आम्ही, टीव्हीएस क्रेडिटमध्ये गुणवत्तेवर आधारित औपचारिक भरती प्रक्रिया राबवतो. आम्ही भरती प्रक्रियेदरम्यान अर्जदारांकडून कोणतेही शुल्क किंवा डिपॉझिटची मागणी कधीही करत नाही. फसवणुकीचा ईमेल/ऑफर पाठविण्यासाठी TVS क्रेडिट डोमेन आयडी स्पूफिंग करणाऱ्या लबाडांपासून सावधानता बाळगा. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Hamburger Menu Icon
products image

प्रेस रिलीज

महत्त्वपूर्ण पैलू आणि घडामोडी जाणून घ्या

फेस्टिव्ह सीझनची धूम, टीव्हीएस क्रेडिटचा लोन डिस्बर्सल टक्केवारी वाढीचा अंदाज

प्रकाशन: टीव्हीएस क्रेडिट तारीख: 29 | सप्टेंबर | 2022

राष्ट्रीय, सप्टेंबर 29, 2022: भारताचे प्रमुख आणि वेगाने वाढणारे फायनान्शियल सर्व्हिसेस प्रदाता, TVS क्रेडिट, त्यांच्या लोन ऑफरिंगसाठी सणासुदीच्या हंगामात प्रवेश करण्याची अपेक्षा करते - टू-व्हीलर लोन्स, कंझ्युमर ड्युरेबल लोन्स, मोबाईल लोन्स, वापरलेले कार लोन्स, ट्रॅक्टर लोन्स, वापरलेले कमर्शियल वाहन लोन्स, बिझनेस लोन्स आणि पर्सनल लोन्स. कंपनी चालू सणासुदीच्या हंगामात लोन वितरणातील वाढ अनुमान करते.

गेल्या दोन वर्षात महामारीमुळे ग्राहकांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. अशा परिस्थितीत, ग्राहकांना त्यांचे स्वप्न साकार करण्यास मदत करण्यासाठी रिटेल फायनान्सरची भूमिका खूपच महत्त्वाची आहे. त्याची पूर्तता करण्याच्या हेतूने कंपनीने विविध आकर्षक ऑफर्स, स्कीम्स, रिवॉर्ड आणि गिफ्ट्स ऑफर केले आहेत. दसरा, धनत्रयोदशी आणि दिवाळीचे औचित्य साधून ग्राहकांना उपलब्ध असतील. या ऑफर 30,000+ टच पॉईंटवर उपलब्ध असल्यामुळे, कस्टमरला त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यास मदत करणाऱ्या सुलभ ईएमआय फायनान्सिंग पर्यायांमुळे त्यांना अधिकाधिक लाभ प्राप्त होणार आहे.

या वर्षी, टू-व्हीलर लोनसाठी कंपनीची दिवाळी ऑफर 95% पर्यंत फंडिंग आणि पर्सनल लोनसाठी पात्रतेसह ₹15,000 किंमतीच्या खात्रीशीर डिस्काउंट व्हाउचरसह लोन कालावधीच्या 60 महिन्यांपर्यंत त्वरित मंजुरीचे वचन देते.

कंपनी कंझ्युमर ड्युरेबल प्रॉडक्ट्सच्या खरेदीवर 10% कॅशबॅक देखील ऑफर करीत आहे. आधार-आधारित लोन मंजुरी प्रक्रिया, शून्य डाउन पेमेंट आणि नो-कॉस्ट ईएमआय कस्टमरसाठी यामुळे कस्टमर साठी सुलभ फायनान्सिंग पर्याय उपलब्ध होतो.

याव्यतिरिक्त, इन्स्टाकार्डसह असलेल्या आमच्या विद्यमान कस्टमर्सना या कालावधीदरम्यान केलेल्या ट्रान्झॅक्शनसाठी ₹10,000 पर्यंत डिस्काउंट व्हाउचर मिळेल.

कंपनीने महत्वकांक्षी कंझ्युमर प्रोत्साहन मोहिमेचा भाग म्हणून "मॅजिकल दिवाळी" कॅम्पेनचे पाचवे सीझन लाँच केले आहे. ही एकात्मिक विपणन मोहीम सणासुदीच्या काळात कस्टमरला आकर्षक बक्षिसे देऊन डिजिटल चॅनेल आणि पॉइंट ऑफ सेलच्या माध्यमातून गुंतवून ठेवेल.

या अंदाजावर भाष्य करताना, टीव्हीएस क्रेडिटचे सीईओ आशिष सप्रा म्हणाले: “आम्ही आमच्या चॅनेल पार्टनर सोबत नातेसंबंध निर्माण करण्याचा आणि ग्राहकांना त्यांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या आमच्या नाविन्यपूर्ण लोन ऑफरद्वारे पैशासाठी अधिक चांगले मूल्य देण्याचा विचार करत असल्यामुळे आमचा मागणीचा दृष्टीकोन आशादायक आहे. या सीझन मध्ये ग्राहकांच्या भावना उत्साही असण्याची शक्यता आहे. ज्यामुळे लोन वितरणात वाढ होईल.”

टीव्हीएस क्रेडिट आपल्या कस्टमरला सुलभ वित्तपुरवठा पर्यायांद्वारे सक्षम करून मोठ्या आकांक्षा बाळगण्यास मदत करण्याच्या वचनावर आधारित आहे. त्यांच्या उत्सवाच्या ऑफरिंगमध्ये अत्यंत आवश्यक आर्थिक समावेशन असेल, ज्यामुळे भारताचे सक्षमीकरण करण्याचे त्यांचे दृष्टीकोन पुढे येईल.

परिशिष्टे:
1. टीव्हीएस क्रेडिटच्या टू-व्हीलर लोन ऑफर व्हिडिओच्या लिंक:
a. https://www.youtube.com/watch?v=Jvgs7I3Nv5o
b. https://www.youtube.com/watch?v=tThw-kRHA1g
c. https://www.youtube.com/watch?v=9ira_NvpdRI
2. JPEG फॉरमॅटमध्ये टीव्हीएस क्रेडिट लोन ऑफरिंग

टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेडविषयी:
टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेड ही आरबीआय सह रजिस्टर्ड अग्रगण्य नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी आहे. संपूर्ण भारतातील 31,000 टचपॉईंट्ससह, कंपनीचे उद्दीष्ट भारतीयांना मोठे स्वप्न पाहण्यासाठी आणि त्यांची आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सक्षम बनवणे आहे. टीव्हीएस मोटर लिमिटेड साठी पहिल्या क्रमांकाचा फायनान्सर आणि आघाडीच्या ट्रॅक्टर फायनान्सरपैकी एक असल्याने टीव्हीएस क्रेडिटचा यूज्ड कार लोन्स, कंझ्युमर ड्युरेबल लोन्स, यूज्ड कमर्शियल व्हेईकल लोन्स आणि बिझनेस लोन सेगमेंट मध्ये वेगाने विस्तार होत आहे. मजबूत नवीन-युगातील तंत्रज्ञान आणि डाटा विश्लेषणाद्वारे समर्थित, कंपनीने 17,000+ कर्मचाऱ्यांच्या मदतीने 8.4 दशलक्षपेक्षा अधिक आनंदी कस्टमर्सना सर्व्हिस दिली आहे.

मीडिया संपर्क: टीव्हीएस क्रेडिट

रुचिका राणा
वरिष्ठ व्यवस्थापक, ब्रँडिंग आणि संवाद
मोबाईल: +91 9910036860
ईमेल: ruchika.rana@tvscredit.com
वेब: https://www.tvscredit.com/


  • यावर शेअर करा
  • Share it on Facebook
  • Share it on Twitter
  • Share it on Linkedin

साईन-अप करा आणि मिळवा नवीन अपडेट्स आणि ऑफर्स

व्हॉट्सॲप

ॲप डाउनलोड करा

संपर्कात राहूया!