आज बँका थ्री-व्हीलर विक्रेत्यांना सर्वाधिक महत्व देत आहेत. त्यामुळे त्यांनी थ्री-व्हीलर लोन्स आणि ऑटो लोन्सची उपलब्धता केली आहे. त्यामुळे, जर तुम्ही खरेदी करण्याची प्लॅनिंग बनवत असल्यास खरेदीपूर्वी निश्चित जाणून घ्या थ्री-व्हीलर लोन इंटरेस्ट रेट्स.
अधिक ऑटोमोबाईल कंपन्या थ्री-व्हीलरमध्ये प्रवेश करत असताना, भारतीय रस्ते लवकरच ऑटो रिक्षा, टेम्पो आणि ट्रक यासारख्या अधिक थ्री-व्हीलर वाहनांचा साक्षीदार होतील. ते वस्तूंसाठी तसेच प्रवाशांसाठी वाहतुकीच्या सर्वोत्तम पद्धतीपैकी एक आहेत. यासाठी कमी इन्व्हेस्टमेंट आणि कमी मेंटेनन्स खर्च आवश्यक आहे, ज्यामुळे ते सर्वात किफायतशीर माध्यम बनते. तथापि, खराब मेंटेन केलेले थ्री-व्हीलर सामान्यपेक्षा जास्त वेळ टिकून राहणार नाही आणि मेंटेनन्सचा खर्च जास्त असेल. दुसऱ्या बाजूला, जर थ्री-व्हीलर योग्यरित्या मेंटेन केले तर ते अधिक अवलंबून राहण्यायोग्य, टिकाऊ आणि सुरक्षित असेल.
नियमित सर्व्हिस आणि देखभाल इंजिनची कार्यक्षमता वाढवेल आणि तुम्हाला जास्त खर्चिक होऊ शकणाऱ्या सर्व समस्या दूर करेल. तुमच्या थ्री-व्हीलरसाठी काही मेंटेनन्स टिप्स येथे दिल्या आहेत:
1. नियमितपणे इंजिन ऑईल तपासा!
जेव्हा थ्री-व्हीलरचा विषय येतो, तेव्हा इंजिनचे कार्य मुख्यतः इंजिन ऑईलवर अवलंबून असते. ऑईल लेव्हल ही शिफारसित लेव्हलच्या अनुरुप असल्याची खात्री करा. तेव्हा, कमी किंमतीचे आणि स्वस्त ऑईल निश्चितच वापरु नका. यामुळे तुमचे इंजिन खराब होईल आणि मेंटेनन्स खर्चात वाढ होईल. बहुतांश प्रकरणांमध्ये ऑटो रिक्षा साठी 2T ऑईलची शिफारस केली जाते. यामुळे इंजिन सहज सुरू होते, ते स्वच्छ होते आणि कमी मेंटेनन्सला हातभार लागतो. यामुळे स्पार्क प्लगमध्ये काही जमा होणे, ते गंजणे आणि दूषित होण्याचा धोका कमी होतो. तथापि, ऑईल आणि फ्यूएल यांचा निश्चित रेशिओ आहे. त्यामुळे, तुम्ही योग्य प्रमाणात ऑईल घातल्याची खात्री करा.
2. वाहनाचा स्पीड आदर्श ठेवा
थ्री-व्हीलरचे इंजिन उच्च स्पीडवर घेण्यापूर्वी ते पुरेसे गरम होणे आवश्यक आहे. त्यामुळे, त्यास 35 ते 40 किमी/तास या आदर्श स्पीडने चालविणे ही एक चांगली सवय आहे. अशा कमी स्पीडने चालवल्यास तुमची ऑटो रिक्षा दीर्घकाळ चालेल.
3. नियमितपणे टायर प्रेशर तपासा
टायर मधील अपुऱ्या एअर प्रेशरमुळे ड्रायव्हिंग करताना गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. चांगल्या परफॉर्मन्स आणि सुरळीत रायडिंगसाठी, ऑटो रिक्षा साठी टायर मध्ये योग्य प्रमाणात हवा असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे वेळोवेळी टायर तपासत राहा आणि त्यातील हवेचे प्रमाण योग्य ठेवा.
4. नियमितपणे ब्रेकिंग सिस्टीम तपासा!
ब्रेकिंग सिस्टीम ही थ्री-व्हीलर मधील महत्वाच्या सिस्टीम पैकी एक आहे. त्याची नियमित तपासणी करा. काही वेळा, ब्रेक्स मध्ये धूळ जमा होते. ज्यामुळे कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे, पर्याप्त ब्रेकिंग फ्लूईड्स असल्याची खात्री करा.
तुमची ऑटो-रिक्षा चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी वरील टिप्स आणि ट्रिक्स लक्षात ठेवा आणि अंमलात आणा. तुमचे थ्री-व्हीलर मेंटेन केल्यामुळे केवळ अधिक विश्वासार्ह आणि सुरक्षित वाहनच होणार नाही, परंतु ते खराब होण्याची शक्यता कमी असेल आणि विक्रीच्या वेळी तुम्हाला जास्त किंमत मिळेल. तसेच, ते हरित जगात योगदान देणारे स्वच्छ आणि पर्यावरण अनुकूल वाहन असेल. तुमच्या थ्री-व्हीलरची काळजी घ्या आणि ते तुमची काळजी घेईल!