hamburger icon
products image

प्रेस रिलीज

महत्त्वपूर्ण पैलू आणि घडामोडी जाणून घ्या

टीव्हीएस क्रेडिटचे फेस्टिव्ह सेलिब्रेशन, कस्टमर्स साठी आकर्षक ऑफर्सची घोषणा

प्रकाशन: टीव्हीएस क्रेडिट तारीख: 25 | ऑक्टोबर | 2023

चेन्नई, ऑक्टोबर 25, 2023: भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या एनबीएफसीपैकी एक असलेल्या टीव्हीएस क्रेडिटने कस्टमर्सना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यास आर्थिक सुलभता प्रदान करण्याच्या उद्देशाने 40,000 पेक्षा जास्त टचपॉईंट्सवर उपलब्ध आकर्षक लोन ऑफर्सचा गुलदस्ता आणला आहे.

टू-व्हीलर लोन्ससाठी, कस्टमर्स हे ऑफर करणाऱ्या स्कीम्सचा लाभ घेऊ शकतात - 95% पर्यंत फंडिंग, 60-महिन्याचा लोन कालावधी आणि विशेष सवलत व्हाउचर. जे कस्टमर मोबाईल फोन अपग्रेड करू इच्छितात आणि कन्झ्युमर ड्युरेबल्स खरेदी करू इच्छितात ते तिच्या कन्झ्युमर लोन्सचा लाभ घेऊ शकतात ज्यामध्ये नो-कॉस्ट ईएमआय लाभ, डिस्बर्स केलेल्या लोन मूल्याचे डिस्काउंट व्हाउचर आणि त्यांच्या नंतरच्या खरेदीसाठी कॅशबॅक यांचा समावेश होतो.

तसेच, कंपनीने तिच्या फ्लॅगशिप कन्झ्युमर प्रमोशन कॅम्पेन, "मॅजिकल दिवाळी" च्या 6 व्या सीझनलाही दणदणीत सुरुवात केली आहे. हा पूर्णपणे एकीकृत विपणन प्रयत्न डिजिटल टचपॉईंट्स आणि इन-स्टोअर संवादाद्वारे कस्टमर्सना सक्रियपणे गुंतवून ठेवतो. याचा भाग म्हणून, कॅम्पेन कालावधीदरम्यान टीव्हीएस क्रेडिटच्या लोनचा लाभ घेणारे कस्टमर स्पर्धेत सहभागी होऊन दररोज आणि भव्य बक्षिसे जिंकू शकतात, ज्यामध्ये सेल्फी क्लिक करणे/स्लोगन लिहिणे आणि कंपनीच्या सोशल मीडिया हँडल्सवर पोस्ट करणे याचा समावेश आहे. स्पर्धा सध्या लाईव्ह आहे आणि नोव्हेंबर 30, 2023 पर्यंत सुरू राहील.

टीव्हीएस क्रेडिट या सणासुदीच्या हंगामाचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी आणि त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाला या खास ऑफरचा लाभ घेण्याकरिता आमंत्रित करते.

टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेडविषयी:

टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेड ही आरबीआय सह नोंदणीकृत भारतातील सर्वात वेगाने वाढणारी नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी आहे. संपूर्ण भारतातील 40,000 टचपॉईंट्ससह, कंपनीचे उद्दीष्ट भारतीयांना मोठे स्वप्न पाहण्यासाठी आणि त्यांची आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सक्षम बनवणे आहे. टीव्हीएस मोटर कंपनी लिमिटेडसाठी प्रथम क्रमांकाची फायनान्सर आणि आघाडीच्या ट्रॅक्टर फायनान्सरपैकी एक असल्याने, टीव्हीएस क्रेडिटचा यूज्ड कार लोन्स, कन्झ्युमर ड्युरेबल लोन्स, यूज्ड कमर्शियल व्हेईकल लोन्स आणि अनसिक्युअर्ड लोन्स सेगमेंटमध्ये वेगाने वाढणारा ठसा आहे. मजबूत नवीन-युगातील तंत्रज्ञान आणि डाटा विश्लेषणाद्वारे समर्थित, कंपनीने 1.2 कोटींपेक्षा जास्त आनंदी कस्टमर्सना सर्व्हिस दिली आहे.

मीडिया संपर्क: टीव्हीएस क्रेडिट

रुचिका राणा
वरिष्ठ व्यवस्थापक, ब्रँडिंग आणि संवाद
मोबाईल: +91 9910036860
ईमेल: ruchika.rana@tvscredit.com
वेब: https://www.tvscredit.com/


  • यावर शेअर करा

साईन-अप करा आणि मिळवा नवीन अपडेट्स आणि ऑफर्स

व्हॉट्सॲप

ॲप डाउनलोड करा

संपर्कात राहूया!