नॅशनल, मे 04, 2023: टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेड, भारतातील अग्रगण्य एनबीएफसीपैकी एक यांचे, चौथ्या तिमाहीसाठी आणि मार्च 31, 2023 ला समाप्त झालेल्या वर्षासाठी ऑडिटेड फायनान्शियल परिणाम प्रकाशित.
एनबीएफसीने मार्च 31, 2023 ला समाप्त झालेल्या तिमाहीसाठी ₹1,236 कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न आणि टॅक्स नंतर ₹111 कोटींचा निव्वळ नफा नोंदवला असून मागील वर्षाची संबंधित तिमाही विचारात घेता अनुक्रमे 60% आणि 76% ची वाढ दिसून येत आहे.
कंपनीने वितरणाच्या बाबतीत आर्थिक वर्ष 23 मध्ये सातत्याने प्रगती साधली आहे. क्रेडिट डिमांड आणि कस्टमाईज्ड प्रॉडक्ट ऑफरिंग्स यामुळे प्रगतीला चालना मिळाली ज्याचा कस्टमर्सनी पुरेपूर लाभ घेतला. कस्टमर्सना अखंड अनुभव देण्यासाठी कंपनी भविष्यासाठी तयार असलेले तंत्रज्ञान आणि डिजिटल क्षमता निर्माण करण्यासाठी गुंतवणूक करीत आहे आणि ते करीत राहील.
एफवाय23 परिणामांचा सारांश:
• मार्च'23 पर्यंत एयूएम ₹20,602 कोटी, मार्च'22 पासून 48% ने वाढ
• आर्थिक वर्ष 23 चे एकूण उत्पन्न ₹4,160 कोटी होते, मागील वर्षापेक्षा 51% ने वाढ
• आर्थिक वर्ष 23 साठी टॅक्स पूर्वीचा नफा ₹511 कोटी, मागील वर्षापेक्षा 238% वाढ
• मार्च'23 ला समाप्त झालेल्या वर्षासाठी टॅक्स नंतर निव्वळ नफा ₹389 कोटी होता, मागील वर्षापेक्षा 221% ने वाढ
कामगिरीवर टिप्पणी करताना, सीईओ, श्री. आशिष सप्रा, म्हणाले, "आम्ही आर्थिक वर्ष 23 अत्यंत यशस्वीरित्या समाप्त करीत आहोत, ज्यात प्रॉडक्ट्समधील डिस्बर्समेंट्स मध्ये लक्षणीय वाढ दिसून येत आहे. 1 कोटीपेक्षा जास्त विस्तारित कस्टमर बेससह, आमचा भर डाटा आणि तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन कस्टमर अनुभव वर्धित करण्यावर राहील.”
सर्व प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या सुलभ ईएमआय फायनान्सिंग पर्यायांसह, कंपनी विकसनशील भारतीयांच्या आकांक्षा पूर्ण करीत आहे.
टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेडविषयी:
टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेड ही आरबीआय सह रजिस्टर्ड अग्रगण्य नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी आहे. संपूर्ण भारतातील 31,000 टचपॉईंट्ससह, कंपनीचे उद्दीष्ट भारतीयांना मोठे स्वप्न पाहण्यासाठी आणि त्यांची आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सक्षम बनवणे आहे. टीव्हीएस मोटर कंपनी लिमिटेडसाठी प्रथम क्रमांकाची फायनान्सर आणि आघाडीच्या ट्रॅक्टर फायनान्सरपैकी एक असल्याने, टीव्हीएस क्रेडिटचा यूज्ड कार लोन्स, कन्झ्युमर ड्युरेबल लोन्स, यूज्ड कमर्शियल व्हेईकल लोन्स आणि अनसिक्युअर्ड लोन्स सेगमेंटमध्ये वेगाने वाढणारा ठसा आहे. मजबूत नवीन-युगातील तंत्रज्ञान आणि डाटा विश्लेषणाद्वारे समर्थित, कंपनीने तिच्या 17,000+ कर्मचाऱ्यांच्या मदतीने जवळपास 10 दशलक्ष पेक्षा जास्त आनंदी कस्टमर्सना सर्व्हिस दिली आहे.
रुचिका राणा
वरिष्ठ व्यवस्थापक, ब्रँडिंग आणि संवाद
मोबाईल: +91 9910036860
ईमेल: ruchika.rana@tvscredit.com
वेब: https://www.tvscredit.com/
साईन-अप करा आणि मिळवा नवीन अपडेट्स आणि ऑफर्स