आम्ही, टीव्हीएस क्रेडिटमध्ये गुणवत्तेवर आधारित औपचारिक भरती प्रक्रिया राबवतो. आम्ही भरती प्रक्रियेदरम्यान अर्जदारांकडून कोणतेही शुल्क किंवा डिपॉझिटची मागणी कधीही करत नाही. फसवणुकीचा ईमेल/ऑफर पाठविण्यासाठी TVS क्रेडिट डोमेन आयडी स्पूफिंग करणाऱ्या लबाडांपासून सावधानता बाळगा. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Hamburger Menu Icon
products image

प्रेस रिलीज

महत्त्वपूर्ण पैलू आणि घडामोडी जाणून घ्या

इनोव्हेशन प्रोग्रामच्या उभारणीला गती, आयआयटी मद्रासची टीव्हीएस क्रेडिट सोबत एमओयूवर स्वाक्षरी

प्रकाशन: टीव्हीएस क्रेडिट तारीख: 25 | नोव्हेंबर | 2021

आयआयटी मद्रास आणि टीव्हीएस क्रेडिट यांच्या सहकार्यात्मक भागीदारीचे उद्दिष्ट तरुणांना संशोधनाला बळकटी आणि एनबीएफसी सेक्टरच्या संसाधन कार्यक्षमता आणि उत्पादकतेला चालना देणे आहे.

चेन्नई, नोव्हेंबर 25, 2021: 8.5 बिलियन यूएसडी टीव्हीएस ग्रूपचा भाग असलेल्या टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिस लिमिटेडने गुरुवारी संयुक्त संशोधन प्रकल्पांना चालना देण्याच्या हेतूने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोबत सहकार्यात्मक भागीदारी करारावर स्वाक्षरी केली. या भागीदारीचे उद्दिष्ट फायनान्शियल तंत्रज्ञान आणि डाटा सायन्सच्या क्षेत्रात तंत्रज्ञान उपाय प्रदान करणे आहे.

सहकार्यात्मक भागीदारी अंतर्गत, दोन्ही संस्था या संयुक्त संशोधन प्रकल्प आणि शैक्षणिक कृतींना चालना देण्याच्या प्रयत्नात कार्यरत आहेत. "उद्योग आणि शैक्षणिक संस्था यांच्यामध्ये निरंतर सहकार्यात्मक संबंध प्रस्थापित करण्यास यामुळे चालना मिळेल", असे कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

भारतात सर्वात वेगाने विस्तारणारी टीव्हीएस क्रेडिट ही नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी आणि शैक्षणिक परिघात सर्वोत्कृष्टतेचे द्योतक असलेले आयआयटी-मद्रास यांमधील सहकार्यात्मक भागीदारीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. नावीन्यपूर्ण उपक्रम, प्रशिक्षणाची उपलब्धता व तरुण संशोधकांना पाठबळ यास निश्चितच चालना मिळणार आहे.

“या सहकार्यात्मक भागीदारीमुळे शैक्षणिक दिग्गज आणि व्यावसायिक एकत्र येतील. संयुक्तपणे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रकल्पांची रचना, विकास आणि वितरण करतील आणि मॅनेजमेंट आणि फायनान्शियल समावेशाच्या क्षेत्रात संशोधन करून कन्सलटेशन प्रदान करतील. ” असे जारी पत्रकात म्हटले आहे.

“आर्थिक सेवांमधील तंत्रज्ञानाचे भविष्य हे आयआयटी-मद्रास सारख्या संस्थेमध्ये सहभागी होण्यासाठी एक आकर्षक जागा आहे. तसेच, कौशल्य आणि कौशल्य वर्धनाचे महत्त्व पूर्वीपेक्षा अधिकच वाढले आहे." असे मत टीव्हीएस क्रेडिटचे सीईओ व्यंकटरमण यांनी व्यक्त केले.

“वेगाने वाढणाऱ्या डिजिटायझेशनसह, तरुण आणि तेजस्वी मनांनी नवीन कौशल्यांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे जे त्यांना नाविन्यपूर्ण उपाय प्रदान करण्यास सक्षम करतील आणि त्याद्वारे आमच्या संस्थेच्या वाढीस मदत होईल.” टीव्हीएस क्रेडिटसह भागीदारीवर, आयआयटी-एम, डीन (आयसी अँड एसआर), प्रोफेसर
रवींद्र गेट्टू म्हणाले, "आम्ही टीव्हीएस क्रेडिटसारख्या प्रमुख मार्केट प्लेयरसह सहभागी होण्यास आनंदी आहोत."

“अशाप्रकारच्या सहकार्यात्मक भागीदारीमुळे व्यावहारिक आणि नावीन्यपूर्ण उपायांच्या निर्मितीस चालना मिळेल आणि दीर्घकाळ प्रभाव कायम राहिल. आम्ही एकत्रित काम करण्यास आणि सहकार्यात्मक संवादातून साध्य करण्यास भविष्यात बांधील राहू." असेही त्यांनी म्हटलं आहे.

सहकार्यात्मक भागीदारीचे उद्दिष्ट तरुणांना शिष्यवृत्ती प्रदान करणे आणि एनबीएफसी सेक्टरच्या कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढीस चालना देणे आहे. अशा सहकार्यात्मक भागीदारीमुळे संशोधन आणि विकासास चालना मिळेल असा विश्वास परिपत्रकातून व्यक्त करण्यात आला आहे.


  • यावर शेअर करा
  • Share it on Facebook
  • Share it on Twitter
  • Share it on Linkedin

साईन-अप करा आणि मिळवा नवीन अपडेट्स आणि ऑफर्स

व्हॉट्सॲप

ॲप डाउनलोड करा

संपर्कात राहूया!