hamburger icon
products image

प्रेस रिलीज

महत्त्वपूर्ण पैलू आणि घडामोडी जाणून घ्या

टीव्हीएस क्रेडिटचे चार राज्यांत रिटेलर नेटवर्कचा विस्तार, 'रिटेलर कनेक्ट' मार्केटिंग प्रोग्रामद्वारे सुसंवाद

प्रकाशन: टीव्हीएस क्रेडिट तारीख: 13 | जुलै | 2022

तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांमध्ये ऑन-ग्राऊंड कॅम्पेनद्वारे रिटेलर लोनविषयी जागरूकता वाढविण्याच्या हेतूने प्रयत्नशाली आहे

तमिळनाडू, चेन्नई, जुलै 13, 2022: भारतातील अग्रगण्य आणि सर्वात वेगाने वाढणारे फायनान्शियल सर्व्हिस प्रोव्हायडर टीव्हीएस क्रेडिटने अलीकडेच लघु आणि मध्यम-आकाराच्या रिटेलर्सच्या आवश्यकतांची पूर्तता करण्यास मदत करण्यासाठी वर्किंग कॅपिटल लोन्स, अनसिक्युअर्ड बिझनेस लोन्स आणि स्टॉक खरेदी फायनान्सिंग यासारख्या रिटेलर लोन ऑफरिंग विषयी जागरूकता पसरविण्यासाठी आपले 'रिटेलर कनेक्ट' मार्केटिंग सक्रियकरण सुरू केले आहे.

गेल्या काही वर्षांपासून स्थानिक रिटेल सेक्टर सतत वाढत असताना, ते अपात्र राहिले आहे. त्यांचे खरे सामर्थ्य जाणण्यासाठी, एनबीएफसीने सुलभ क्रेडिटची उपलब्धता करण्याद्वारे महत्वपूर्ण भूमिका बजावू शकते. TVS क्रेडिट रिटेलर्सना त्यांच्या वर्किंग कॅपिटलवर चांगले नियंत्रण आणि त्यांच्या इन्व्हेंटरीवर लवचिकता प्रदान करणारे आर्थिक उपाय प्रदान करते.

“टीव्हीएस क्रेडिटमध्ये, आम्ही कस्टमरच्या स्वप्नांना पाठबळ देण्यासाठी कस्टमरला सक्षम करण्यासाठी वेळेवर आणि माफक स्वरुपात क्रेडिट उपलब्ध करुन देण्यासाठी कटिबद्ध आहोत. आमचा रिटेलर कनेक्ट प्रोग्रामचे विशिष्ट स्वरुपाचे ध्येय आहे: लहान रिटेलर्सना त्यांचा व्यवसाय वाढविण्यास सक्षम करणे. आगामी काही आठवड्यांत, आम्ही या कार्यक्रमाद्वारे चार राज्यांतील 1,00,000 रिटेलर सोबत जोडले जाण्याचे आमचे ध्येय आहे.”, श्री चरणदीप सिंग, प्रमुख - मार्केटिंग आणि सीआरएम, टीव्हीएस क्रेडिट यांनी म्हटले आहे.

सुरेश कुमार, प्रोप्रायटर - सुभाष स्टोअर, चेन्नई, म्हणाले, “माझ्या वडिलांसोबत मी गेल्या 40 वर्षांपासून एक जनरल प्रोव्हिजन स्टोअर चालवत आहे. आमच्या खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी, आम्ही अनेक बँकांशी संपर्क साधला मात्र अनेक कागदपत्रे हवी असल्याचे लोन मिळू शकले नाही. त्यावेळी, आमच्या वितरकांपैकी एकाद्वारे टीव्हीएस क्रेडिटची शिफारस करण्यात आली. यानंतर आम्ही टीव्हीएस क्रेडिटच्या प्रतिनिधीला आमची आवश्यकता कळविली. अगदी त्रासमुक्त आणि किचकट डॉक्युमेंटेशन शिवाय त्यांनी मला लोन मिळविण्यास सहाय्य केले. मी निश्चितच माझे मित्र आणि परिवाराला टीव्हीएस क्रेडिट लोन्सची शिफारस करेल.”

हे कॅम्पेन सध्या तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतील अनेक शहरांमध्ये सुरू आहे. रिटेलर विक्रेत्यांना लोन कर्ज ऑफर सामायिक करण्याद्वारे रोड शो आणि मार्केटिंगच्या माध्यमातून रिटेलर विक्रेत्यांपर्यंत पोहोचत आहे. ज्यामुळे त्यांना त्यांचा व्यवसाय वाढविण्यात मदत होईल.

टीव्हीएस क्रेडिटच्या अन्य लोन ऑफरमध्ये टू-व्हीलर लोन्स, यूज्ड कार लोन्स, ट्रॅक्टर लो्न्स, यूज्ड कमर्शियल व्हेईकल लोन्स, बिझनेस लोन्स, कंझ्युमर लोन्स आणि पर्सनल लोन्स यांचा समावेश आहे.

टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेडविषयी

टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेड ही आरबीआय सह रजिस्टर्ड अग्रगण्य नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी आहे. संपूर्ण भारतातील 31,000 टचपॉईंट्ससह, कंपनीचे उद्दीष्ट भारतीयांना मोठे स्वप्न पाहण्यासाठी आणि त्यांची आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सक्षम बनवणे आहे. टीव्हीएस मोटर लिमिटेड साठी पहिल्या क्रमांकाचा फायनान्सर आणि आघाडीच्या ट्रॅक्टर फायनान्सरपैकी एक असल्याने टीव्हीएस क्रेडिटचा यूज्ड कार लोन्स, कंझ्युमर ड्युरेबल लोन्स, यूज्ड कमर्शियल व्हेईकल लोन्स आणि बिझनेस लोन सेगमेंट मध्ये वेगाने विस्तार होत आहे. मजबूत नवीन-युगातील तंत्रज्ञान आणि डाटा विश्लेषणाद्वारे समर्थित, कंपनीने 17,000+ कर्मचाऱ्यांच्या मदतीने 8.4 दशलक्षपेक्षा अधिक आनंदी कस्टमर्सना सर्व्हिस दिली आहे.

मीडिया संपर्क: टीव्हीएस क्रेडिट

रुचिका राणा
वरिष्ठ व्यवस्थापक, ब्रँडिंग आणि संवाद
मोबाईल: +91 9910036860
ईमेल: ruchika.rana@tvscredit.com
वेब: https://www.tvscredit.com/


  • यावर शेअर करा

साईन-अप करा आणि मिळवा नवीन अपडेट्स आणि ऑफर्स

व्हॉट्सॲप

ॲप डाउनलोड करा

संपर्कात राहूया!