ट्रॅक्टरमधील इन्व्हेस्टमेंट ही तुमची शेतीची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुम्ही केलेली सर्वात मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. सुदैवाने, आजकाल बँका फार्म लोन्स आणि ट्रॅक्टर लोन्स सोयीस्कर रिपेमेंट कालावधीसह कमी इंटरेस्ट रेट्सने देतात. आजकाल ट्रॅक्टर खरेदी करणे सोपे झाले आहे. पण, खरे काम खरेदी केल्यानंतर सुरू होते. ट्रॅक्टर कार्यक्षमतेने चालू ठेवण्यासाठी त्याला मेंटेन करण्यात तुम्हाला जवळजवळ तज्ञ व्हायला हवे.
चांगले उत्पादन घेण्यासाठी तुमचा ट्रॅक्टर उत्तम स्थितीत ठेवणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला दररोज पुरेसा वेळ द्यावा लागेल आणि योग्य मेंटेनन्स पद्धतींचे पालन करावे लागेल. तुमचा ट्रॅक्टर चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी येथे काही मेंटेनन्स टिप्स आहेत:
1. ओनर्स मॅन्युअल वाचा
प्रत्येक उत्पादक खरेदीदारांना यूजर मॅन्युअल देतो ज्यामध्ये उपकरणांची काळजी घेण्याच्या सूचना असतात. त्यामुळे, तुमच्याकडे ओनर्स मॅन्युअल असल्याची खात्री करा आणि नमूद टिप्सचे पालन करा. यामध्ये मेंटेनन्स शेड्यूल, स्पेसिफिकेशन्स, उपकरणांच्या सर्व भागांचे लोकेशन आणि मूलभूत ऑपरेटिंग सूचना समाविष्ट आहेत.
2. सर्व मेंटेनन्स टूल्स प्राप्त करा
ट्रॅक्टरच्या मेंटेनन्ससाठी ऑटोमोबाईलच्या मेंटेनन्ससाठी आवश्यक असलेल्या साधनांपेक्षा वेगळ्या साधनांची आवश्यकता असते. त्यामुळे, तुमच्या ट्रॅक्टरची काळजी घेण्यासाठी आवश्यक असलेला पाना आणि इतर सर्व साधने एकतर उधार घ्या किंवा विकत घ्या.
3. ट्रॅक्टरचे पावसापासून संरक्षण करा
तुम्ही तुमच्या ट्रॅक्टरचे पावसापासून संरक्षण करत असल्याची खात्री करा; खासकरून एक्झॉस्ट सिस्टीम, सीट आणि इन्स्ट्रूमेंट्स. त्यामुळे, एकतर गॅरेजमध्ये ठेवा किंवा त्यास चांगल्या प्रकारे कव्हर करा.
4. नियमितपणे फ्लूईड्स तपासा
ट्रॅक्टरचा कोणताही भाग गळत असल्यास, नुकसानीची किंमत खूप जास्त असू शकते. ओनर्स मॅन्युअल रेफर करा आणि कोणते भाग तपासले जाणे आवश्यक आहे ते शोधा. तुम्ही इंजिन ऑईल, कूलंट, बॅटरी इलेक्ट्रोलाईट, ट्रान्समिशन फ्लूईड आणि हायड्रॉलिक ऑईल तपासणे आवश्यक आहे.
5. टायर मध्ये योग्य एअर प्रेशरची खात्री करा
सर्व ट्रॅक्टरना समान इन्फ्लेशन प्रेशरची आवश्यकता नसते. त्याच ट्रॅक्टर मध्येही, फ्रंट आणि रिअर टायरला वेगवेगळ्या प्रेशरची आवश्यकता असू शकते. त्यामुळे, नियमित अंतराने एअर प्रेशर तपासा.
6. ब्रेक्सवर लक्ष ठेवा
अधिकांश ट्रॅक्टर्स मध्ये ऑटोमॅटिक ब्रेक्स असतात. तुम्हाला फक्त खात्री करायची आहे की तुमची ब्रेकिंग सिस्टीम ल्युब्रिकेट केलेली आहे आणि चांगली काम करते. तुमची ब्रेकिंग सिस्टीम योग्य पद्धतीने कार्यरत नसल्यास तुम्हाला लवकरात लवकर दुरुस्ती करुन बदलावी लागेल.
7. फिल्टरवर लक्ष ठेवा
धूळ आणि अस्वच्छता सिस्टीमला दूषित करू शकते आणि आणि यामुळे ट्रॅक्टरचे भाग निकामी होऊ शकतात. या प्रदूषकांपासून सिस्टीमचे संरक्षण करण्यासाठी ट्रॅक्टर्समध्ये फिल्टर असतात. फ्यूएल फिल्टर आणि एअर फिल्टर वारंवार तपासण्याचा सल्ला दिला जातो. ते स्वच्छ करा आणि योग्य प्रकारे स्वच्छ होऊ शकत नसल्यास बदला.
8. ल्युब्रिकेट करत राहा
तुम्हाला तुमच्या ट्रॅक्टरने चांगले काम करावे असे वाटत असल्यास, तुम्हाला तो व्यवस्थित ल्युब्रिकेट करावा लागेल. ऑईलची पातळी नियमितपणे तपासा आणि हेवी ड्युटी ल्युब्रिकेट वापरा. कार आणि इतर हलक्या वाहनांसाठी वापरले जाणारे ऑईल वापरू नका. ट्रॅक्टरचे कोणते भाग हलतात ते पहा, ते स्वच्छ करा आणि ग्रीस करा.
9. ओव्हरलोड करू नका
ट्रॅक्टरला शिफारसीनुसार लोड करा. तुमचा ट्रॅक्टर ओव्हरलोड करू नका, अन्यथा तो लवकरच खराब होईल.
तुमच्या ट्रॅक्टरचे आयुष्य तुम्ही तो किती चांगला मेंटेन करता यावर अवलंबून असते. तुम्ही वर नमूद केलेल्या टिप्सचे पालन करत असल्याची खात्री करा आणि त्याचा सर्वाधिक लाभ घेण्यासाठी ट्रॅक्टर मेंटेन करा.