बॅलन्सचा अंदाज घेणे आणि प्रत्यक्षात सायकल चालविणे यामध्ये निश्चितच मोठा फरक आहे.. सीटवर बसल्यानंतर एकतर तुम्ही बॅलन्स साधण्याचं शिकाल आणि बाईक राईड करालं किंवा अन्यथा खाली पडाल. मॅनेजमेंटचा विद्यार्थी म्हणून, मी माझ्या समर इंटर्नशिप कडे पाहत होतो. ज्यामुळे माझ्या अकॅडेमिक ज्ञानाची प्रत्यक्ष अनुभवाशी सांगड घालता आली.
मी यापूर्वीच टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेड कडे अप्लाय केले होते.. टीव्हीएस क्रेडिट हा US$8.5 बिलियन टीव्हीएस ग्रुपचा भाग आहे आणि लाखो महत्वकांक्षी मनांची स्वप्नपूर्ती साधण्यासाठी प्रयत्नशील असणारी एनबीएफसी आहे.. कंपनीचा विस्तार संपूर्ण भारतभरात आहे.. आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रातील व्यक्तींच्या आवश्यकतांची पूर्तता करतात.. मी उत्साहित होतो आणि अनुभवाच्या प्रतीक्षेत होतो.
तथापि, मी खूपच आशावादी नव्हतो. महामारीमुळे अनेक संस्थांना त्यांच्या कामांना ब्रेक द्यावा लागला तसेच अनेकांनी कर्मचाऱ्यांची कपात केली.. सर्व विचार केला तर इंटर्न्स तुलनेने कमी महत्वाचे ठरतात आणि कंपनीच्या ऑपरेशन्स मध्ये देखील आवश्यक ठरत नाही.
माझ्या आनंदासाठी, त्यांनी त्यांची वचनबद्धता सन्मानित केली आणि त्यांच्या नियोजन विभागात ऑनबोर्ड केले. कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या परिस्थिती मुळे बहुतांश प्रशिक्षण हे व्हर्च्युअल स्वरुपातच घ्यावे लागले. मी नियोजन विभागात महत्वाच्या प्रकल्पावर कामास सुरुवात केली. आणि तिथे माझे पुस्तकी ज्ञान प्रत्यक्षात उतरविले.
इंटर्नशिपची सुरुवात नियोजनबद्ध व्हर्च्युअल परिचय कार्यक्रमाने झाली.. अत्यंत माहितीपूर्ण होते आणि यामुळे कंपनीची गाभा मूल्ये, उद्दिष्टे आणि मूल्यांचा परिचय झाला.. मी विविध स्वरुपाच्या कार्य प्रणाली साठी वैविध्यपूर्ण अध्ययन सत्रांना हजेरी लावली.. मला कंपनीच्या दीर्घकालीन बिझनेस धोरण, ब्रँडिंग आणि नवीन प्रॉडक्ट विकासाबद्दल माहिती मिळाली. मी कंपनीची विविध कार्ये जाणून घेतले.
टीव्हीएस क्रेडिट मधील इंटर्नशिप हा परिपूर्ण अनुभवाचा ठेवा होता. माझ्या इंटर्नशिप दरम्यान, मला कामाच्या ठिकाणी अनेक मजेशीर अनुभव मिळाले.. इंटर्न्स फेलो दरम्यान संवाद साधण्याचा अनुभव देखील मजेशीर होता.
टीव्हीएस क्रेडिट मधील माझी इंटर्नशिप आनंददायी आणि फलदायी होण्यासाठी अनेकांनी महत्वाचे योगदान दिले.. मी प्रत्येकाचे हृदयपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून त्यांनी वेळ काढली. व्यवस्थापनाचे बारकावे समजाविले आणि आमच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी केली.
मला खात्री आहे की मी सर्वोत्तम गोष्टींपासून शिकलो. माझा अनुभव समृद्ध आणि रिवॉर्डिंग होता. आणि मला ही संधी प्रदान केल्याबद्दल मी पुनश्च टीव्हीएस क्रेडिटचे आभार व्यक्त करतो.
माझ्या पुस्तकी ज्ञानाला प्रत्यक्ष आकलनाची जोड मिळाली आहे.. एका नवशिक्या सायकलस्वार प्रमाणं मी बॅलन्स साधला असून आता प्रगतीची राईड करण्यास सज्ज झालो आहे.!