भारतात मोठ्या संख्येने लोक दररोज प्रवास करण्यासाठी टू-व्हीलरचा वापर करतात. ट्रॅफिकमधील वाढीमुळे शाळा, महाविद्यालय आणि ऑफिसला वेळेवर पोहोचणे कठीण झाले आहे, ज्यामुळे टू-व्हीलर भारतीयांसाठी अलीकडेच वाहतूक करण्याच्या सर्वात प्राधान्यित पद्धतीपैकी एक बनली आहे. जलद आणि सुरक्षितपणे प्रवास करायचा असलेल्या लोकांच्या संख्येतील वाढीमुळे, टू-व्हीलरची मागणी वाढली आहे आणि त्यामुळे टू-व्हीलर लोन्सची गरज देखील वाढली आहे.
ईएमआय वर बाईक किंवा स्कूटी खरेदी करणे हा आजचा सर्वात सोपा पर्याय आहे. 2 व्हीलर लोन मिळविण्याचे काही लाभ येथे दिले आहेत:
1. परवडणारे: कमी इंटरेस्ट रेट्स, प्रोसेसिंग फी आणि डॉक्युमेंटेशन शुल्क!
टू-व्हीलर लोन इंटरेस्ट रेट उत्पन्न, बाईक स्पेसिफिकेशन्स इ. वर अवलंबून असते. तथापि, अलीकडील काळात, टू-व्हीलर लोन्स ची उच्च मागणी आणि टू-व्हीलर फायनान्स मार्केटमधील प्लेयर्सची संख्या वाढल्याने, इंटरेस्ट रेट ट्रेंड घसरत आहेत, ज्यामुळे बहुतांश व्यक्तींसाठी ते परवडणारे आहे. तसेच, प्रोसेसिंग फी आणि डॉक्युमेंटेशन शुल्क कमी आहे. त्याशिवाय, विविध कॅटेगरीसाठी बऱ्याच विशेष ऑफर्स आणि सवलती उपलब्ध आहेत जसे की महिला कस्टमर्ससाठी विशेष कमी इंटरेस्ट रेट्स.
2. सोपे आणि जलद: सहज ॲप्लिकेशन आणि जलद प्रोसेसिंग!
लोकांना लोनसाठी अप्लाय करण्यासाठी बँक आणि ऑफिसमध्ये लांब रांगेत उभे राहण्याचे आणि महिन्यापेक्षा जास्त काळ प्रतीक्षा करण्याचे दिवस गेले. मागील काही वर्षांमध्ये, लोन ॲप्लिकेशन आणि मंजुरी प्रक्रियेमध्ये बरेच सुधारणा झाल्या आहेत. अन्य लोन्स प्रमाणे नसून, टू-व्हीलर्ससाठी लोन ॲप्लिकेशन प्रोसेस जलद, सोपी आहे आणि कस्टमर्स त्यासाठी ऑनलाईनही अप्लाय करू शकतात. तसेच, एकदा ॲप्लिकेशन पूर्ण झाल्यानंतर, प्रोसेसिंगची वेळ 2 ते 3 कामकाजाच्या दिवसांपर्यंत कमी असू शकते. तसेच, डॉक्युमेंटेशन किमान आहे, ज्यामुळे बहुतांश लोक लोनसाठी पात्र ठरतात. म्हणूनच, लोन ॲप्लिकेशन, प्रोसेसिंग आणि मंजुरीची संपूर्ण प्रक्रिया फक्त काही दिवसांत होते. कस्टमरला छोट्या इंस्टॉलमेंट्समध्ये रक्कम परतफेड करण्याचा देखील लाभ आहे.
3. ग्रामीण भागात वाढता सहभाग
ग्रामीण भागातही, जिथे अतिशय थोड्या बँक आहेत, कस्टमर्सना लोन्स मिळविण्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. कमी क्रेडिट स्कोअर असलेले किंवा बँकांनी नाकारलेले ग्रामीण भागात राहणारे लोक नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांचा (एनबीएफसी) ॲक्सेस करू शकतात, ज्यामुळे अशा कर्जदारांना ईएमआय वर बाईक खरेदी करणे सोयीस्कर होते.
4. कमी फायनान्शियल भार आणि उच्च सिबिल स्कोअर
टू-व्हीलर लोनचा सर्वात मोठा लाभ कोणत्याही फायनान्शियल कोंडीचा सामना करावा लागत नाही. बाईक लोन नाममात्र मासिक फिक्स्ड इंटरेस्ट रेट्ससह येत असल्याने, प्रत्येक महिन्याला देय करणे सोपे आहे. तरुण व्यावसायिकांसाठी हा एक आदर्श पर्याय आहे, कारण चांगला सिबिल स्कोअर तयार करण्याची ही एक चांगली संधी आहे.
लोनला ओझे समजू नका - त्याचा उद्देश तो फायनान्शियल भार तुमच्या खांद्यावरून काढून टाकणे हा आहे. टू-व्हीलर लोनचा सर्वाधिक लाभ घ्या आणि तुमच्या बहुतांश फायनान्शियल समस्यांचे निराकरण करा