशिप असल्याचे मला कधीही वाटले नाही. ही प्रक्रिया त्रास-मुक्त आणि पेपरलेस होती.
सीएक्सओ सोबत झालेल्या सुरुवातीच्या बैठकांमुळे कंपनीचे व्हिजन आणि कार्यपद्धती या विषयी सर्वांगीण दृष्टीकोन मिळाला. यार्ड मॅनेजमेंट वर माझा प्रोजेक्ट होता. मला रेशिड्यूअल मॅनेजमेंट टीम सोबत काम करण्याची संधी मिळाली. मी पहिल्यांदाच रिअल-टाइम वर्क प्रोजेक्ट वर काम करीत होतो आणि मी आव्हानांसाठी सज्ज होतो. मला या निमित्ताने श्री, वसंत यांचे आभार व्यक्त करायचे आहेत. त्यांचे वेळापत्रक व्यस्त असतानादेखील त्यांनी मला केलेले मार्गदर्शन, इनपुट मोलाचे ठरले.
माझ्या किमान कॉर्पोरेट अनुभवामुळे बिझनेस केस विकसित करणे माझ्यासाठी खूपच आव्हानकारक होते. विशेषत:, इंटर्नशिपच्या प्रारंभिक टप्प्यांदरम्यान. परंतु, हे खूपच सोपे झाले, कारण मला विविध कार्यांमध्ये अनुभव मिळाला, ज्यामध्ये समाविष्ट आहे:
- डाटा हँडलिंग
- बिझनेस विश्लेषण
- समस्या शोधणे
- स्ट्रॅटेजी डेव्हलपमेंट
- फायनान्शियल व्यवहार्यता
मी श्री. रामचंद्रन यांचे विशेष आभार या निमित्ताने मानतो. त्यांचे महत्वाचे पैलू आणि पेटंट विषयक माहितीचे विश्लेषण यामुळे माझी इंटर्नशिप अधिक सुलभ ठरली.
मी प्रोजेक्ट मध्ये अनेक कष्ट घेतले आणि मला माझ्या कामाबाबत अभिमान वाटला. मला अंतिम सादरीकरणाच्या बाबत खेद वाटला. प्रोजेक्ट दरम्यान मी घेतलेले कष्ट कमी पडल्याचे या निमित्ताने मला जाणवले.. त्यानंतर पुन्हा, काय चुकीचे घडले आणि आवश्यक सुधारणा करणे हे शिकण्याच्या प्रक्रियेचा भाग आहे हे समजून घेणे.
श्री. विक्रमन आणि त्यांच्या टीमला खूप धन्यवाद. संपूर्ण इंटर्नशिप दरम्यान त्यांनी इंटर्नला कनेक्ट आणि प्रेरित ठेवण्यास मोलाची भूमिका बजावली.. नियमित मीटिंग्स आणि मजेदार सेशन मुळे आम्हाला रिचार्ज करण्यास आणि नवीन आव्हानांसाठी तयार होण्यास मदत मिळाली.
टीव्हीएस क्रेडिटच्या तज्ज्ञांकडून मला इंटर्नशिप दरम्यान खूप काही शिकायला मिळालं. जेव्हा मी करिअर मॅनेजमेंट मध्ये प्रवेश केला. तेव्हा हा अनुभव नक्कीच माझ्या प्रवासात मैलाचा दगड ठरला.
व्हर्च्युअल इंटर्नशिप यशस्वी करण्यात हातभार लावलेल्या प्रत्येकाला मला यानिमित्ताने धन्यवाद द्यायचे आहेत.