आम्ही, टीव्हीएस क्रेडिटमध्ये गुणवत्तेवर आधारित औपचारिक भरती प्रक्रिया राबवतो. आम्ही भरती प्रक्रियेदरम्यान अर्जदारांकडून कोणतेही शुल्क किंवा डिपॉझिटची मागणी कधीही करत नाही. फसवणुकीचा ईमेल/ऑफर पाठविण्यासाठी TVS क्रेडिट डोमेन आयडी स्पूफिंग करणाऱ्या लबाडांपासून सावधानता बाळगा. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Hamburger Menu Icon
products image

प्रेस रिलीज

महत्त्वपूर्ण पैलू आणि घडामोडी जाणून घ्या

टीव्हीएस क्रेडिटने H1 FY25 मध्ये PAT मध्ये H1 FY24 सापेक्ष 19% वाढ नोंदविली आहे आणि आजपर्यंत 1.6 कोटीपेक्षा जास्त ग्राहकांना सेवा दिली आहे

प्रकाशन: टीव्हीएस क्रेडिट तारीख: 15 | ऑक्टोबर | 2024

चेन्नई, ऑक्टोबर 14, 2024: भारतातील अग्रगण्य एनबीएफसीपैकी एक असलेल्या टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेडने सप्टेंबर 30, 2024 ला समाप्त झालेल्या तिमाही आणि अर्ध-वर्षासाठी तिचे अनऑडिटेड फायनान्शियल परिणाम प्रकाशित केले आहेत, ज्यामुळे कंपनीची मजबूत वाढ आणि फायनान्शियल स्थिरता प्रतिबिंबित होते.

 

कंपनीने सप्टेंबर'24 पर्यंत ₹26,652 कोटीच्या ॲसेट अंडर मॅनेजमेंट (एयूएम) ची नोंद केली, ₹3,136 कोटींची वाढ आणि सप्टेंबर'23 च्या तुलनेत 13% वाढ झाली. कंपनीचे एकूण उत्पन्न वर्षानुवर्षे 18% ने वाढले आणि H1 FY25 मध्ये ₹3,245 कोटी होते. टॅक्स नंतरच्या निव्वळ नफ्यात वर्षानुवर्षे 20% च्या निरोगी वाढीची नोंद झाली आणि H1 FY25 मध्ये ₹301 कोटी झाली. H1 मध्ये 20 लाखांपेक्षा जास्त नवीन कस्टमर्सच्या समावेशासह, कंपनीने आजपर्यंत 1.6 कोटीपेक्षा जास्त कस्टमर्सना सर्व्हिस दिली आहे.

 

Q2 FY25 हायलाईट्स:

  • Q2 FY25 पर्यंत एयूएम ₹26,652 कोटी आहे, Q2 FY24 च्या तुलनेत 13% वाढ.
  • Q2 FY25 साठी एकूण उत्पन्न ₹1639 कोटी होते. Q2 FY24 च्या तुलनेत 17% वाढ.
  • Q2 FY25 साठी टॅक्स पूर्वीचे प्रॉफिट ₹216 कोटी आहे. Q2 FY24 च्या तुलनेत 20% वाढीची नोंद.
  • Q2 FY25 साठी टॅक्स नंतर निव्वळ नफा ₹161 कोटी होता, Q2 FY24 च्या तुलनेत 20% वाढ.

 

H1 FY25 हायलाईट्स:

  • सप्टेंबर'24 पर्यंत एयूएम ₹26,652 कोटी आहे, सप्टेंबर'23 च्या तुलनेत 13% वाढ.
  • H1 FY25 साठी एकूण उत्पन्न ₹3245 कोटी होते. H1 FY24 च्या तुलनेत 18% वाढ झाली.
  • H1 FY25 साठी टॅक्स पूर्वीचा नफा ₹403 कोटी आहे, H1 FY24 च्या तुलनेत 20% वाढ.
  • H1 FY25 साठी टॅक्स नंतरचा निव्वळ नफा ₹301 कोटी होत. H1 FY24 च्या तुलनेत 19% वाढ.

 

H1 FY25 दरम्यानच्या वितरणात कंपनीने आपली मजबूत वाढीची गती कायम ठेवली, प्रामुख्याने वापर आणि प्रवेशातील वाढीद्वारे समर्थित वितरण पोहोच वाढल्याने चालना दिली. त्याच्या चालू जोखीम व्यवस्थापन आणि पोर्टफोलिओ ऑप्टिमायझेशनचा भाग म्हणून, कंपनीने क्रेडिट नियम पुढे मजबूत करण्यासाठी सक्रिय पावले उचलली आहेत, ज्यामुळे मार्केटच्या विकसनशील स्थितींमध्ये शाश्वत पोर्टफोलिओ आरोग्य सुनिश्चित केले आहे. प्रॉडक्ट ऑफरिंग्स, वितरण, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, कस्टमर अनुभवात वाढ, कामातील कार्यक्षमता यासाठी टीव्हीएस क्रेडिट सातत्याने कटिबद्ध आहे.

सध्या सुरू असलेल्या सणासुदीच्या हंगामात, टीव्हीएस क्रेडिटने कस्टमरच्या आकांक्षांची पूर्तता करण्यासाठी विस्तृत श्रेणीच्या प्रॉडक्ट स्कीम आणि आकर्षक ऑफर कस्टमर साठी जाहीर केल्या आहेत.

 

TVS क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेड:

टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेड ही आरबीआय सह रजिस्टर्ड भारतातील अग्रगण्य आणि वैविध्यपूर्ण नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी आहे. संपूर्ण भारतातील 46,500 टचपॉईंट्ससह, कंपनीचे उद्दीष्ट भारतीयांना मोठे स्वप्न पाहण्यासाठी आणि त्यांची आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सक्षम बनवणे आहे. टीव्हीएस मोटर कंपनी लिमिटेड साठी पहिल्या क्रमांकाचे फायनान्सर आणि आघाडीच्या कंझ्युमर ड्युरेबल्स आणि मोबाईल फोन फायनान्सरपैकी एक असल्याने टीव्हीएस क्रेडिट च्या यूज्ड कार लोन्स, ट्रॅक्टर लोन्स, यूज्ड कमर्शियल व्हेईकल लोन्स आणि अनसिक्युअर्ड लोन्स मागणीत वाढ होत आहे. मजबूत नवीन-युगातील तंत्रज्ञान आणि डाटा विश्लेषणाद्वारे समर्थित, कंपनीने 1.6 कोटीपेक्षा जास्त आनंदी कस्टमरला सर्व्हिस प्रदान केली आहे.

मीडिया संपर्क:

पॉल एबेनेझर

मोबाईल: +91 7397398709

ईमेल: paul.ebenezer@tvscredit.com

श्रुती एस

मोबाईल: +91 9962899337

ईमेल: Sruthi.S@tvscredit.com


  • यावर शेअर करा
  • Share it on Facebook
  • Share it on Twitter
  • Share it on Linkedin

साईन-अप करा आणि मिळवा नवीन अपडेट्स आणि ऑफर्स

व्हॉट्सॲप

ॲप डाउनलोड करा

संपर्कात राहूया!