आज जेव्हा वाहन खरेदी करण्याची वेळ येते, तेव्हा तुमच्यासमोर अनेक पर्याय उपलब्ध असतात. ऑटोमोबाईल उत्पादक कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढत आहे, परिणामी परवडणाऱ्या रेट्समध्ये अधिक पर्याय उपलब्ध होत आहेत. सेकंड हँड कार उद्योग झपाट्याने वाढत आहे. ते दिवस गेले जेव्हा जुनी कार खरेदी करणे कठीण होते. मिलेनियल्स विशेषतः, दर काही वर्षांनी कार बदलतात, परिणामी विक्रीयोग्य जुन्या कारची संख्या सतत वाढत आहे. आज, तुम्ही ती केवळ मालकांकडूनच नव्हे तर प्रमाणित जुन्या कारच्या डीलर्सकडून देखील खरेदी करू शकता.
अशातयूज्ड कार लोन घेणे आता पूर्वीसारखे अवघड राहिले नाही. तथापि, जर तुम्ही लोनवर जुनी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमची खरेदी सुलभ आणि जलद करण्यासाठी तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
लोनवर जुनी कार खरेदी करताना तुम्ही विचारात घेणे आवश्यक असलेल्या काही गोष्टी येथे आहेत:
1. तुमची पात्रता तपासा
वेतनधारी आणि स्वयं-रोजगारित व्यावसायिकांसाठी उत्पन्न आणि नोकरीच्या वर्षांच्या संख्येनुसार भिन्न पात्रता निकष आहेत. त्यामुळे, तुम्ही प्री-ओन्ड कार लोनसाठी पात्र आहात की नाही ते तपासा. [आमच्या जुनी कार पात्रता कॅल्क्युलेटरवर तुमची पात्रता तपासा]
2. तुमची डॉक्युमेंट्स पुन्हा तपासा
पात्रता तपासल्यानंतर, तुमच्याकडे लोनकरिता अप्लाय करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व डॉक्युमेंट्स असल्याची खात्री करा. उदाहरणार्थ, तुम्हाला ओळखीचा पुरावा, वयाचा पुरावा, पत्त्याचा पुरावा, उत्पन्नाचा पुरावा आणि स्वाक्षरी व्हेरिफिकेशन पुराव्याची आवश्यकता असेल.
3. बजेट आधीपासून निर्धारित करा
तुम्हाला खरेदी करावयाची कार ठरवा! कमी बजेटच्या छोट्या कार्सपासून ते मोठ्या बजेटच्या एसयूव्ही पर्यंत विविध मॉडेल्स तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. कार निवडण्यासाठी, तुम्ही पहिल्यांदा तुमचे बजेट ठरवणे आवश्यक आहे. त्यामुळे, तुमच्या उत्पन्नावर आधारित तुमचे बजेट ठरवा आणि तुम्ही किती ईएमआय भरू शकता ते पहा.
4. तुमच्या क्रेडिट रिपोर्टचे विश्लेषण करा
तुमचा क्रेडिट स्कोअर 750 पेक्षा जास्त असल्याची खात्री करा. सिबिल स्कोअर चांगला असल्याने तुमच्या लोनला मंजूरी मिळण्याची शक्यता वाढते, तुम्ही भूतकाळात कितीही लोन्स घेतली असली तरीही. एकमेव अट म्हणजे तुम्ही सर्व ईएमआय वेळेवर भरले पाहिजेत. [तुमचा सिबिल स्कोअर कॅल्क्युलेट करा]
[Read about our tips on increasing your CIBIL Score]
5. कमी कालावधी निवडा
जुन्या कारचे मूल्य वाढत्या वेळेबरोबर कमी होते. तुम्ही ती जितक्या लवकर विकाल तितकी जास्त किंमत तुम्हाला मिळेल. याव्यतिरिक्त, तुम्हाला दीर्घ कालावधीच्या तुलनेत कमी कालावधीवर कमी इंटरेस्ट द्यावा लागेल. त्यामुळे, तुमचा कालावधी कमी करण्याचा सल्ला दिला जातो जेणेकरून तुम्ही लवकरच तुमचे लोन फेडू शकता.
6. फसवणुकीपासून सावध रहा
नेहमी प्रतिष्ठित डीलरकडून खरेदी करा, अन्यथा तुम्ही फसव्या ऑफरला बळी पडण्याची शक्यता असते. ते अपघातग्रस्त कार विकण्याचा प्रयत्न करत असण्याची शक्यता आहे. तुमचा क्रेडिट रिपोर्ट खराब असल्याचा दावा करून ते तुम्हाला जास्त इंटरेस्ट रेट्स देऊ शकतात. त्यामुळे, डीलरशी बोलण्यापूर्वी तुम्ही तुमची सर्वोत्तम तयारी केल्याचे सुनिश्चित करा आणि फसवणूक करणाऱ्यांपासून सावध रहा.
बँका आणि इतर फायनान्शियल संस्थाना समजते की लोक विविध कारणांसाठी जुनी कार खरेदी करतात. त्यामुळे, या दिवसांमध्ये, बँकांकडे आकर्षक ऑफर आणि कमी कार लोन्स इंटरेस्ट रेट्ससह विविध प्रकारचे यूज्ड कार लोन आहेत. लोनवर जुनी कार खरेदी करण्यास अजिबात संकोच करू नका. जुन्या कारसाठी लोन्स मिळवताना लोकांकडून होणाऱ्या सामान्य चुका टाळण्यासाठी फक्त वरील टिप्स लक्षात ठेवा.