hamburger icon
products image

प्रेस रिलीज

महत्त्वपूर्ण पैलू आणि घडामोडी जाणून घ्या

टीव्हीएस क्रेडिटद्वारे मालेगाव, नाशिकमध्ये मॅजिकल दिवाळी सीझन 6 मेगा प्राईज विजेता टीव्हीएस ज्युपिटर सह पुरस्कृत

प्रकाशन: टीव्हीएस क्रेडिट तारीख: 11 | जानेवारी | 2024

चेन्नई, जानेवारी 11, 2024: भारताची आघाडीची एनबीएफसी टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेडने मॅजिकल दिवाळी सीझन 6 मेगा प्राईज विजेत्यांचा टीव्हीएस ज्युपिटर देऊन नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे जानेवारी 9, 2024 रोजी गौरव केला. मॅजिकल दिवाळी हंगामात कंझ्युमर ड्युरेबल लोन घेतलेल्या प्राप्तकर्ता, कस्टमरला हा रिवॉर्ड मिळाला.

कस्टमरने सांगितले, "खरंतर पहिल्यांदा मला विश्वास बसला नाही. जेव्हा मला टीव्हीएस क्रेडिट मधून मला टीव्हीएस ज्युपिटर जिंकल्याचे समजले. हे आश्चर्यकारक होते! मी अल्फा एनएक्स डीलरशिप मधून मोबाईल खरेदी केला आणि टीव्हीएस क्रेडिटची मॅजिकल दिवाळी स्पर्धा जिंकली. मी त्यांना धन्यवाद देतो!”

मॅजिकल दिवाळी हे टीव्हीएस क्रेडिटने त्यांच्या सीझन 6 मध्ये हाती घेतलेले इंटिग्रेटेड मार्केटिंग कॅम्पेन आहे. ज्याद्वारे लोन इच्छुक आणि ब्रँड साठी आग्रही असलेल्यांना टू-व्हीलर लोन, मोबाईल लोन, कंझ्युमर ड्युरेबल लोन, इन्स्टाकार्ड आणि पर्सनल लोन घेण्यास आमंत्रित केले जाते. या स्पर्धेचे आयोजन ऑक्टोबर 25 ते नोव्हेंबर 30, 2023 दरम्यान करण्यात आले आणि सहभागी व्यक्तींना नियमित आणि मेगा बक्षिसे ₹22 लाखांपर्यंत प्रदान करण्यात आली. सहभागी स्पर्धक हे दैनंदिन बक्षिसे ज्यामध्ये व्हाउचर्स, स्मार्टफोन्स आणि मेगा बक्षिसे जसे की, टीव्हीएस ज्युपिटर, गोल्ड कॉईन्स, फॉरेन ट्रिप, प्री-लोडेड कार्ड आणि स्मार्ट टीव्ही यांचा समावेश होता. स्पर्धेचे आयोजन हे 32,000 हून अधिक डीलरशिपच्या सहयोगाने करण्यात आले. जेणेकरुन कंझ्युमर ड्युरेबल आणि टू-व्हीलर कस्टमर सोबत सहजगत्या पोहचता येईल.

मॅजिकल दिवाळी सीझन 6 स्पर्धेत 36.7 दशलक्ष ऑनलाईन यूजर्स स्पर्धेत थेट सहभागी झाले. 12,500+ कस्टमर्सनी त्यांच्या यशात थेट सहभाग नोंदविला.

टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेडविषयी:

टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेड ही आरबीआय सह नोंदणीकृत भारतातील सर्वात वेगाने वाढणारी नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी आहे. संपूर्ण भारतातील 40,000 टचपॉईंट्ससह, कंपनीचे उद्दीष्ट भारतीयांना मोठे स्वप्न पाहण्यासाठी आणि त्यांची आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सक्षम बनवणे आहे. टीव्हीएस मोटर कंपनी लिमिटेडसाठी प्रथम क्रमांकाची फायनान्सर आणि आघाडीच्या ट्रॅक्टर फायनान्सरपैकी एक असल्याने, टीव्हीएस क्रेडिटचा यूज्ड कार लोन्स, कन्झ्युमर ड्युरेबल लोन्स, यूज्ड कमर्शियल व्हेईकल लोन्स आणि अनसिक्युअर्ड लोन्स सेगमेंटमध्ये वेगाने वाढणारा ठसा आहे. मजबूत नवीन-युगातील तंत्रज्ञान आणि डाटा विश्लेषणाद्वारे समर्थित, कंपनीने 1.2 कोटींपेक्षा जास्त आनंदी कस्टमर्सना सर्व्हिस दिली आहे.

मीडिया संपर्क: टीव्हीएस क्रेडिट

रुचिका राणा
वरिष्ठ व्यवस्थापक, ब्रँडिंग आणि संवाद
मोबाईल: +91 9910036860
ईमेल: ruchika.rana@tvscredit.com
वेब: https://www.tvscredit.com/


  • यावर शेअर करा

साईन-अप करा आणि मिळवा नवीन अपडेट्स आणि ऑफर्स

व्हॉट्सॲप

ॲप डाउनलोड करा

संपर्कात राहूया!