बाईक लोन शोधत आहात परंतु आगाऊ शुल्कांविषयी चिंता वाटते का? 100%. फायनान्सिंग आता शक्य आहे! टीव्हीएस क्रेडिटचे झिरो डाउन पेमेंट बाईक लोन तुम्हाला कोणत्याही आगाऊ खर्चाशिवाय तुमची इच्छित टू-व्हीलर खरेदी करू देते*.
या ब्लॉगमध्ये झिरो डाउन पेमेंट बाईक लोन्स विषयी तुम्हाला माहित असायला हवे असे सर्वकाही जाणून घेता येईल. तुम्ही पहिल्यांदा खरेदी करत असाल किंवा अपग्रेड करू इच्छित असाल तरीही यामुळे तुम्हाला प्रोसेस नेव्हिगेट करण्यास मदत होईल.
डाउन पेमेंट म्हणजे काय?
डाउन पेमेंट म्हणजे टू-व्हीलर खरेदी करताना खरेदीदार खिशातून भरत असलेली सुरुवातीची रक्कम. खरेदीदार खरेदीच्या वेळी हे पेमेंट करतो आणि ते वाहनाच्या एकूण खर्चाची टक्केवारी दर्शविते. टू-व्हीलर लोन उर्वरित बॅलन्स कव्हर करते. त्यामुळे, जर तुम्हाला तुमच्या टू-व्हीलरसाठी 95% फायनान्सिंग मिळाले, तर तुम्हाला तुमच्या बाईक खरेदीच्या वेळी डाउन पेमेंट म्हणून उर्वरित 5% भरावे लागेल.
झिरो डाउन पेमेंट टू-व्हीलर लोन म्हणजे काय?
बाईक आणि स्कूटर खरेदीसाठी मदत करण्यासाठी बँक आणि फायनान्शियल कंपन्या टू-व्हीलर लोन्स ऑफर करतात. बहुतांश वेळा, हे लोन्स वाहनाच्या ऑन-रोड किंमतीच्या 95%* पर्यंत कव्हर करतात.
झिरो डाउन पेमेंट टू-व्हीलर लोन खरेदीदाराला कोणत्याही अपफ्रंट डिपॉझिट किंवा पेमेंटशिवाय त्यांचे इच्छित वाहन खरेदी करण्याची परवानगी देते. असे लोन, नाममात्र प्रोसेसिंग फी वगळता कोणत्याही छुपे किंवा अतिरिक्त खर्चाशिवाय त्वरित मालकी सक्षम करते, जे तुम्ही बाईक लोनसाठी अप्लाय करा तेव्हा लेंडर आकारणी करेल.
ते पारंपारिक बाईक लोन्सपेक्षा कसे वेगळे आहे?
झिरो डाउन पेमेंट लोन तुमच्या सामान्य बाईक लोन सारखे नाही. या पर्यायासह, तुम्हाला पहिल्यांदा कोणतेही पैसे टाकण्याची गरज नाही. TVS क्रेडिटद्वारे ऑफर केलेले टू-व्हीलर लोन कर्जदाराच्या प्रोफाईलनुसार वाहनाच्या ऑन-रोड किंमतीच्या 100%* कव्हर करते.
आता तुम्ही बाईक डीलरशिप किंवा शोरूमला भेट देऊ शकता आणि झिरो डाउन पेमेंट लोनसह कोणत्याही समस्येशिवाय तुमच्या आवडीची बाईक खरेदी करू शकता.
झिरो डाउन पेमेंट बाईक लोनचे फायदे
फायनान्सिंगच्या पारंपारिक पद्धतींच्या तुलनेत, झिरो डाउन पेमेंट बाईक लोन घेण्याचे अनेक लाभ आणि फायदे आहेत जसे की:
- 100% फंडिंग: एनबीएफसी/बँक बाईकची संपूर्ण किंमत कव्हर करते
- सोयीस्कर ईएमआय: तुम्ही परवडणाऱ्या नियमित मासिक हप्त्यांद्वारे लोन रिपेमेंट करू शकता
- कोणतेही छुपे शुल्क नाही: टू-व्हीलर लोन ॲप्लिकेशनच्या वेळी नाममात्र प्रोसेसिंग शुल्काव्यतिरिक्त कोणतेही छुपे किंवा अतिरिक्त शुल्क नाही
- किमान डॉक्युमेंटेशन: किमान, त्रासमुक्त ऑनलाईन डॉक्युमेंटेशनसह जलद प्रोसेसिंग
झिरो डाउन पेमेंट लोन वर्सिज डाउन पेमेंटसह पारंपारिक बाईक लोनवर भरलेल्या एकूण इंटरेस्टमध्ये काही फरक आहे का?
जेव्हा तुम्ही पारंपारिक बाईक लोन्स पेक्षा झिरो डाउन पेमेंट लोन्स निवडत असाल, तेव्हा लक्षात ठेवा की तुम्हाला तुमच्या लोन कालावधीवर एकूण अधिक इंटरेस्ट भरावे लागेल.
निर्णय घेताना, तुमच्या रिपेमेंट क्षमतेवर आधारित सर्वोत्तम निवड करण्यासाठी संपूर्ण कालावधीमध्ये लोन किती खर्च येईल हे विचारात घ्या.
सर्वोत्तम डील मिळविण्यासाठी टिप्स
जेव्हा तुम्हाला बाईक लोन मिळवायचे असेल, तेव्हा केवळ सर्वात कमी इंटरेस्ट रेटवर लक्ष केंद्रित करू नका. झिरो डाउन पेमेंट बाईक लोनवर सर्वोत्तम डील मिळवण्यासाठी, खालील गोष्टी लक्षात ठेवा:
- विद्यमान लेंडर संबंधाचा लाभ घ्या: तुमच्या लेंडरशी विद्यमान संबंध असल्याने तुमची क्रेडिट पात्रता व्हेरिफाय करणे सोपे होते. यामुळे तुमची चांगले इंटरेस्ट रेट्स मिळविण्याची शक्यता देखील वाढते.
- मार्केट तुलना: लोन-टू-व्हॅल्यू (एलटीव्ही) गुणोत्तर, इंटरेस्ट रेट्स, प्रोसेसिंग फी आणि विविध लेंडरच्या एकूण किंमती यांचा सर्वसमावेश अभ्यास करा.
- विशेष डील्स शोधा: वर्षाच्या काही वेळा विक्री, जसे की सणासुदीचे हंगाम आणि विशेष प्रसंग तुम्हाला मोफत इन्श्युरन्स, कमी फी आणि चांगले लोन-टू-व्हॅल्यू रेशिओ यासारखे लाभ देऊ शकतात.
झिरो डाउन पेमेंट लोनसाठी कोण पात्र आहे?
पात्रता निकष लेंडरनुसार बदलू शकतात, तर येथे काही सामान्य पात्रता आवश्यकता आहेत:
- तुमचे वय 18-65 दरम्यान असावे, जर तुमचे वय 21 वर्षांपेक्षा कमी असेल तर तुम्ही हमीदारासह लोनसाठी अप्लाय करू शकता
- तुम्ही भारतीय नागरिक असावे
- तुमचा सिबिल स्कोअर/क्रेडिट स्कोअर 750 पेक्षा जास्त असावा
- वेतनधारी अर्जदारांकडे किमान 1 वर्षाचा एकूण कामाचा अनुभव असावा
- स्वयं-रोजगारित असल्यास, तुमच्याकडे स्थिर उत्पन्नाचा पुरावा असावा (उत्पन्नाच्या गणनेसह आयटीआर)
घटक | झिरो डाउन पेमेंट टू-व्हीलर लोन | पारंपारिक टू-व्हीलर लोन |
---|---|---|
डाउन पेमेंट | कोणतेही आगाऊ पेमेंट नाही | डाउन पेमेंट म्हणून किमान रक्कम आवश्यक आहे, जी कर्जदाराच्या प्रोफाईलनुसार बदलू शकते |
इंटरेस्ट रेट्स | लेंडरसाठी वाढलेल्या रिस्कमुळे एकूण जास्त इंटरेस्ट रेट | सामान्यपणे आंशिक पेमेंटमुळे कमी इंटरेस्ट रेट लेंडरसाठी जोखीम कमी करते. टीव्हीएस क्रेडिट येथे टू-व्हीलर लोन इंटरेस्ट रेट विषयी अधिक जाणून घ्या |
लोन रक्कम कव्हरेज | बाईकची 100%* ऑन-रोड किंमत कव्हर केली जाते | वाहनाच्या ऑन-रोड किंमतीच्या 95%* पर्यंत कव्हर केले जाते |
रोख प्रवाह | लेंडरद्वारे अपफ्रंट पेमेंटमुळे तुमचा कॅश फ्लो प्रभावित होत नाही | तुमच्या कॅशफ्लो आणि फायनान्सवर परिणाम होतो कारण लोनच्या डाउन पेमेंटमध्ये मोठी रक्कम जाते |
जर तुम्हाला चांगला कॅशफ्लो राखण्याची इच्छा असेल आणि आगाऊ खर्चाशिवाय पेमेंट चांगल्या प्रकारे मॅनेज करायची असेल तर झिरो डाउन पेमेंट लोन फायदेशीर असू शकते.
तुमची आर्थिक परिस्थिती, प्राधान्य आणि सोयीवर आधारित तुमची निवड विचारपूर्वक करा. विचारात घेण्याचा एक पर्याय म्हणजे टीव्हीएस क्रेडिट, जे तुमच्या प्रोफाईलवर आधारित झिरो-डाउन पेमेंट बाईक लोन्स ऑफर करते आणि कोणत्याही अडचणीशिवाय त्वरित लोन प्रदान करते. त्यामुळे आता अधिक प्रतीक्षा करू नका आणि आत्ताच टीव्हीएस क्रेडिटसह टू-व्हीलर लोनसाठी अप्लाय करा!
एफएक्यू –
- मी डाउन पेमेंटशिवाय लोन घेऊ शकतो/शकते का?
होय, काही प्रकरणांमध्ये कोणत्याही सुरुवातीच्या पेमेंटशिवाय तुम्ही लोन सुरक्षित करू शकता. झिरो डाउन पेमेंट बाईक लोन लेंडरला तुमच्या बाईकच्या संपूर्ण खर्चासाठी फायनान्स करू देते. याचा अर्थ असा की तुम्ही कोणतेही आगाऊ पेमेंट न करता तुमची इच्छित टू-व्हीलर खरेदी करू शकता.
- बाईक लोनसाठी किमान डाउन पेमेंट किती आहे?
बाईक डाउन पेमेंट सामान्यपणे बाईकच्या मूल्याच्या 10% आणि 30% दरम्यान बदलते. अनेक खरेदीदार कमी ईएमआय (समान मासिक हप्ते) चा लाभ घेण्यासाठी आणि दीर्घकाळात त्यांचे आर्थिक दायित्व सुलभ करण्यासाठी या कमी प्रारंभिक पेमेंटची निवड करतात.
- डाउन पेमेंट अनिवार्य आहे का?
काही प्रकरणांमध्ये टू-व्हीलर लोन्ससाठी डाउन पेमेंट अनिवार्य नाही. टीव्हीएस क्रेडिट 60 महिन्यांपर्यंतच्या लोन अटी आणि स्पर्धात्मक इंटरेस्ट रेट्ससह विविध प्लॅन्स ऑफर करते. आमच्या वर्तमान टू-व्हीलर फायनान्सिंग पर्यायांच्या तपशिलासाठी, कृपया आमच्या टू-व्हीलर लोन प्रॉडक्ट पेजला भेट द्या.
- झिरो डाउन पेमेंट का खराब आहे?
शून्य डाउन पेमेंट लोन्स उच्च इंटरेस्ट रेट्स, विस्तारित लोन कालावधी आणि अतिरिक्त फी यासारख्या त्रुटींसह येऊ शकतात. हे घटक लोनचा एकूण खर्च वाढवू शकतात, त्यामुळे आगाऊ पेमेंट न करण्याच्या लाभाविरूद्ध हे वजन करणे महत्त्वाचे आहे.
अस्वीकृती: आम्ही आमच्या वेबसाईट आणि असोसिएट प्लॅटफॉर्मद्वारे ऑफर केलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस अचूक असल्याची खात्री करत असलो तरीही, कंटेंटमध्ये अनपेक्षित त्रुटी आणि/किंवा टायपोग्राफिकल त्रुटी असू शकतात. या साईट आणि संबंधित वेबसाईटवरील माहिती सामान्य माहितीच्या हेतूसाठी आहे आणि कोणत्याही विसंगतीच्या बाबतीत, प्रॉडक्ट/सर्व्हिस डॉक्युमेंटमध्ये नमूद केलेला तपशील प्राधान्य घेईल. वाचक (ऑडियन्स) आणि सबस्क्रायबर्सना प्रोफेशनल सल्ला घेण्यासाठी आणि प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसचा लाभ घेण्यापूर्वी माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी प्रॉडक्ट/सर्व्हिस डॉक्युमेंट्स पाहण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.
*अटी व शर्ती लागू - जेथे लागू असेल तेथे.