hamburger icon
products image

प्रेस रिलीज

महत्त्वपूर्ण पैलू आणि घडामोडी जाणून घ्या

टीव्हीएस क्रेडिटद्वारे Q3 एफवाय23 च्या शेवटी ॲसेट अंडर मॅनेजमेंट मध्ये ₹19,541 कोटी पर्यंत वाढ

प्रकाशन: टीव्हीएस क्रेडिट तारीख: 25 | जानेवारी | 2023

राष्ट्रीय, जानेवारी 25, 2023:: भारतातील प्रमुख एनबीएफसीपैकी एक असलेल्या टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेडने, डिसेंबर 31, 2022 ला समाप्त झालेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी तिचे अनऑडिटेड फायनान्शियल परिणाम प्रकाशित केले आहेत.

एनबीएफसीने डिसेंबर 31, 2022 ला समाप्त झालेल्या नऊ महिन्यांसाठी ₹278 कोटीच्या टॅक्स नंतर निव्वळ नफ्याची नोंद केली आहे. डिसेंबर'21 च्या तुलनेत कंपनीच्या एयूएम ने डिसेंबर 22 पर्यंत 53% च्या वर्षागणिक वाढीची नोंदणी केली.

Q3 एफवाय23 परिणामांचा सारांश:

• एयूएम डिसेंबर 22 पर्यंत ₹19,541 कोटी आहे, डिसेंबर 21 पेक्षा 53% वाढ
• डिसेंबर'22 ला समाप्त झालेल्या नऊ महिन्यांसाठी एकूण उत्पन्न ₹2,925 कोटी होते, मागील वर्षाच्या संबंधित कालावधीच्या तुलनेत 47% वाढ
• डिसेंबर'22 ला समाप्त झालेल्या नऊ महिन्यांसाठी टॅक्सनंतर निव्वळ नफा ₹278 कोटी होता, मागील वर्षाच्या संबंधित कालावधीसाठीच्या ₹58 कोटींच्या तुलनेत

कामगिरीवर टिप्पणी करताना, सीईओ, श्री. आशिष सप्रा, म्हणाले, "Q3 FY23 मध्ये, सबंध प्रॉडक्ट्समध्ये मजबूत चालनेमुळे आमच्या बिझनेसमध्ये लोन डिस्बर्समेंट मध्ये वाढ दिसून आली आहे. आम्ही या आर्थिक वर्षात आजपर्यंत 2 दशलक्षपेक्षा अधिक कस्टमर्सचा समावेश केला आहे, ज्यामुळे आमचा एकूण कस्टमर बेस जवळपास 10 दशलक्ष झाला आहे आहे.
आम्ही सुधारित कस्टमर अनुभव प्रदान करणे सुरू ठेवू आणि नवीन मार्केटमध्ये आमच्या फूटप्रिंटचा विस्तार करू.”

टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेडविषयी:

टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेड ही आरबीआय सह रजिस्टर्ड अग्रगण्य नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी आहे. संपूर्ण भारतातील 31,000 टचपॉईंट्ससह, कंपनीचे उद्दीष्ट भारतीयांना मोठे स्वप्न पाहण्यासाठी आणि त्यांची आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सक्षम बनवणे आहे. टीव्हीएस मोटर लिमिटेड आणि प्रमुख ट्रॅक्टर फायनान्शियर्स साठी एक फायनान्शियर म्हणून, टीव्हीएस क्रेडिटमध्ये यूज्ड कार लोन्स, कंझ्युमर ड्युरेबल लोन्स, यूज्ड कमर्शियल व्हेईकल लोनमध्ये वेगाने विस्तारणारी कामगिरी आहे,
आणि अनसिक्युअर्ड लोन्स सेगमेंट. मजबूत नवीन-युगातील तंत्रज्ञान आणि डाटा विश्लेषणाद्वारे समर्थित, कंपनीने त्यांच्या 17,000+ कर्मचाऱ्यांच्या मदतीने जवळपास 10 दशलक्ष आनंदी कस्टमर्सना सर्व्हिस दिली आहे.

 

मीडिया संपर्क: टीव्हीएस क्रेडिट

रुचिका राणा
वरिष्ठ व्यवस्थापक, ब्रँडिंग आणि संवाद
मोबाईल: +91 9910036860
ईमेल: ruchika.rana@tvscredit.com
वेब: https://www.tvscredit.com/


  • यावर शेअर करा

साईन-अप करा आणि मिळवा नवीन अपडेट्स आणि ऑफर्स

व्हॉट्सॲप

ॲप डाउनलोड करा

संपर्कात राहूया!