चेन्नई, 10 ऑगस्ट 2022:गेल्या 10 वर्षांपासून टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेडचे यशस्वी नेतृत्व केल्यानंतर, श्री जी.व्यंकटरमण 31ऑगस्ट 2022 रोजी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवृत्त होणार आहेत. त्यांच्या नंतर श्री. आशिष सप्रा हे सीईओ म्हणून पदभार सांभाळतील. सप्टेंबर 2022 महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संस्थेच्या कामकाजात सहभागी होतील.
टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेडचे संचालक श्री. सुदर्शन वेणू म्हणाले, “गेल्या काही वर्षांत, टीव्हीएस क्रेडिटने जलद आणि फायदेशीर मार्गाने वाढ करण्यासाठी खरोखरच चांगली कामगिरी केली आहे. अल्पावधीत, कंपनीचा योग्य बॅलन्स शीट सह 15,000+ Cr रुपयांच्या एयूएम सह विस्तार झाला आहे. व्यंकट यांच्या समर्पित आणि ध्यास पूर्व नेतृत्वाच्या बद्दल मी त्यांचे आभार मानू इच्छितो. पुढील फेज साठी साठी, आमचे लक्ष डिजिटायझेशन मध्ये वाढ, नवीन कस्टमर वाढ आणि जलद विकास यावर असेल. आशिष यांच्याकडे संबंधित अनुभव आणि योग्य ट्रॅक रेकॉर्ड आहे आणि मला विश्वास आहे की त्याच्या नेतृत्वाखाली टीव्हीएस क्रेडिट नवीन उंची गाठेल आणि अनेक पटीने विस्तार होईल.”
श्री आशिष सप्रा यांच्याकडे 25+ वर्षांचा व्यावसायिक कामाचा अनुभव आहे आणि त्यांनी रिटेल अॅसेट, इन्श्युरन्स, कार्ड, वेल्थ मॅनेजमेंट यासह फायनान्शियल प्रॉडक्टच्या विस्तृत श्रेणीमध्ये काम केले आहे आणि क्रॉस सेलमध्ये परिपूर्ण कौशल्याचा विचार केला आहे. टीव्हीएस क्रेडिटमध्ये सामील होण्यापूर्वी, ते बजाज समूहाशी 14+ वर्षे त्यांच्या हाऊसिंग फायनान्स, जनरल इन्शुरन्स आणि एनबीएफसी व्यवसायांच्या माध्यमातून संबंधित होते. त्यांच्याकडे पी अँड एल फायनान्स, मॅनेजमेंट, ड्रायव्हिंग यांचा अनुभव आहे
डिजिटल आणि तंत्रज्ञान उपक्रम चालविणे, वरिष्ठ भागधारकांचे कार्यक्षमतेने व्यवस्थापन करणे, नफा इष्टतम करण्यासाठी बिझनेस सुरू करणे आणि त्यात परिवर्तन करणे याचा अनुभव आहे. त्यांनी अमेरिकन एक्सप्रेस, एचएसबीसी आणि स्टँडर्ड चार्टर्ड बँकेसह देखील काम केले आहे.
रुचिका राणा
वरिष्ठ व्यवस्थापक, ब्रँडिंग आणि संवाद
मोबाईल: +91 9910036860
ईमेल: ruchika.rana@tvscredit.com
वेब: https://www.tvscredit.com/
साईन-अप करा आणि मिळवा नवीन अपडेट्स आणि ऑफर्स