आम्ही, टीव्हीएस क्रेडिटमध्ये गुणवत्तेवर आधारित औपचारिक भरती प्रक्रिया राबवतो. आम्ही भरती प्रक्रियेदरम्यान अर्जदारांकडून कोणतेही शुल्क किंवा डिपॉझिटची मागणी कधीही करत नाही. फसवणुकीचा ईमेल/ऑफर पाठविण्यासाठी TVS क्रेडिट डोमेन आयडी स्पूफिंग करणाऱ्या लबाडांपासून सावधानता बाळगा. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

hamburger icon
products image

प्रेस रिलीज

महत्त्वपूर्ण पैलू आणि घडामोडी जाणून घ्या

टीव्हीएस क्रेडिटची तेजोमय दिवाळी, सबकीतरक्की कॅम्पेनला प्रतिसाद

प्रकाशन: टीव्हीएस क्रेडिट तारीख: 9 | नोव्हेंबर | 2021

नवी दिल्ली, नोव्हेंबर 9, 2021 टीव्हीएस क्रेडिटने सणासुदीच्या हंगामात #SabkiTarakki या संदेशासह हृदयस्पर्शी व्हिडिओ रिलीज केला आहे. व्हिडिओ कॅम्पेन 'सर्वांसाठी प्रगती' विषयी चर्चा करते. ज्याद्वारे कस्टमर सक्षमीकरणाचा आणि त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्याचा ब्रँडचा हेतू प्रतिध्वनित होतो.

व्हिडिओमध्ये, एक वडील आपल्या मुलांना #SabkiTarakki चा खरा अर्थ समजावून सांगतात आणि म्हणतात की 'प्रगती सर्वांची झाली पाहिजे'’. डिजिटल सिनेमा, #SabkiTarakki ची संकल्पना डी वर्क्स कम्युनिकेशन्स द्वारे करण्यात आली आहे.

कॅम्पेनचा एक भाग म्हणून, टीव्हीएस क्रेडिटने त्यांच्या फ्लॅगशिप कन्झ्युमर प्रमोशन #MagicalDiwali च्या चौथ्या सीझनला देखील दणदणीत सुरुवात केली. या प्रमोशनद्वारे, ब्रँड आपल्या कस्टमर्सशी डिजिटल चॅनेलद्वारे जोडला जातो आणि त्यांना आकर्षक बक्षिसे देतो. कस्टमर्स त्यांच्या अलीकडील लोन खरेदीसह सेल्फी घेऊन स्मार्ट फोन आणि रोमांचक शॉपिंग व्हाउचर यांसारखे दैनंदिन बक्षिसे जिंकू शकतात. काही भाग्यवान विजेते जिंकू शकतात गोल्ड कॉईन्स, आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत
हॉलिडेज.

टीव्हीएस क्रेडिटचे विपणन प्रमुख आणि सीआरएम चरणदीप सिंह म्हणाले, "महामारीच्या मंदीच्या कालावधीनंतर आणि सणासुदीच्या उत्साहात, आम्ही या कॅम्पेनद्वारे प्रगती आणि आशेचा संदेश देऊ इच्छितो. एक ब्रँड म्हणून टीव्हीएस क्रेडिटने नेहमीच आपल्या कस्टमर्सना सक्षम बनविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे आणि ही कॅम्पेन आमचा #SabkiTarakki चा संदेश दर्शवते. आमच्या मॅजिकल दिवाळी कस्टमर प्रमोशनसह आम्ही कस्टमर्सशी जोडले जाण्याचा प्रयत्न केला आहे आणि आकर्षक बक्षिसे आणि आकर्षक ऑफर्ससह हा सण त्यांच्यासाठी खास बनवण्याचा प्रयत्न केला आहे.”

फेस्टिव्ह ऑफर्स तीन महिन्यांच्या कालावधीसाठी उपलब्ध असतील. ज्यादरम्यान कस्टमर्स टीव्हीएस क्रेडिटद्वारे ऑफर केलेल्या प्रॉडक्ट्सवर कमी ईएमआय स्कीम आणि कॅशबॅक स्कीम्ससारख्या विशेष लोन ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात.

टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेड ही संपूर्ण भारतात 32,000 हून अधिक स्थानांची उपस्थिती असलेली अग्रगण्य नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी आहे. टीव्हीएस मोटर कंपनी लिमिटेड आणि प्रमुख ट्रॅक्टर फायनान्शियर्समधील एक फायनान्शियर, टीव्हीएस क्रेडिटचा यूज्ड कार लोन्स, कन्झ्युमर ड्युरेबल लोन्स, यूज्ड कमर्शियल व्हेईकल लोन्समध्ये वेगाने वाढणारा फूटप्रिंट आहे.

6.5 दशलक्षाहून अधिक समाधानी कस्टमर्सना 19,000+ समर्पित कर्मचाऱ्यांच्या मदतीने आणि मजबूत तंत्रज्ञान आणि ॲनालिटिक्स-आधारित प्रोसेसेसच्या मदतीने सर्व्हिस देण्यात आली आहे. भारतीयांना मोठी स्वप्ने पाहण्यासाठी सक्षम बनविण्याच्या मिशनद्वारे प्रेरित, आम्ही त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी भागीदारी करत आहोत. नाविन्यपूर्ण प्रॉडक्ट्स आणि कस्टमर सर्व्हिस आणि सतत सुधारणा करण्याच्या आमची वचनबद्धता, टीव्हीएस क्रेडिट कस्टमर्स,
कर्मचारी आणि पार्टनर्सना लाभ देत आहे.

www.tvscredit.com. येथे टीव्हीएस क्रेडिटविषयी अधिक जाणून घ्या


  • यावर शेअर करा

साईन-अप करा आणि मिळवा नवीन अपडेट्स आणि ऑफर्स

व्हॉट्सॲप

ॲप डाउनलोड करा

संपर्कात राहूया!