तुम्ही कृषी व्यवसायात जाण्याची योजना बनवत आहात का?
किंवा तुम्ही यापूर्वीच शेतीमध्ये आहात का?
तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे की शेती महाग आहे! शेतीची मशागत करणे आणि शेती व्यवसायात कार्यरत राहण्यासाठी तुम्हाला खर्चाचा भार सहन करावा लागू शकतो!
तुम्हाला फायनान्सिंगची गरज भासण्याची दाट शक्यता आहे आणि इथेच फार्म लोन्स कामी येतात.
ॲग्रीकल्चर लोन मिळविणे निश्चितच आव्हानात्मक ठरू शकते. काहीवेळा लेंडर पर्यंत पोहोचणे देखील कठीण ठरू शकते फार्म लोन मंजुरीसाठी खूप तयारी करावी लागते. तुम्हाला किती रक्कम हवी आहे, तुम्हाला त्याची गरज का आहे आणि तुम्ही ते कसे फेडणार आहात याबद्दल तुमच्या मनात स्पष्टता असेल, तर हे लोन मिळवणे सोपे काम होऊ शकते.
ॲग्रीकल्चर लोन साठी अप्लाय करण्यापूर्वी करावयाच्या काही महत्त्वाच्या गोष्टी येथे दिल्या आहेत:
1. तुमच्याकडे योग्य बिझनेस प्लॅन असणे आवश्यक आहे
जर तुम्ही एखाद्या लेंडरकडे असेच जाल आणि म्हणाल, “मला माझ्या कृषी बिझनेससाठी फायनान्स आवश्यक आहे”, तर तुमचे लोन मंजूर न होण्याची 99 टक्के शक्यता आहे. दुसरीकडे, जर तुम्ही योग्य बिझनेस प्लॅन घेऊन गेलात, तर लेंडरला कळेल की तुम्हाला काय करायचे आहे, तुम्हाला कुठे इन्व्हेस्ट करायचे आहे, तुम्ही कसे इन्व्हेस्ट कराल आणि लोनचे रिपेमेंट कसे कराल याबद्दल तुमच्या मनात स्पष्टता आहे. तुमच्या बिझनेस प्लॅनमध्ये तुमची बॅकग्राऊंड माहिती, मिशन, ध्येय, उद्दिष्टे आणि मार्केटिंग प्लॅन यांचा समावेश असल्याची खात्री करा.
2. तुमची फायनान्शियल स्टेटमेंट्स तयार ठेवा
ही सर्वात महत्त्वाच्या स्टेप्स पैकी एक आहे कारण सर्व लेंडरना हे जाणून घ्यायचे असेल की तुम्ही बँकेकडून घेतलेले पैसे परत करू शकाल की नाही. तुम्ही ज्या लेंडरशी संपर्क साधता ते तुमच्याकडे लोनचे रिपेमेंट करण्याची आर्थिक क्षमता आहे की नाही हे तपासण्यासाठी तुमच्या उत्पन्नाचे स्टेटमेंट, कॅश फ्लो स्टेटमेंट, शेतीची बॅलन्स शीट आणि बिझनेस रेकॉर्ड यासारखी डॉक्युमेंट्स तपासतील.
3. तुमचे तारण तयार ठेवा
तारण ही अशी ॲसेट आहे जी तुमच्या मालकीची असते आणि तुम्ही लोन रिपेमेंट करण्यात अयशस्वी झाल्यास बँक रिकव्हरीसाठी वापरू शकते. तुमच्याकडे लोनच्या रकमेची ॲसेट असणे आवश्यक आहे. 'तुम्ही कोणती ॲसेट गहाण ठेवू शकता?', असे तुम्हाला विचारले गेले, तर तुमचे उत्तर तयार असले पाहिजे. तुमच्याकडे लोनच्या मूल्याएवढी बिगर-शेती ॲसेट असल्यास तुमच्या लोन मंजुरीची शक्यता वाढते.
4. सामान्य प्रश्नांसाठी स्वत:ला तयार करा
जरी तुम्हाला ही एक अतिशय साधी गोष्ट वाटत असली तरी तिला गृहीत धरू नका. तुम्ही पात्रता आणि मागील अनुभव यासारख्या सामान्य प्रश्नांची उत्तरे कशी देता यावर आधारित, तुमचा बिझनेस प्लॅन यशस्वी होईल की नाही किंवा तुम्ही लोनचे रिपेमेंट करू शकाल की नाही हे लेंडर ठरवू शकतो. म्हणून, जर तुम्हाला लेंडरवर चांगली छाप पाडायची असेल, तर तुम्ही सामान्य प्रश्नांसाठी तयार असले पाहिजे.
जर तुम्ही वरील गोष्टींसह तयार असाल आणि लोनसाठी लेंडरकडे जाण्यापूर्वी तुमचा प्लॅन तयार असेल, तर ते तुमचे लोन मंजूर करतील अशी जास्त शक्यता आहे. या लोनचा लाभ घेतल्यानंतर, तुम्ही हे पैसे शेतीची अवजारे आणि पुरवठा खरेदी करण्यासाठी, जुन्या लोनचे रिफायनान्सिंग, दुरुस्ती आणि जमीन सुधारणा करण्यासाठी आणि मार्केटिंग मोहिमा आणि जाहिरातीसाठी वापरू शकता. अनेक बँका स्वतंत्रपणे ट्रॅक्टर लोन्स देखील देतात. त्यामुळे, तुम्ही ट्रॅक्टर लोन इंटरेस्ट रेट ऑनलाईन तपासू शकता आणि नंतर ते निवडू शकता!