hamburger icon
products image

प्रेस रिलीज

महत्त्वपूर्ण पैलू आणि घडामोडी जाणून घ्या

टीव्हीएस क्रेडिट ई.पी.आय.सी सीझन 4 चॅलेंज मध्ये एनएमआयएमएस, आयआयएम लखनऊ आणि एमआयसीए सर्वोच्च सन्मानाचे विजेते

प्रकाशन: टीव्हीएस क्रेडिट तारीख: 15 | डिसेंबर | 2022

राष्ट्रीय, डिसेंबर 15, 2022: टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेड, भारतातील अग्रगण्य एनबीएफसीने, अलीकडेच कॉलेज विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या वार्षिक कॅम्पस चॅलेंज कार्यक्रमाची अंतिम फेरी आयोजित केली, ई.पी.आय.सी सीझन 4.. #BeEPIC च्या थीमवर आधारित, या हंगामात 40,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या सर्वोच्च नोंदणी पाहिल्या. या हंगामात पहिल्या हंगामाच्या तुलनेत विद्यार्थ्यांच्या सहभागामध्ये 268% वाढ दिसून आली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांची ॲनालिटिक्स, फायनान्स, आयटी आणि धोरण यातील समस्या-निवारण कौशल्यांची चाचणी करण्यात आली आणि त्यांना करिअर-वृद्धी करणाऱ्या संधी देखील प्रदान केल्या गेल्या.

या कार्यक्रमाद्वारे, कंपनी एक मजबूत नियोक्ता ब्रँड तयार करण्यास सक्षम झाली आहे. ही समर इंटर्नशिप आणि मॅनेजमेंट ट्रेनी कार्यक्रमासाठी काही सहभागींची निवड करण्यासाठी देखील या व्यासपीठाचा वापर करते. टीव्हीएस क्रेडिटचे सीईओ श्री. आशिष सप्रा यांनी ओपन हाऊसमध्ये सहभागींशी संवाद साधला. त्यांच्या भाषणानंतर सत्कार समारंभ झाला जिथे विजेत्यांना ₹10 लाख ची बक्षिसे देण्यात आली

ई.पी.आय.सी सीझन 4 बद्दल बोलताना, टीव्हीएस क्रेडिटचे विपणन प्रमुख, चरणदीप सिंह म्हणाले, "ई.पी.आय.सी कार्यक्रम हा पारंपारिक शैक्षणिक उपक्रमांपेक्षा वेगळ्या वातावरणात नवोदित तरुणांना त्यांच्या क्षमतांचे प्रदर्शन करण्यासाठी एक खास व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी एक अनोखा उपक्रम आहे. तसेच, तरुणांना अशा प्रकारे मार्गदर्शन केले जाते की ते केवळ मजबूत स्पर्धाच करू शकत नाहीत तर उत्कृष्टता देखील दाखवू शकतात. या हंगामात विशेष स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते आणि विद्यार्थ्यांनी त्यात उत्साहाने सहभाग घेतला हे पाहून आम्हाला खूप आनंद होत आहे.”

टीव्हीएस क्रेडिट मधील मॅनेजमेंट ट्रेनीने विचार व्यक्त केले, "टीव्हीएस क्रेडिट ई.पी.आय.सी चॅलेंज - सीझन 2 मध्ये काम करत असताना, मला फायनान्शियल इंडस्ट्रीमध्ये काम करण्याची आवड निर्माण झाली आणि मला जाणवले की मला अधिक शिकण्याची गरज आहे आणि मला या सेक्टरमध्ये काम करण्याची इच्छा आहे. ई.पी.आय.सी चॅलेंजद्वारे, मला थेट माझ्या आवडीच्या क्षेत्रात इंटर्नशिप ऑफर मिळाली. नंतर, ते पीपीओ मध्ये रूपांतरित झाले. आणि आता मी माझ्या इंटर्नशिप दरम्यान या प्रोजेक्ट्सना सुरुवात करून त्यावर काम करण्यास खूप आनंदी आणि उत्साहित आहे.”

मागील चार वर्षांमध्ये, ई.पी.आय.सी कार्यक्रमाने महत्त्वाकांक्षी तरुणांना करिअर करण्याची संधी प्रदान केली आहे आणि कंपनीसाठी प्रतिभेची पाईपलाईन तयार करण्यास देखील मदत केली आहे. ई.पी.आय.सी सारख्या अनेक उपक्रमांसह, टीव्हीएस क्रेडिट 'उद्याला' सामर्थ्यवान बनवणाऱ्या उज्वल मनांसोबत सहभागी होत आपल्या कस्टमर्सच्या चांगल्या भविष्याला सक्षम बनवण्यासाठी वचनबद्ध आहे.

टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेडविषयी:

टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेड ही आरबीआय सह रजिस्टर्ड अग्रगण्य नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी आहे. संपूर्ण भारतातील 31,000 टचपॉईंट्ससह, कंपनीचे उद्दीष्ट भारतीयांना मोठे स्वप्न पाहण्यासाठी आणि त्यांची आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सक्षम बनवणे आहे. टीव्हीएस मोटर लिमिटेड आणि प्रमुख ट्रॅक्टर फायनान्शियर्समध्ये एक फायनान्शियर असल्याने, टीव्हीएस क्रेडिटचा टू-व्हीलर लोन्स, ट्रॅक्टर लोन्स, कन्झ्युमर लोन्स, यूज्ड कार लोन्स, यूज्ड कमर्शियल व्हेईकल लोन्स आणि बिझनेस लोन्समध्ये वेगाने वाढणारा फूटप्रिंट आहे. मजबूत नवीन-युगातील तंत्रज्ञान आणि डाटा विश्लेषणाद्वारे समर्थित, कंपनीने 17,000+ कर्मचाऱ्यांच्या मदतीने 9.4 दशलक्षपेक्षा अधिक आनंदी कस्टमर्सना सर्व्हिस दिली आहे.

मीडिया संपर्क: टीव्हीएस क्रेडिट

रुचिका राणा
वरिष्ठ व्यवस्थापक, ब्रँडिंग आणि संवाद
मोबाईल: +91 9910036860
ईमेल: ruchika.rana@tvscredit.com
वेब: https://www.tvscredit.com/


  • यावर शेअर करा

साईन-अप करा आणि मिळवा नवीन अपडेट्स आणि ऑफर्स

व्हॉट्सॲप

ॲप डाउनलोड करा

संपर्कात राहूया!