चेन्नई, मे 09, 2024: भारतातील अग्रगण्य एनबीएफसी पैकी एक असलेल्या टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेडने 31 मार्च, 2024 रोजी संपलेली चौथी तिमाही आणि वर्षासाठी आर्थिक परिणाम प्रकाशित केले.
कंपनीने Q4 FY24 साठी एकूण उत्पन्न ₹1,519 कोटीचा अहवाल दिला, Q4 FY23 पासून 23% वाढ आणि Q4 FY24 साठी ₹148 कोटीच्या टॅक्स नंतर निव्वळ नफा, Q4 FY23 पासून 33% ची वाढ.
FY24 परफॉर्मन्स हायलाईट्स:
आर्थिक वर्ष 24 मध्ये एयूएम ₹ 25,900 कोटींवर पोहोचले आहे. आर्थिक वर्ष 23 च्या तुलनेत 26% वाढ नोंदविली गेली.
आर्थिक वर्ष 24 मध्ये एकूण उत्पन्न ₹5,795 कोटी होते. आर्थिक वर्ष 23 च्या तुलनेत 40% वाढ.
आर्थिक वर्ष 24 साठी टॅक्स पूर्वीचा नफा ₹762 कोटी असून आर्थिक वर्ष 23 च्या तुलनेत 49% वाढ.
आर्थिक वर्ष 24 साठी टॅक्स नंतर निव्वळ नफा ₹572 कोटी. आर्थिक वर्ष 23 च्या तुलनेत 47% वाढ.
आर्थिक वर्ष 24 दरम्यान, कंपनीने 43 लाखांपेक्षा जास्त नवीन कस्टमर्सचा समावेश केला. एकूण कस्टमर बेस 1.4 कोटी हून अधिक बनला आहे.
कंपनीने वितरणाच्या बाबतीत आर्थिक वर्ष 24 मध्ये सातत्याने प्रगती साधली आहे. क्रेडिट मागणी मधील वाढ, उपभोगातील विस्तार, वितरणाचा विस्तार यामुळे प्रगतीला चालना मिळाली. प्रॉडक्ट ऑफरिंग्स, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, कस्टमर अनुभवात वाढ, कामातील कार्यक्षमता यासाठी कंपनी सातत्याने कटिबद्ध आहे.
टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेडविषयी:
टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेड ही आरबीआय सह रजिस्टर्ड भारतातील अग्रगण्य आणि वैविध्यपूर्ण नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी आहे. संपूर्ण भारतातील 46,500 टचपॉईंट्ससह, कंपनीचे उद्दीष्ट भारतीयांना मोठे स्वप्न पाहण्यासाठी आणि त्यांची आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सक्षम बनवणे आहे. टीव्हीएस मोटर कंपनी लिमिटेड साठी पहिल्या क्रमांकाचे फायनान्सर आणि आघाडीच्या कंझ्युमर ड्युरेबल्स आणि मोबाईल फोन फायनान्सरपैकी एक असल्याने टीव्हीएस क्रेडिट च्या यूज्ड कार लोन्स, ट्रॅक्टर लोन्स, यूज्ड कमर्शियल व्हेईकल लोन्स आणि अनसिक्युअर्ड लोन्स मागणीत वाढ होत आहे.. मजबूत नवीन-युगातील तंत्रज्ञान आणि डाटा विश्लेषणाद्वारे समर्थित, कंपनीने आजपर्यंत 1.4 कोटीपेक्षा जास्त आनंदी ग्राहकांना सेवा दिली आहे.
रुचिका राणा
वरिष्ठ व्यवस्थापक, ब्रँडिंग आणि संवाद
मोबाईल: +91 9910036860
ईमेल: ruchika.rana@tvscredit.com
वेब: https://www.tvscredit.com/
साईन-अप करा आणि मिळवा नवीन अपडेट्स आणि ऑफर्स