₹1 लाखांपर्यंत त्वरित लोन मिळविण्यासाठी टीव्हीएस क्रेडिटद्वारे प्रदान केलेले इन्स्टाकार्ड ही पूर्व-मंजूर क्रेडिट मर्यादा सुविधा आहे*
सुलभ ईएमआय पेमेंट पर्यायासह तुमच्या नजीकच्या मर्चंट स्टोअरवर खरेदी करा. 25,000 पेक्षा अधिक मर्चंट स्टोअर्समध्ये स्वीकृत.
अधिक जाणून घ्याकोणत्याही त्रासाशिवाय आमच्या कोणत्याही ऑनलाईन मर्चंट स्टोअरमधून तुमच्या सोयीनुसार खरेदी करा
अधिक जाणून घ्याकेवळ 30 मिनिटांमध्ये तुमच्या नोंदणीकृत बँक अकाउंटमध्ये ₹25,000 पर्यंत ट्रान्सफर करून तुमच्या सर्व त्वरित कॅश गरजांसाठी सोपा 2 क्लिक पर्याय.
अधिक जाणून घ्याटीव्हीएस क्रेडिट साथी ॲप डाउनलोड करा
तुमचे इन्स्टाकार्ड ॲक्टिव्हेट करा
तुमचे इन्स्टाकार्ड वापरा
जीवनशैली, गृह सुधारणा, शिक्षण, आरोग्य, प्रवास, फर्निचर, उपकरणे इ. सारख्या दुकानांमध्ये ही क्रेडिट मर्यादा वापरा.
तुमच्या सोयीनुसार तुमचे EMI प्लॅन करा. तुमची खरेदी 3, 6, 9, 12, 18 किंवा 24 महिन्यांच्या सुलभ EMI मध्ये विभाजित करा.
टीव्हीएस क्रेडिट साठी ॲप किंवा आमचे मर्चंट स्टोअर्सद्वारे लोन साठी विनंती करा आणि कोणत्याही डॉक्युमेंटेशनच्या त्रासाशिवाय त्वरित लोन डिस्बर्सल मिळवा.
टीव्हीएस क्रेडिटसह पॅनेल असलेल्या कोणत्याही मर्चंट आऊटलेटला भेट द्या आणि झिरो कॉस्ट ईएमआय प्राप्त करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर शेअर करा*.
दुकानाच्या ऑनलाईन खरेदीवर शून्य प्रक्रिया शुल्काचा आनंद घ्या*
शुल्काचे शेड्यूल | शुल्क (जीएसटी सहित) |
---|---|
प्रोसेसिंग फी | 10% पर्यंत |
दंडात्मक शुल्क | पेमेंट न केलेल्या इंस्टॉलमेंटवर प्रति वर्ष 36% |
फोरक्लोजर आकार | निरंक | अन्य शुल्क |
बाउन्स शुल्क | Rs.500 |
ड्युप्लिकेट एनडीसी/एनओसी शुल्क | Rs.250 |
शुल्कांच्या संपूर्ण यादीसाठी, कृपया येथे क्लिक करा
अस्वीकृती : हे परिणाम केवळ सूचक स्वरुपात आहे. वास्तविक परिणाम बदलू शकतात. अचूक तपशिलासाठी, कृपया आमच्याशी संपर्क साधा.
तुम्ही टीव्हीएस क्रेडिट साथी ॲपमार्फत पूर्व-मंजूर क्रेडिट लिमिट लोन सुविधा ॲक्टिव्हेट करू शकता. स्टेप्स खालीलप्रमाणे आहेत:
इन्स्टाकार्ड ऑनलाईन आणि ऑफलाईन मर्चंट नेटवर्क्समध्ये शॉपिंग, खरेदी आणि पेमेंट गरजांसाठी वापरले जाऊ शकते, ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स, कंझ्युमर ड्युरेबल्स, लाईफस्टाईल, घरगुती उपकरणे, फर्निचर, शिक्षण, आरोग्य, प्रवास, देशांतर्गत वापर इ. सारख्या कॅटेगरींचा समावेश होतो.
टीव्हीएस क्रेडिट साथी ॲप किंवा मर्चंट स्टोअर्सद्वारे सबमिट केलेल्या लोन विनंतीनुसार सर्व ट्रान्झॅक्शन्स लोनमध्ये रूपांतरित केले जातात. 3%* पर्यंत मासिक इंटरेस्ट रेट लागू आहे. कृपया रिपेमेंट कालावधी पर्याय समजून घेण्यासाठी खालील ग्रिडचा संदर्भ घ्या.
रक्कम (₹) | 3 महिने | 6 महिने | 9 महिने | 12 महिने | 15 महिने | 18 महिने | 24 महिने |
---|---|---|---|---|---|---|---|
3000 पासून 5,000 | |||||||
5,001 ते 10,000 | |||||||
10,001 ते 20,000 | |||||||
20,001 ते 30,000 | |||||||
30,001 ते 40,000 | |||||||
40,001 ते 50,000 |
तुम्ही वेळोवेळी केलेल्या अटी व शर्तींनुसार तुमचे इन्स्टाकार्ड वापरून मंजूर मर्यादेच्या आत कमाल 3 समांतर लोन्स प्राप्त करू शकता.
तुम्ही एकाच ट्रान्झॅक्शनमध्ये किमान ₹3000 ट्रान्झॅक्शन आणि कमाल ₹50,000 ट्रान्झॅक्शन करू शकता.
तुमच्या इन्स्टाकार्ड इंस्टंट लोनसाठी तुमचे मासिक ईएमआय तुमच्या मागील लोनसाठी आमच्याकडे रजिस्टर्ड असलेल्या समान बँक अकाउंटमधून डेबिट केले जाईल.
होय, तुमच्या इंस्टाकार्ड वर, यशस्वी ट्रान्झॅक्शनसाठी लोन डिस्बर्समेंटच्या तारखेपासून तुम्हाला इंटरेस्ट आकारले जाईल.
इन्स्टाकार्ड बँक ट्रान्सफर पर्याय वापरण्याच्या स्टेप्स:
इन्स्टाकार्ड मर्चंट स्टोअर पर्याय वापरण्याच्या स्टेप्स:
इन्स्टाकार्ड शॉप ऑनलाईन पर्याय वापरण्याच्या स्टेप्स:
तुम्ही टीव्हीएस क्रेडिट साथी ॲपमध्ये व्हर्च्युअल ईएमआय कार्ड ॲक्सेस करू शकता. जो एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर ठरतो. परंतु जर तुम्हाला फिजिकल इन्स्टाकार्ड आवश्यक असेल तर तुम्ही ₹100 भरून विनंती करू शकता.
जर तुम्हाला माझ्या इन्स्टाकार्ड वर लोन सुविधा प्राप्त करण्याबाबत कोणतेही शंका असेल किंवा सहाय्य पाहिजे असेल तर तुम्ही आमच्याशी 044-66-123456 वर संपर्क साधू शकता किंवा helpdesk@tvscredit.com वर ईमेल द्वारे संपर्क साधू शकता.
कर्जदाराने ("कर्जदार") लोन ॲग्रीमेंट ("मास्टर लोन ॲग्रीमेंट") अंतर्गत घेतलेल्या लोनच्या संबंधात, कर्जदाराने टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेड ("“टीव्हीएस क्रेडिट / कंपनी”) द्वारे ऑफर केलेल्या पूर्व-मंजूर लोन प्रोग्राममध्ये (खाली परिभाषित) नावनोंदणी करण्याचा पर्याय निवडला आहे. ज्यामध्ये कर्जदाराने पूर्व-मंजूर क्रेडिट मर्यादेसह मंजुरी दिली आहे, पात्रता निकषांची पूर्तता करण्याच्या अधीन राहून, कस्टमरला बँक अकाउंटमध्ये फंड ट्रान्सफर करण्याद्वारे किंवा टीव्हीएस क्रेडिटने पॅनेल केलेल्या मर्चंट आस्थापना आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म येथे खरेदीसाठी क्रेडिट सुविधेचा वापर करण्याचा अधिकार असेल.
येथे नमूद केलेले अटी व शर्ती ("अटी व शर्ती") कर्जदाराद्वारे पूर्व-मंजूर लोन प्रोग्राममध्ये नोंदणीसाठी लागू आहेत. मास्टर लोन ॲग्रीमेंटच्या अटींसह वाचल्या जाणाऱ्या या अटी व शर्ती मिळून टीव्हीएस क्रेडिट आणि कर्जदारादरम्यान वेळोवेळी केलेल्या सुधारणांनुसार संपूर्ण ॲग्रीमेंट बनतात.
पूर्व-मंजूर लोन प्रोग्राम अंतर्गत नावनोंदणीसाठी साईन-अप प्रोसेस पूर्ण करून, कर्जदाराने येथे नमूद अटी व शर्ती स्पष्टपणे वाचल्या, समजल्या, स्वीकारल्या आणि त्यांच्याद्वारे बांधील असल्याचे मानले जाते. टीव्हीएस क्रेडिट कोणत्याही वेळी पूर्व-मंजूर लोन प्रोग्राम अंतर्गत ऑफर केलेल्या अटी व शर्ती, फीचर्स आणि लाभांमध्ये बदल करण्याचा अधिकार राखून ठेवते, ज्यामध्ये कोणत्याही मर्यादेशिवाय, विद्यमान बॅलन्सवर परिणाम करणारे बदल, कॅल्क्युलेशन पद्धती समाविष्ट आहेत. पात्र कर्जदार मान्य करतो की सुधारित अटींच्या अंतर्गत झालेल्या सर्व शुल्कांसाठी आणि इतर सर्व बांधिलकींसाठी तो उत्तरदायी असेल.
1.1. या डॉक्युमेंटमध्ये, खालील शब्द आणि वाक्यांचा अर्थ खालीलप्रमाणे असेल:
(a)"पूर्व-मंजूर लोन प्रोग्राम" म्हणजे कंपनीद्वारे ऑफर केलेला आणि कर्जदाराद्वारे आवश्यक शुल्क भरून संमती दिलेला प्रोग्राम, ज्यामध्ये कर्जदाराची पात्रता निकष पूर्ण करण्याच्या अधीन सदस्य म्हणून नावनोंदणी केली जाऊ शकते.
(b)"इन्स्टाकार्ड/कार्ड" याचा अर्थ येथे कर्जदाराला दिलेले फिजिकल किंवा व्हर्च्युअल कार्ड (युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असलेले) असा आहे. हे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड किंवा प्रीपेड कार्ड इ. नाही आणि टीव्हीएस क्रेडिटद्वारे टीव्हीएस क्रेडिटसह पार्टनर असलेल्या मर्चंट (ऑफलाईन आणि ऑनलाईन) नेटवर्कसह पूर्व-मंजूर मर्यादेच्या सहज ओळख आणि वापरासाठी कर्जदाराला जारी केले जाते, अशा कर्जदाराने यापूर्वी टीव्हीएस क्रेडिटमधून कोणतीही लोन सुविधा प्राप्त केली असो वा नसो.
(c)"फी/शुल्क" म्हणजे या अटी व शर्तींमध्ये नमूद केलेले असे शुल्क. येथे नमूद केलेले सर्व तपशील कर्जदाराला विशिष्टपणे कळवले नसल्यास आणि वेळोवेळी केलेल्या सुधारणांनुसार लोन टर्म शीटमध्ये प्रदान केले जातील.
(d)"ईएमआय/समान मासिक हप्ते" म्हणजे कर्जदाराद्वारे टीव्हीएस क्रेडिटला प्रिन्सिपल रक्कम, इंटरेस्ट आणि इतर शुल्कांचा समावेश असलेली प्रत्येक महिन्याला देय रक्कम.
(e)"पूर्व-मंजूर लोन – ॲप्लिकेशन फॉर्म" याचा अर्थ आणि यात समाविष्ट आहे टीव्हीएस क्रेडिटद्वारे वेळोवेळी निर्धारित स्वरूपात आणि पद्धतीने कर्जदाराने मान्य केलेले, अंमलात आणलेले/ अंमलात आणावयाचे ॲप्लिकेशन.
(f)"वेलकम लेटर" म्हणजे टीव्हीएस क्रेडिटद्वारे कर्जदाराला पाठविलेले पत्र ज्यात पूर्व-मंजूर लोन प्रोग्राम/ क्रेडिट तपशील आणि क्रेडिट सुविधा प्राप्त करण्यासाठी/वापरण्यासाठी लागू असलेल्या महत्त्वाच्या अटी व शर्तींचा सारांश नमूद केलेला असतो.
(g)"मर्चंट आस्थापना" म्हणजे टीव्हीएस क्रेडिटने आस्थापनांसह तयार केलेले मर्चंट नेटवर्क, जेथे स्थित असेल, जे पूर्व-मंजूर लोन प्रोग्राम सुविधेचा सन्मान करतात, ज्यात इतरांसह स्टोअर्स, दुकाने, हॉटेल्स, एअरलाईन्स आणि मेल ऑर्डर जाहिरातदार समाविष्ट असू शकतात.
(h)"POS" / "EDC" म्हणजे भारतातील मर्चंट आस्थापनांमध्ये वापरलेली पॉईंट ऑफ सेल / इलेक्ट्रॉनिक डाटा कॅप्चरिंग मशीन, जी ट्रान्झॅक्शनवर प्रोसेसिंग करण्यास सक्षम आहेत आणि ज्यावर कर्जदार त्वरित त्याला मंजूर केलेली क्रेडिट मर्यादा वापरू शकतो.
2.1. पात्रता निकष:
2.1.1. पूर्व-मंजूर लोन कार्यक्रमाचे लाभ घेण्यास पात्र होण्यासाठी, कर्जदाराने किमान 3 EMI किंवा डिफॉल्टशिवाय निर्धारित केल्याप्रमाणे रिपेमेंट केलेले असावे.
2.1.2. वरीलप्रमाणेच, पूर्व-मंजूर लोन कार्यक्रमात कर्जदाराद्वारे सुविधा वापरण्याचा हक्क कंपनीच्या विवेकबुद्धीनुसार असेल.
2.1.3. कर्जदार टीव्हीएस क्रेडिटसह पूर्व-मंजूर लोन - लोन ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करून पूर्व-मंजूर लोन प्रोग्राम निवडू शकतात. उपरोक्त निकषांवर आधारित टीव्हीएस क्रेडिट, पूर्व-मंजूर लोन - लोन ॲप्लिकेशन फॉर्म स्वीकारु किंवा नाकारु शकतात. कोणत्याही प्रकारच्या अयोग्य रिपेमेंट वर्तनामुळे क्रेडिट सुविधेचे कोणतेही सस्पेन्शन/विद्ड्रॉल झाल्यास, कर्जदार सहमत आहे की टीव्हीएस क्रेडिट कर्जदाराने भरलेले कोणतेही शुल्क/नोंदणी शुल्क रिफंड करण्यास जबाबदार असणार नाही.
2.2. नावनोंदणी:
2.2.1. टीव्हीएस क्रेडिट दिलेल्या संपर्क पद्धती/तपशिलाद्वारे पूर्व-मंजूर लोन प्रोग्राम/ क्रेडिट तपशील आणि क्रेडिट सुविधेच्या वापरासाठी लागू असलेल्या महत्त्वाच्या अटी व शर्तींचा सारांश नमूद असलेले एक वेलकम लेटर पाठवेल
2.2.2. वेलकम लेटर प्राप्त झाल्यानंतर, कर्जदार टीव्हीएस क्रेडिट साथी ॲप ("साथी ॲप") (किंवा) ("टीव्हीएस क्रेडिट वेबसाईट") येथे ॲक्सेस करण्यायोग्य टीव्हीएस क्रेडिटच्या वेबसाईटद्वारे (किंवा) टीव्हीएस क्रेडिटच्या कस्टमर केअर संपर्क नंबरवर विनंती करून पूर्व-मंजूर लोन प्रोग्राम सुविधा ॲक्टिव्हेट करू शकतात.
2.2.3. कर्जदाराला टीव्हीएस क्रेडिटकडून पूर्व-मंजूर लोन प्रोग्राममध्ये यशस्वी नावनोंदणीची पुष्टी करणारा एसएमएस/ईमेल ट्रिगर प्राप्त झाल्यावर आणि त्याच्या/तिच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर/ईमेल आयडी वर क्रेडिट मर्यादा मंजूर झाल्यावर, जशी परिस्थिती असेल त्यानुसार, कर्जदाराने रजिस्टर्ड मोबाईल नंबर वापरून साथी ॲप/ टीव्हीएस क्रेडिट वेबसाईट/ आयव्हीआर वर लॉग-इन करावे आणि त्याच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर पाठविलेली त्याची जन्मतारीख आणि ओटीपी एन्टर करून पूर्व-मंजूर लोन प्रोग्राम सुविधा ॲक्टिव्हेट करावी.
2.2.4. क्रेडेन्शियल यशस्वीरित्या प्रदान केल्यानंतर, कर्जदाराला त्याच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर / ईमेल ID वर SMS / ईमेलद्वारे पूर्व-मंजूर लोन प्रोग्राम सुविधा ॲक्टिव्हेशन कन्फर्मेशन प्राप्त होईल.
3.1. कर्जदार सहमत आहे की या पूर्व-मंजूर लोन प्रोग्राम अंतर्गत कोणतीही सुविधा / ट्रान्झॅक्शन स्वतंत्र लोन सुविधा म्हणून विचारात घेतले जाईल आणि कर्जदाराने अंमलात आणलेल्या / अंमलात आणावयाच्या मास्टर लोन ॲग्रीमेंटच्या अटी व शर्ती बंधनकारक आणि लागू असतील.
3.2. पूर्व-मंजूर लोन कार्यक्रमाअंतर्गत देऊ केलेले क्रेडिट लिमिट, लाभ, ऑफर / इतर अतिरिक्त सेवांची पात्रता टीव्हीएस क्रेडिटच्या विवेकबुद्धीनुसार असेल.
3.3. कर्जदार पूर्व-मंजूर लोन कार्यक्रमाअंतर्गत कोणतेही ट्रान्झॅक्शन करण्यापूर्वी टीव्हीएस क्रेडिटमधून क्रेडिट सुविधा वापरण्यासाठी प्रत्येकवेळी विनंती करेल (जी मास्टर लोन कराराच्या अटीच्या अधीन असेल).
3.4. पूर्व-मंजूर लोन प्रोग्रामची सदस्यता ट्रान्सफर न करण्यायोग्य आणि नियुक्त न करण्यायोग्य असेल. क्रेडिट सुविधा केवळ भारतात वापरण्यासाठी आणि केवळ भारतीय चलनात वस्तू किंवा सेवांच्या खरेदीसाठी वैध असेल. तसेच, काही विशिष्ट मर्चंट लोकेशन / आस्थापने / कॅटेगरीमध्ये एकतर कायमस्वरुपी किंवा वेळोवेळी सूचित केल्याप्रमाणे वापरामध्ये निर्बंध असतील.
3.5. कर्जदार नेहमीच पूर्व-मंजूर लोन प्रोग्राम आणि टीव्हीएस क्रेडिटसह सर्व व्यवहारांच्या संबंधात सद्भावनेने वागण्याचे वचन देतो.
3.6. कर्जदार सहमत आहे की पूर्व-मंजूर लोन प्रोग्राम अंतर्गत लोन सुविधा भारताच्या लागू कायद्यांतर्गत प्रतिबंधित वस्तूंच्या खरेदीसाठी वापरण्याच्या उद्देशाने नाही जसे की लॉटरी तिकीटे, निषिद्ध किंवा बंदी घातलेली मासिके, स्वीपस्टेक्समध्ये सहभाग, कॉल-बॅक सर्व्हिसेससाठी पेमेंट इ., किंवा परदेशी चलनात प्रभुत्व असलेल्या ट्रान्झॅक्शनसाठी.
3.7. ऑपरेशन्स किंवा इलेक्ट्रॉनिक डाटा कॅप्चर दरम्यान पीओएस किंवा सिस्टीम किंवा टर्मिनलच्या कोणत्याही अयशस्वी होण्यासाठी किंवा त्रुटीसाठी टीव्हीएस क्रेडिट जबाबदार असणार नाही.
3.8. कर्जदाराद्वारे या अटी व शर्तींचे कोणतेही उल्लंघन झाल्यास, अशा उल्लंघनामुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी तो/ती उत्तरदायी असेल ; आणि मागणीनुसार टीव्हीएस क्रेडिटला पेमेंट करण्यास जबाबदार असेल. टीव्हीएस क्रेडिटमधून घेतलेल्या त्याच्या/तिच्या क्रेडिट सुविधांच्या संदर्भात कर्जदाराने केलेले कोणतेही डिफॉल्ट देखील उल्लंघन ठरेल.
3.9. टीव्हीएस क्रेडिट आणि कर्जदारादरम्यान कोणत्याही प्रसंग, घटना, परिस्थिती, बदल, तथ्य, माहिती, डॉक्युमेंट, अधिकृतता, कार्यवाही, वगळणे, क्लेम, उल्लंघन, डिफॉल्ट किंवा अन्यथा पूर्व-मंजूर लोन कार्यक्रम सुविधेचा वापर किंवा गैरवापर यासह टीव्हीएस क्रेडिटचे वरील पैकी कोणत्याही भौतिकतेबद्दलचे मत अंतिम आणि कर्जदारावर बंधनकारक असेल. कर्जदार या संदर्भात टीव्हीएस क्रेडिटद्वारे वेळोवेळी निर्धारित केलेल्या या अटी व शर्ती आणि पॉलिसींना बांधील असेल.
3.10. शुल्काच्या तपशिलासाठी, कर्जदाराने केलेल्या क्रेडिट मर्यादा / ट्रान्झॅक्शनच्या प्रत्येक वापरासाठी टीव्हीएस क्रेडिटद्वारे प्रदान केलेल्या लोन टर्म शीटचा संदर्भ घ्या. हे शुल्क टीव्हीएस क्रेडिटच्या विवेकबुद्धीनुसार बदलाच्या अधीन आहेत. तथापि, शुल्कातील असे बदल केवळ कर्जदाराला तीस (30) दिवसांची पूर्वसूचना देणाऱ्या संभाव्य परिणामासह केले जाऊ शकतात.
3.11. अशा परिस्थितीत, घेतलेल्या सुविधेचा कोणत्याही प्रकारचा चुकीचा वापर केल्यास, टीव्हीएस क्रेडिट कायद्यानुसार कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई करेल.
3.12. कर्जदार सहमत आहे आणि स्वीकारतो की जर क्रेडिट सुविधा रिपेमेंटमध्ये डिफॉल्ट असेल तर प्राथमिक लोन ॲग्रीमेंट साठी कोणतेही NOC असणार नाही
3.13. कर्जदार सहमत आहे आणि टीव्हीएस क्रेडिटला अधिकृत करतो की जिच्याशी टीव्हीएस क्रेडिटचे टाय-अप आहे किंवा असू शकेल अशा कोणत्याही बिझनेस संस्थेशी आणि इतर बिझनेस संस्थांशी टाय-अप करून आणि कर्जदाराने स्वीकारलेल्या टीव्हीएस क्रेडिटद्वारे ऑफर केलेल्या अतिरिक्त फीचर्स/मूल्यवर्धित सर्व्हिसेसचा विस्तार करण्याच्या उद्देशाने कर्जदाराचे सीकेवायसीआर, केवायसी डॉक्युमेंट्स, विद्यमान लोन्स आणि/किंवा रिपेमेंट रेकॉर्डशी संबंधित सर्व माहिती आणि तपशिलांची देवाणघेवाण, शेअर, प्रकटीकरण किंवा ताबा देणे करू शकते.
4.1. पूर्व-मजूर लोन प्रोग्राम कस्टमरच्या रजिस्टर्ड बँक अकाउंटमधून ॲन्युअल फी ऑटोमॅटिकरित्या डेबिट करून दरवर्षी ऑटोमॅटिकरित्या रिन्यू केला जाईल. अशा प्रकारे आकारलेली फी परत केली जाणार नाही.
4.2. ॲन्युअल वैधता कालावधी दरम्यान पूर्व-मंजूर लोन प्रोग्राम अंतर्गत कोणतेही लोन न घेतलेल्या कस्टमरसाठीच ही ॲन्युअल फी डेबिट केली जाईल.
4.3. कस्टमर लागू अतिरिक्त शुल्क भरून मूल्यवर्धित सर्व्हिसेस/फीचर्स देखील निवडू शकतात.
4.4. कस्टमरकडे कस्टमर सपोर्ट टीमला लेखी विनंती सादर करून रिन्यूवल कॅन्सल करण्याचा पर्याय आहे. कॅन्सल केल्यानंतर कस्टमर या पूर्व-मंजूर लोन प्रोग्राम अंतर्गत कोणत्याही सुविधेचा वापर करण्यास पात्र असणार नाही. अशा कॅन्सलेशनमुळे कस्टमर विनंती सादर करण्यापूर्वी आकारलेल्या ॲन्युअल फीवरील रिफंडचा क्लेम करण्यास पात्र राहणार नाही.
व्हेरियंट | स्टँडर्ड* | प्रीमियम** |
---|---|---|
नोंदणी शुल्क (एक वेळ) | ₹499 /- | ₹699 /- |
वार्षिक फी | ₹117 /- (लागू करांसहित) या प्रोग्राम अंतर्गत पूर्व-मंजूर लोन सुविधा वैधता समाप्ती महिन्यावर ऑटोमॅटिकरित्या रिन्यू केली जाईल, जे कार्डच्या समोरील बाजूवर नमूद केले आहे. उदाहरणार्थ: जर कार्डच्या समोरील बाजूवरील वैधता समाप्ती महिना 12/2022 असेल, तर रिन्यूवल फी डिसेंबर 2022 महिन्यात डेबिट केली जाईल. |
|
त्वरित बँक ट्रान्सफर ॲन्युअल फी | ₹249 /- (लागू करांसहित) पूर्व-मंजूर लोन प्रोग्राम वैधता कालावधीमध्ये पहिल्या वापराच्या वेळी त्वरित बँक ट्रान्सफर ॲन्युअल फी डेबिट केली जाईल. उदाहरणार्थ: जर पूर्व-मंजूर लोन प्रोग्राम ॲन्युअल वैधता कालावधी 01/2022 ते 12/2022 दरम्यान असेल आणि या कालावधीदरम्यान पहिला वापर कधीही असेल तर त्वरित बँक ट्रान्सफर ॲन्युअल फी लोन डिस्बर्सल मधून डेबिट केली जाईल. |
|
पूर्व-मंजूर लोन प्रोग्राम अंतर्गत बुक केलेल्या लोन्ससाठी ॲन्युअलाइज्ड इंटरेस्ट रेट % (प्रति वर्ष) | इंटरेस्ट रेट पॉलिसीनुसार कस्टमरला वार्षिक आधारावर 24% -35% दरम्यान प्रभावी इंटर्नल रेट ऑफ रिटर्न (IRR) आकारले जाईल. | |
फिजिकल कार्ड | ₹100/- इन्स्टाकार्ड होमपेजवर लॉग-इन केल्यानंतर कस्टमरने टीव्हीएस क्रेडिट साथी ॲपद्वारे विशिष्ट विनंती करावी. फिजिकल कार्ड थेट कस्टमरच्या रजिस्टर्ड ॲड्रेसवर पाठवले जाईल. |
*इन्स्टाकार्ड प्रोग्रामचा स्टॅंडर्ड व्हेरियंट कस्टमरला टीव्हीएस क्रेडिटने पॅनेल केलेल्या ऑफलाईन मर्चंट नेटवर्क आणि त्वरित बँक ट्रान्सफर सुविधेसह पूर्व-मंजूर लोन सुविधा वापरण्याची परवानगी देईल
**इन्स्टाकार्ड प्रोग्रामचे प्रीमियम व्हेरियंट कस्टमरला त्वरित बँक ट्रान्सफर सुविधेसह ऑफलाईन आणि ऑनलाईन मर्चंट नेटवर्कमध्ये टीव्हीएस क्रेडिटसह पूर्व-मंजूर लोन सुविधा वापरण्यास अनुमती देईल
5.1. मागील बाबींसंबंधी पूर्वाग्रह न ठेवता, टीव्हीएस क्रेडिट कर्जदाराला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे यामधून उद्भवणाऱ्या कोणत्याही नुकसान किंवा हानीच्या संदर्भात कोणत्याही दायित्वाखाली असणार नाही:
5.1.1. डिलिव्हरीला विलंब किंवा डिलिव्हरी न करण्यासहित पुरविलेल्या वस्तू किंवा सर्व्हिसमधील कोणतेही दोष तसेच मर्चंट आस्थापना आणि कर्जदार आणि / किंवा थर्ड पार्टी यामध्ये सर्व्हिस मधील कमतरता.
5.1.2. टीव्हीएस क्रेडिट कडे प्रकटीकरण केलेल्या कोणत्याही तपशिलामध्ये कोणतेही चुकीची माहिती, दिशाभूल, त्रुटी किंवा वगळणे. टीव्हीएस क्रेडिट किंवा टीव्हीएस क्रेडिटच्या वतीने कृती करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीद्वारे कर्जदाराकडून थकित देय सेटलमेंट करण्यासाठी मागणी किंवा क्लेम केला गेल्यास, कर्जदार सहमत आहे आणि स्वीकारतो की अशी मागणी किंवा क्लेम, कोणत्याही प्रकारे, मानहानीची कृती किंवा कर्जदाराच्या चारित्र्याप्रति पूर्वग्रहाची कृती किंवा त्याबद्दलचे प्रतिकूल मत बनवण्यासाठी प्रभाव पाडणारी कृती असणार नाही.
5.1.3. कर्जदार स्पष्टपणे स्वीकारतो की जर तो / ती देय तारखेला पैसे भरण्यास अयशस्वी ठरले किंवा जे त्या तारखेच्या आधी घोषित केले जाऊ शकते जेव्हा अन्यथा देय झाले असते किंवा वर्तमान अटी अंतर्गत कोणतेही डिफॉल्ट करत असेल, ज्याअंतर्गत कर्जदार आर्थिक / कॉर्पोरेट / अन्य सुविधेचा आनंद घेत आहे, तर टीव्हीएस क्रेडिट, स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार, पूर्वग्रह न ठेवता, या अटी व शर्तींमध्ये नमूद केल्याप्रमाणे सर्व किंवा कोणत्याही अधिकारांचा वापर करेल. टीव्हीएस क्रेडिटद्वारे पेमेंटशी संबंधित दिलेली कोणतीही सूचना कर्जदाराला टीव्हीएस क्रेडिटला लेखी स्वरुपात शेवटचे सूचित केलेल्या कर्जदाराच्या पत्रव्यवहाराच्या ॲड्रेस वर पाठवल्यापासून सात (7) दिवसांच्या आत प्राप्त झाल्याचे मानले जाईल. कोणतीही सूचना फॅक्सद्वारे पाठविली जाऊ शकते किंवा तोंडी कळवली जाऊ शकते आणि पोस्ट किंवा फॅक्सद्वारे लेखी कन्फर्म केली जाऊ शकते. नोटीस प्राप्त होण्याच्या विलंबास टीव्हीएस क्रेडिटला जबाबदार धरले जाणार नाही.
5.1.3.Any या सुविधेच्या माध्यमातून होणारा निधीचा चुकीचा वापर/गैरवापर यासाठी टीव्हीएस क्रेडिटला जबाबदार धरता येणार नाही.
6.1. कस्टमरच्या तक्रारींचे निराकरण कर्जदाराद्वारे अंमलबजावणी केलेल्या मास्टर लोन करारामध्ये नमूद केल्याप्रमाणे केले जाईल.
6.2. पूर्व-मंजूर लोन प्रोग्राम सुविधेच्या संदर्भात कोणतेही विवाद कर्जदारांद्वारे अशा घटनेपासून सात (7) दिवसांच्या आत कस्टमर केअर सेंटरकडे सादर केले जातील. अशा घटनेपासून सात (7) दिवसांनंतर कर्जदाराने केलेला कोणताही वाद टीव्हीएस क्रेडिटद्वारे स्वीकारला जाणार नाही आणि त्यासाठी टीव्हीएस क्रेडिट कोणत्याही प्रकारे जबाबदार असणार नाही.
6.3. OTP आधारित प्रमाणीकरणाच्या संदर्भात कोणतीही कस्टमर तक्रार कर्जदाराला झालेल्या दायित्वाचे निर्णायक पुरावे असेल. पेमेंटसाठी बँकेला/ पार्टनरला प्राप्त झालेली कोणतीही शुल्क स्लिप किंवा इतर पेमेंट मागणी निश्चित पुरावा असेल की अशा शुल्क स्लिप किंवा इतर मागणीवर रेकॉर्ड केलेले शुल्क कर्जदाराने योग्यरित्या दिले होते, जर क्रेडेन्शियलचा चुकीचा वापर केला नसेल, ज्या बाबतीत पुराव्याचा भार कर्जदारावर असेल. या क्लॉजमध्ये संदर्भित केलेल्या इतर पेमेंटच्या मागणीमध्ये कर्जदाराने मर्चंट आस्थापनेमध्ये क्रेडिट सुविधेचा वापर करून केलेल्या परवानगीयोग्य खर्चाशी संबंधित कोणतीही आणि सर्व पेमेंट समाविष्ट असतील जी शुल्क म्हणून रेकॉर्ड केलेली नाही.
6.4. यासंबंधीचे सर्व वाद केवळ चेन्नईमधील सक्षम न्यायालयांच्या विशेष अधिकारक्षेत्राच्या अधीन आहेत आणि लागू असलेले कायदे भारतीय कायदे असतील.
7.1. कर्जदार स्वीकारतो आणि संमती देतो की पूर्व-मंजूर लोन प्रोग्राम अंतर्गत माहितीची देवाणघेवाण इतर बँका आणि कॉर्पोरेट सुविधा प्रदान करणाऱ्या फायनान्शियल संस्थांमध्ये केली जाऊ शकते. पूर्व-मंजूर लोन प्रोग्रामसाठी ॲप्लिकेशनची स्वीकृती व्यक्तीच्या क्रेडिट पात्रतेचा कोणताही प्रतिकूल रिपोर्ट नसण्यावर आधारित असते.
7.2. टीव्हीएस क्रेडिट पूर्व-मंजूर लोन प्रोग्राम लोन सुविधेच्या वापरातील कोणताही कर्तव्य चुकारपणा इतर बँका किंवा फायनान्शियल संस्थांना कदाचित रिपोर्ट करू शकते. प्रतिकूल रिपोर्ट (कर्जदार किंवा त्याच्या/तिच्या कुटुंबातील सदस्यांच्या पत-पात्रतेशी संबंधित) प्राप्त झाल्याच्या आधारावर, टीव्हीएस क्रेडिट लेखी 15 दिवसांच्या पूर्व सूचनेनंतर, पूर्व-मंजूर लोन प्रोग्राम सुविधा कॅन्सल करू शकते. जिथे पूर्व-मंजूर लोन वरील संपूर्ण थकित बॅलन्स तसेच पूर्व-मंजूर लोन प्रोग्राम सुविधेचा वापर केल्यावर आलेले कोणतेही शुल्क, कर्जदाराला अद्याप लोन म्हणून बुक केलेले नसले तरीही, कर्जदाराद्वारे त्वरित देय असेल. कर्जदाराने कोणत्याही परिस्थितीत उपरोक्त अटींबाबत विवाद करू नये.
7.3. टीव्हीएस क्रेडिट पूर्व-मंजूर लोन प्रोग्राम अंतर्गत कर्जदाराने केलेल्या कोणत्याही ट्रान्झॅक्शनशी संबंधित कोणतेही मासिक विवरण पाठवणार नाही. कर्जदार हे देखील कन्फर्म करतो की पूर्व-मंजूर लोन - लोन ॲप्लिकेशनमध्ये दिलेला सर्व तपशील सत्य, बरोबर आणि अचूक असेल आणि दिलेल्या तपशिलामध्ये कोणतेही बदल असल्यास, तो/ ती वाजवी कालावधीमध्ये टीव्हीएस क्रेडिटला सूचित करेल. चुकीच्या तपशिलाच्या परिणामी कर्जदाराचे कोणतेही नुकसान झाल्यास किंवा दायित्व उद्भवल्यास अशा बाबतीत टीव्हीएस क्रेडिट सर्व दायित्व नाकारते.
8.1. टीव्हीएस क्रेडिट आपल्या स्वत:च्या विवेकबुद्धीनुसार पूर्व-मंजूर लोन प्रोग्राममधून कर्जदाराची नावनोंदणी रद्द करू शकते:
8.1.1. कर्जदाराला दिवाळखोर घोषित केल्यावर किंवा कर्जदाराच्या मृत्यूनंतर.
8.1.2. जर कर्जदाराने कोणत्याही अटी व शर्तींचे उल्लंघन केल्यास.
8.1.3. सक्षम न्यायालयाच्या आदेशाद्वारे किंवा भारतातील कोणत्याही नियामक किंवा वैधानिक प्राधिकरणाने किंवा कोणत्याही तपास संस्थेने जारी केलेल्या आदेशाद्वारे कर्जदारावर कोणतेही निर्बंध लादले गेल्यास.
8.1.4. पूर्व-मंजूर लोन प्रोग्राम लागू कायदे, नियम, मार्गदर्शक तत्त्वे किंवा परिपत्रकानुसार बेकायदेशीर ठरल्यास ; किंवा
8.1.5. जर पूर्व-मंजूर लोन प्रोग्राम रद्द करण्यात आल्यास.
8.2. मास्टर लोन ॲग्रीमेंट संपुष्टात आणण्याच्या परिणाम संबंधीच्या अटी व शर्ती पूर्व-मंजूर लोन प्रोग्राम अंतर्गत संपुष्टात येण्याच्या परिणामांमध्ये आवश्यक बदलांसह लागू होतील.
9.1. कोणत्याही शंकेसाठी, आमच्या वेबसाईटला भेट द्या https://www.tvscredit.com/get-in-touch आणि तुमच्या शंकेचे निराकरण करण्यासाठी आमच्या दिशानिर्देशांचे पालन करा.
9.2. इन्स्टाकार्ड प्रोग्राम कस्टमर हे 040-66-123456 वर आमच्या कस्टमर केअर कॉल सेंटर वर संपर्क साधू शकतात
10.1. पूर्व-मंजूर लोन प्रोग्राम येथे नमूद केलेल्या अटी व शर्तींच्या आणि वेळोवेळी टीव्हीएस क्रेडिटद्वारे निर्धारित कोणत्याही अतिरिक्त शर्तींच्या अधीन असेल.
10.2.The कर्जदार या अटी व शर्तींचे पुनरावलोकन करण्यासाठी जबाबदार असेल, ज्यात त्यातील सुधारणांचा समावेश असेल आणि पूर्व-मंजूर लोन प्रोग्राम सुविधा वापरणे सुरू ठेवून सुधारित अटी व शर्ती स्वीकारल्या असल्याचे मानले जाईल.
10.3. कर्जदार याद्वारे टीव्हीएस क्रेडिटद्वारे वेळोवेळी निर्धारित केलेल्या फॉर्म आणि पद्धतीमध्ये लोन ॲप्लिकेशन फॉर्ममधील सर्व अटी व शर्तींशी सहमत आहे.
साईन-अप करा आणि मिळवा नवीन अपडेट्स आणि ऑफर्स