सेकंड-हँड कार खरेदी करण्याची योजना आहे का?
खरेदी करायची की नाही याची खात्री नाही का?
तर मग तुम्ही खरेदी करावी! जुन्या कार परवडणाऱ्या असतात, त्यांचे डेप्रिसिएशन कमी असते, कमी इन्श्युरन्सची आवश्यकता असते आणि वॉरंटीसह असतात, जे त्यांना एखाद्या नवीन कार इतक्याच चांगल्या बनवते! हे सर्व तुमच्या निवड प्रक्रियेवर अवलंबून असते.
जुन्या कारचे मार्केट मोठे आहे आणि वेगाने वाढत आहे. तथापि, भारतातील सेकंड-हँड कार उद्योग तितका संघटित नाही, ज्यामुळे कोणताही कार डीलर किती विश्वासार्ह आहे हे ठरवणे कठीण होते. तुम्हाला हजारो गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे, जसे की. डॉक्युमेंट्स, इन्श्युरन्स, कार लोन इंटरेस्ट रेट आणि बरंच काही. जर तुम्हाला कार डीलर्स किंवा मालकांकडून दिशाभूल करून घ्यायची नसेल, तर तुम्ही अशा व्यक्तीचा सल्ला घ्यावा जो तुम्हाला संपूर्ण प्रोसेस समजावून सांगू शकेल.
जुनी कार खरेदी करण्यासाठी येथे काही उपयुक्त टिप्स आहेत:
स्टेप1: तुमचा विक्रेता काळजीपूर्वक निवडा
इतर कोणत्याही गोष्टीवर निर्णय घेण्यापूर्वी, पहिली स्टेप म्हणजे तुम्हाला कोणाकडून जुनी कार खरेदी करायची आहे हे ठरवणे. भारतात तीन पर्याय प्रचलित आहेत: तुम्ही ती कोणतीही व्यक्ती, ब्रोकर किंवा फ्रँचाईज्ड प्री-ओन्ड डीलर कडून खरेदी करू शकता. जर तुम्हाला विक्रेता माहित असेल तर पहिला पर्याय निश्चितच सर्वोत्तम आहे! वैकल्पिकरित्या, तुम्ही स्मॉल-स्केल जुन्या कारच्या ब्रोकरकडून खरेदी करू शकता. तथापि, त्यांनी सांगितलेल्या किंमतीबद्दल वाटाघाटी करण्याचे सुनिश्चित करा आणि कारची कसून तपासणी करा, कारण बऱ्याचदा त्यांना ती घाईघाईने विकायची असते. शेवटी, तुम्ही मार्केटमधील इतर कंपन्यांकडून खरेदी केल्यास तुम्हाला थोडा जास्त खर्च करावा लागेल, परंतु तुम्हाला कारच्या स्थितीबद्दल काळजी करण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे घाई करू नका, तुमच्या प्राधान्यांबद्दल विचार करा आणि त्यानुसार निर्णय घ्या.
स्टेप2: तुमची तयारी पूर्ण ठेवा
- मॉडेल निवडा:
या स्टेपमध्ये व्यापक संशोधनाचा समावेश होतो. जर तुम्हाला विशिष्ट मेकमध्ये स्वारस्य असेल तर त्याचे फायदे आणि तोटे याविषयी अशा कारच्या मालकांना विचारा. रनिंग आणि मेंटेनन्स खर्चाविषयी चौकशी करा जेणेकरून दीर्घकाळात खरेदी करणे किफायतशीर आहे की नाही हे तुम्हाला कळेल. मॉडेलवर अंतिम निर्णय घेतल्यानंतर, पुढील स्टेपवर जा.
- किंमतीसाठी वाटाघाटी करा:
तुम्ही खरेदी करू इच्छित असलेल्या कारच्या रेट्सविषयी ऑनलाईन आणि ऑफलाईन संशोधन करा जेणेकरून तुम्ही वाटाघाटी करू शकाल. तथापि, उत्पादन वर्ष, कारची स्थिती आणि अगदी रंगानुसार रेट्स बदलतात हे विसरू नका.
- फीचर्स जाणून घ्या:
तुम्ही फक्त पैशाचा विचार करू नये; तर, तुम्हाला कारचे फीचर्स देखील माहित असणे आवश्यक आहे जेणेकरून कारची तपासणी करताना, कोणते घटक आणि ॲक्सेसरीज गहाळ आहेत हे शोधून काढता येईल. अरे हो, ही तर पुढची स्टेप आहे!
स्टेप3: कारची कसून तपासणी करा
डीलवर अंतिम निर्णय घेण्यापूर्वी, कारची विश्वासार्ह मेकॅनिककडून तपासणी करून घ्या जेणेकरून काही समस्या आढळल्यास, तुम्ही मालकाकडून त्याचे निराकरण करू शकता किंवा त्यासाठी वाटाघाटी करू शकता.
- कारची कामगिरी प्रामुख्याने इंजिनवर अवलंबून असते. इंजिनशी संबंधित कोणतेही नुकसान तुम्हाला महागात पडू शकते, त्यामुळे ते योग्यरित्या काम करत असल्याची खात्री करा. तसेच, एअर, फ्यूएल, ट्रान्समिशन आणि ऑईल फिल्टर बदला.
- ब्रेक्स तपासण्यासाठी टेस्ट ड्राईव्ह घ्या. कमी आणि उच्च गतीने वाहन चालवण्याचा प्रयत्न करा आणि त्यात कोणतेही व्हायब्रेशन किंवा विचित्र आवाज आहे का ते पाहा. तसेच, कार कोणत्याही एका दिशेला खेचली जात नाही ना हे तपासा.
- किरकोळ डेंट्स आणि स्क्रॅच ही मोठी गोष्ट नाही. तथापि, कारचा पूर्वी कोणताही मोठा अपघात झाला नाही याची खात्री करा.
- एकदा इंटिरिअर पाहा आणि स्टिअरिंग, सीट, डोअर हँडल इ. चांगल्या स्थितीत असल्याची खात्री करा. एअर कंडिशनर, म्युझिक सिस्टीम आणि पॉवर विंडोज सारखी इलेक्ट्रिक उपकरणे चांगली काम करत आहेत का ते तपासा.
- शेवटी, सर्व टायर तपासण्यास विसरू नका.
स्टेप4: पेपरवर्क व्यवस्थित करा
पहिली स्टेप म्हणजे मालकी तुमच्या नावावर ट्रान्सफर करणे. तुमच्या नावावर रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (आरसी) ट्रान्सफर करा आणि नंतर अन्य पेपर्स तपासा. आरसी तुमच्या नावावर असले तरीही जर इन्श्युरन्स तुमच्या नावावर नसेल तर ते रद्द मानले जाईल. त्यामुळे तुम्ही तुमच्या नावावर इन्श्युरन्स पॉलिसी ट्रान्सफर करत असल्याची खात्री करा किंवा नवीन पॉलिसी मिळवा. कारला कधी अपघात झाला आहे का ते पाहा आणि एनसीबी (नो क्लेम बोनस) तपासा - एनसीबी जितका जास्त असेल, तितका चांगला आहे. तुम्ही खरेदी करत असलेल्या कारवर कोणतेही प्रलंबित लोन्स नाहीत याची खात्री करा. त्यासाठी आवश्यक फॉर्म तपासा. वैध पोल्युशन अंडर कंट्रोल (पीयूसी) सर्टिफिकेट, रोड टॅक्स पावती, कार खरेदी बिल, एनओसी इ. सारखी इतर सर्व आवश्यक डॉक्युमेंट्स मिळवा.
बोनस टिप:
जर तुम्ही कार खरेदी करण्यासाठी लोन घेण्याची योजना बनवत असाल तर यूज्ड कार लोन इंटरेस्ट रेट्स पूर्वीच तपासण्यास विसरू नका. तुमच्या पहिल्या ड्राईव्हच्या आधी तुमची कार धुवून घ्या आणि किरकोळ दुरुस्ती करा जेणेकरून तुम्ही तुमच्या स्मार्ट खरेदीचा पूर्ण आनंद घेऊ शकाल!