आम्ही, टीव्हीएस क्रेडिटमध्ये गुणवत्तेवर आधारित औपचारिक भरती प्रक्रिया राबवतो. आम्ही भरती प्रक्रियेदरम्यान अर्जदारांकडून कोणतेही शुल्क किंवा डिपॉझिटची मागणी कधीही करत नाही. फसवणुकीचा ईमेल/ऑफर पाठविण्यासाठी TVS क्रेडिट डोमेन आयडी स्पूफिंग करणाऱ्या लबाडांपासून सावधानता बाळगा. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Hamburger Menu Icon
<?$policy_img['alt']?>

गोपनीयता धोरण

1.परिचय

अंतिम अपडेट तारीख 8/05/2024.

या संपूर्ण डॉक्युमेंटमध्ये, "आम्ही", “आम्हाला”, "आमचा", "आमचे", "टीव्हीएसCS" आणि "टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस" हे शब्द टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेडला संदर्भित करतात. आणि "तुम्ही", "तुमचा" आणि "तुमचे" हे शब्द तुम्हाला संदर्भित करतात (व्यक्ती ज्यांच्या पर्सनल डाटाचा आम्ही संदर्भ देत आहोत).

तुमची गोपनीयता आमच्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाची आहे. आम्ही तुमची गोपनीयता सुरक्षित ठेवण्यासाठी आणि तुमचा वैयक्तिक डाटा आमच्यासोबत संरक्षित करण्यासाठी वचनबद्ध आहोत. हे गोपनीयता धोरण आम्ही कलेक्ट आणि प्रोसेस करत असलेल्या वैयक्तिक डाटाचे तपशील, आम्ही ते कसे हाताळतो आणि आम्ही ज्या हेतूसाठी ते वापरतो त्याची रूपरेषा देते. कृपया तुमच्या वैयक्तिक डाटासंदर्भात आमच्या पद्धतींना समजून घेण्यासाठी खालील गोष्टी काळजीपूर्वक वाचा. वैयक्तिक डाटा म्हणजे कोणत्याही व्यक्तीचा असा डाटा ज्याद्वारे किंवा ज्याच्याशी संबंधित व्यक्ती ओळखली जाऊ शकते.

2. आम्ही कोणता वैयक्तिक डाटा कलेक्ट, स्टोअर आणि प्रोसेस करतो?

आम्ही कलेक्ट, स्टोअर आणि प्रोसेस करत असलेल्या वैयक्तिक डाटाच्या कॅटेगरींमध्ये समाविष्ट आहे:

  • जनसांख्यिकीय, ओळख आणि संपर्क डाटा (उदा., नाव, आडनाव, जन्मतारीख, ईमेल ॲड्रेस, वडिलांचे नाव, आईचे नाव, ॲड्रेस पुरावा, संपर्क नंबर, भाषा, व्यवसाय, राज्य, पिनकोडसह फिजिकल ॲड्रेस, वय, राष्ट्रीयता, पती/पत्नीचे नाव, वैवाहिक स्थिती, लिंग, धर्म, जात)
  • प्रमाणीकरण डाटा (उदा., स्वाक्षरी पुरावा)
  • वैयक्तिक ओळख डॉक्युमेंट्स (उदा., पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, आधार कार्ड, जीएसटीआयएन, वाहन परवाना, रेशन कार्ड इ.)
  • फायनान्शियल अकाउंट तपशील (उदा., बँक अकाउंट नंबर, बँक आयएफएससी कोड, बँक स्टेटमेंट आणि लोन ॲग्रीमेंट नंबर, क्रेडिट ब्युरोकडून मिळालेला डाटा, उत्पन्न, उत्पन्नाचा पुरावा (सॅलरी स्लिप किंवा फॉर्म 16 किंवा उत्पन्नाच्या गणनेसह आयटीआर)
  • शैक्षणिक आणि व्यावसायिक डाटा (उदा., नियोक्ता डाटा, रेझ्युमे, मूलभूत पात्रता, शैक्षणिक पात्रता, अनुभव)
  • टीव्हीएसCS कर्मचारी आरोग्य डाटा (उदा., वैद्यकीय रिपोर्ट, रक्त गट, उंची, वजन)
  • ऑनलाईन आयडेंटिफायर्स आणि इतर तांत्रिक डाटा (उदा., आयपी ॲड्रेस, ब्राउजर प्रकार, डिव्हाईस आयडेंटिफायर्स, ॲक्सेसचा वेळ)
  • डिव्हाईसची माहिती (उदा., तुमचे स्टोरेज, हार्डवेअर मॉडेल, ऑपरेटिंग सिस्टीम आणि आवृत्ती, युनिक डिव्हाईस आयडेंटिफायर, मोबाईल नेटवर्क माहिती आणि आमच्या सर्व्हिसेसह डिव्हाईसच्या इंटरॅक्शनविषयी माहिती)
  • आमच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर परवानगी (उदा., कॅमेरा, संपर्क, लोकेशन डाटा, स्टोरेज, फोटो, एसएमएस) द्वारे कलेक्ट केलेला वैयक्तिक डाटा
  • ॲसेट संबंधित डाटा (उदा., व्हीआयएन, इंजिन नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, मॉडेल प्रकार, चेसिस नंबर, मॉडेल कोड, मॉडेलचे नाव, कोणत्याही जंगम किंवा स्थावर मालमत्तेच्या संदर्भात तपशील)
  • संप्रेषण तपशील (उदा., मोबाईल नंबर, ईमेल, संपर्क यादी)
  • निर्मित डाटा (उदा., लॉग्स, ट्रान्झॅक्शन रेकॉर्डस्)
  • प्रशंसापत्रे ज्यामध्ये काही वैयक्तिक डाटा असू शकतात. (उदा., पूर्ण नाव, शहर)

3. आम्ही तुमचा वैयक्तिक डाटा कसा आणि कुठून कलेक्ट करतो?

आम्ही खालील प्रकारे तुमचा वैयक्तिक डाटा कलेक्ट करतो:

  • जेव्हा तुम्ही आमच्या वेबसाईट किंवा सोशल मीडिया पेजला (जसे फेसबुक, लिंक्डइन, इन्स्टाग्राम) भेट देता आणि रजिस्ट्रेशन फॉर्म भरता आणि "आमच्याशी संपर्क साधा" सुविधा वापरता.
  • जेव्हा तुम्ही आमचे मोबाईल ॲप्लिकेशन वापरता.
  • जेव्हा तुम्ही आमच्या वेबसाईटद्वारे आमच्याशी संवाद साधता किंवा कस्टमर सपोर्टसह आमच्या वेबसाईटवरील सर्व्हिसेस वापरता.
  • जेव्हा तुम्ही आमच्या व्हॉट्सॲप अकाउंटद्वारे आमच्याशी संवाद साधता.
  • जेव्हा तुम्ही आमच्या सोर्सिंग पार्टनर्सशी संवाद साधता आणि आमच्या प्रॉडक्ट्समध्ये स्वारस्य व्यक्त करता.
  • जेव्हा तुम्ही आमच्या मार्केटिंग रोडशो दरम्यान आम्हाला डाटा प्रदान करता.
  • जेव्हा तुमचा डाटा रेफरलद्वारे आम्हाला प्रदान केला जातो.
  • जेव्हा तुम्ही आमच्या करिअर पेजद्वारे टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेसमध्ये नोकरीसाठी अप्लाय करता.
  • जेव्हा थर्ड पार्टीद्वारे डाटा प्रदान केला जातो. (उदा., क्रेडिट ब्युरोकडून क्रेडिट रेकॉर्ड)
  • जेव्हा आम्ही लोन सोर्सिंग करतो.
  • जेव्हा तुम्ही आमच्या कस्टमर सर्व्हिस संपर्क नंबरवर आमच्याशी संपर्क साधता.
  • जेव्हा तुम्ही आरबीआयने जारी केलेल्या केवायसी निर्देशांचा भाग म्हणून तुमची नवीनतम केवायसी डॉक्युमेंट्स आम्हाला पाठवता.
  • जेव्हा तुम्ही वर सूचीबद्ध नसलेल्या इतर कोणत्याही डिजिटल किंवा ऑफलाईन चॅनेलवर आमच्याशी संवाद साधता.
  • आम्ही जीएसटीआयएन, अकाउंट ॲग्रीगेटर्स, संदर्भ यांसारख्या विविध एपीआय इंटीग्रेशनद्वारे देखील डाटा कलेक्ट करतो.

4. आम्ही तुमचा वैयक्तिक डाटा कसा वापरतो?

आम्ही खालील उद्देशांसाठी तुमचा वैयक्तिक डाटा वापरतो:

  • जेव्हा तुम्ही सेल्स आऊटलेटवर प्रॉडक्टच्या खरेदीवर लोन किंवा ईएमआय ची निवड करता आणि आमच्या पॅनेल केलेल्या डीलर्सना तुमची माहिती प्रदान करता.
  • जर तुम्ही आमच्या सर्व्हिसेसमध्ये एकतर ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष आऊटलेटमध्ये स्वारस्य व्यक्त केले तर आम्ही तुमचा वैयक्तिक डाटा कलेक्ट करून आमच्या पॅनेल केलेल्या डीलर्ससोबत शेअर करतो, जे लोनवर अधिक तपशील प्रदान करण्यासाठी तुमच्याशी संपर्क साधतील.
  • जर तुम्ही विद्यमान कस्टमर असाल किंवा आमच्या वेबसाईट किंवा मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे लोनसाठी अप्लाय करू इच्छित असाल तर आम्ही खालील उद्देशांसाठी तुमचा वैयक्तिक डाटा कलेक्ट करतो:
    • तुम्ही वापरत असलेल्या आमच्या ॲप्लिकेशनवर तुमचे अकाउंट किंवा माहिती प्रमाणित करण्यासाठी.
    • तुमच्या लोन ॲप्लिकेशनवर कार्यक्षमतेने प्रोसेस करण्यासाठी.
    • रिस्क मूल्यांकन करण्यासाठी, लोन प्रदान करण्याच्या निर्णयावर येण्यापूर्वी फसवणूक शोधण्यासाठी आणि प्रतिबंधित करण्यासाठी.
    • तांत्रिक नोटीस, सुरक्षा अलर्ट, सपोर्ट आणि प्रशासकीय मेसेजसह तुम्हाला विनंती केलेली माहिती आणि सपोर्ट देण्यासाठी.
    • तुम्ही घेतलेल्या विद्यमान प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेसविषयी तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी, ज्यामध्ये कोणत्याही अलर्ट किंवा अपडेटच्या अधिसूचना समाविष्ट आहेत.
    • आमच्या सर्व्हिसेसचे मूल्यांकन, विकास आणि सुधारणा करण्यासाठी.
    • मार्केट आणि प्रॉडक्ट विश्लेषण आणि मार्केट रिसर्चसाठी.
    • तुम्हाला स्वारस्य असलेल्या आमच्या इतर प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेसविषयी माहिती पाठविण्यासाठी.
    • अभिप्राय प्राप्त करण्यासाठी आणि चौकशी आणि तक्रारी हाताळण्यासाठी.
    • कायदेशीर किंवा नियामक आवश्यकतांचे पालन करण्यासाठी.
    • रिपेमेंट रिमाइंडरकरिता तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी.
    • तुमच्या तक्रारींचे निराकरण करण्याकरिता तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी.
    • तुमचे विद्यमान लोन अकाउंट मॅनेज करण्यासाठी आणि लोन सर्व्हिसिंग वर तुम्हाला अपडेट करण्यासाठी.
  • जर तुम्ही पॅनेल केलेले डीलर असाल तर आम्ही ऑनबोर्डिंग आणि पेमेंट उद्देशांसाठी तुमचा वैयक्तिक डाटा कलेक्ट करतो.
  • जर तुम्ही आमच्या वेबसाईट किंवा सोशल मीडिया पेजला भेट देत असाल तर आम्ही तुमचा अनुभव ऑप्टिमाईज करण्यासाठी, कंटेंट कस्टमाईज करण्यासाठी आणि डिजिटल फूटप्रिंट ट्रॅक करण्यासाठी तुमच्या वैयक्तिक डाटावर प्रोसेस करतो.
  • जर तुम्ही संभाव्य कर्मचारी असाल तर आम्ही रोजगाराच्या मूल्यांकनाच्या उद्देशाने तुमचा वैयक्तिक डाटा कलेक्ट करतो.
  • आम्ही टेलिफोन कॉल्ससह तुमच्या आणि आमच्यादरम्यान झालेले कोणतेही संवाद रेकॉर्ड देखील करू शकतो. आम्ही या रेकॉर्डिंग्सचा वापर आम्हाला तुमच्या सूचना तपासण्यासाठी, ओळख, तपासणी, नियामक, फसवणूक प्रतिबंध, प्रशिक्षण आणि गुणवत्ता उद्देशांसाठी आणि आमच्या सर्व्हिसेसचे विश्लेषण, मूल्यांकन आणि सुधारणा करण्यासाठी करू.
  • सुरक्षेसाठी आणि गुन्हे टाळण्यासाठी आणि शोधण्यासाठी आम्ही आमच्या परिसरात आणि आसपास प्रतिमा किंवा वॉईस रेकॉर्डिंग्स (किंवा दोन्ही) मॉनिटर करण्यासाठी आणि कलेक्ट करण्यासाठी सीसीटीव्ही वापरू शकतो.
  • आम्ही तुमचा वैयक्तिक डाटा मार्केटिंग आणि प्रचारात्मक मोहिमांसाठी देखील वापरतो.
  • आम्हाला लेंडिंग सर्व्हिस प्रदात्यांद्वारे देखील तुमचा वैयक्तिक डाटा प्राप्त होऊ शकतो. आमच्याद्वारे प्रतिबद्ध असलेल्या सर्व लेंडिंग सर्व्हिस प्रदात्यांविषयी आणि त्यांना प्रतिबद्ध करण्याच्या हेतूंबद्दल अधिक माहितीसाठी, कृपया या लिंकवर क्लिक करा टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेसद्वारे प्रतिबद्ध असलेले डिजिटल लेंडिंग पार्टनर

5. आम्ही तुमचा वैयक्तिक डाटा कोणासोबत शेअर करतो?

आम्ही तुमचा वैयक्तिक डाटा यांना उघड करू शकतो:

  • बिझनेस आणि ऑपरेशनल उद्देशांसाठी आमची पालक कंपनी.
  • आमच्या संलग्न किंवा समूह कंपन्या.
  • आमचे सोर्सिंग पार्टनर.
  • आरबीआयच्या गाईडलाईन्सनुसार लोन पात्रता, अंडररायटिंग आणि डिस्बर्समेंटनंतर सबमिट करण्यासाठी क्रेडिट ब्युरो.
  • आमच्यासाठी काम करणारे किंवा आम्हाला सर्व्हिसेस किंवा प्रॉडक्ट्स प्रदान करणारे थर्ड पार्टी सर्व्हिस प्रदाता.
  • आमचे पार्टनर.
  • रेटिंग एजन्सीज.

आम्ही खालील परिस्थितीत देखील तुमचा वैयक्तिक डाटा शेअर करू शकतो:

  • न्यायालयाच्या आदेश किंवा कायदेशीर प्रोसेसला प्रतिसाद देण्यासाठी किंवा आमचे कायदेशीर अधिकार स्थापित करण्यासाठी किंवा कायदेशीर क्लेम्सविरुद्ध बचाव करण्यासाठी.
  • जर टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस दुसऱ्या कंपनीने खरेदी केली असेल किंवा विलीन केली असेल.
  • आरबीआयच्या गाईडलाईन्सनुसार लोन एक्सपोजरच्या ट्रान्सफरसाठी.
  • कर्ज घेण्याच्या अटींचा भाग म्हणून लेंडरसह.

6. आंतरराष्ट्रीय डाटा ट्रान्सफर

आमचे डाटा सेंटर भारतात स्थित आहेत. आम्ही ट्रान्सफर करत असलेला कोणताही वैयक्तिक डाटा या गोपनीयता धोरणानुसार संरक्षित केला जाईल.

7. आम्ही तुमचा वैयक्तिक डाटा कसा सुरक्षित करतो?

तुम्ही आमच्याकडे सोपवलेल्या वैयक्तिक डाटाचे संरक्षण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. अनधिकृत ॲक्सेस, बदल, ट्रान्समिशन आणि डिलिट करण्यापासून तुमच्या वैयक्तिक डाटाचे संरक्षण करण्यासाठी योग्य भौतिक, तांत्रिक आणि व्यवस्थापकीय सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आम्ही योग्य पावले उचलतो. आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना तुमच्या वैयक्तिक डाटाची गोपनीयता आणि सुरक्षा राखण्याच्या महत्त्वाबद्दल प्रशिक्षण देतो. आम्ही खात्री करतो की ज्या थर्ड पार्टीसोबत आम्ही तुमचा वैयक्तिक डाटा शेअर करतो ते योग्य करारा अंतर्गत आहेत आणि आमच्या पॉलिसींनुसार तुमचा वैयक्तिक डाटा संरक्षित करण्यासाठी आम्ही योग्य सुरक्षा उपाय करतो.

8. आम्ही तुमचा वैयक्तिक डाटा किती काळ ठेवतो?

या गोपनीयता धोरणामध्ये उल्लेखित उद्देश पूर्ण करणे आवश्यक असेपर्यंत आणि कायदेशीर किंवा नियामक कारणांसाठी आम्ही तुमचा वैयक्तिक डाटा टिकवून ठेवतो.

9. आम्ही कुकीज आणि इतर ट्रॅकिंग यंत्रणा कशी वापरतो?

आम्ही तुमच्याबद्दल डाटा कलेक्ट करण्यासाठी आमच्या वेबसाईटवर कुकीज आणि इतर ट्रॅकिंग यंत्रणा वापरतो. आम्ही ट्रेंड आणि सांख्यिकीचे विश्लेषण करण्यासाठी कुकीज आणि ट्रॅकर्सकडून कलेक्ट केलेला डाटा वापरतो. हे आम्हाला तुमचा वेबसाईट अनुभव ऑप्टिमाईज आणि कस्टमाईज करण्यास आणि वेबसाईटची चांगली कार्यक्षमता आणि वैयक्तिकृत अनुभव प्रदान करण्यात मदत करेल.

आम्ही कॅमेरा, काँटॅक्ट्स/टेलिफोन, अंदाजे (नेटवर्क-आधारित) लोकेशन, अचूक (जीपीएस) लोकेशन, अकाउंट्सची लिस्ट, बाह्य स्टोरेज कंटेंट, फोटो, एसएमएस इ. सारख्या परवानगी वापरून मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे तुमच्याविषयी वैयक्तिक डाटा कलेक्ट करतो. तुमचे आयओएस आणि अँड्रॉईड डिव्हाईस तुम्हाला आमचे ॲप कोणत्‍या परवानग्या मागत आहेत हे सूचित करतील आणि तुम्‍हाला परवानगी स्‍वीकारण्‍याचा किंवा नाकारण्‍याचा पर्याय देतील. आम्ही मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे कार्यक्षमता प्रदान करण्यासाठी परवानगीद्वारे मिळालेला डाटा वापरतो. मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे क्रेडिट अंडररायटिंग आणि कार्यक्षमता प्रदान करण्याच्या उद्देशाने आम्ही आमच्या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये काही ट्रॅकर्स देखील समाविष्ट केले आहेत.

आमचे मोबाईल ॲप्लिकेशन ॲक्सेस करताना मोबाईल परवानगीच्या वापरासाठी तुम्ही संमती दिली असल्यास तुमच्याकडे तुमच्या मोबाईल डिव्हाईसच्या सेटिंग्स सेक्शनमधून तुमची संमती कॅन्सल करण्याचा पर्याय आहे. बर्‍याच प्रकरणांमध्ये, अशी परवानगी मागे घेतल्यावर, तुम्ही मोबाईल ॲप्लिकेशनची विशिष्ट वैशिष्ट्ये ॲक्सेस करू शकत नाही किंवा आमच्या प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेसचा वापर सुरू ठेवू शकत नाही.

10. आम्ही तुमचा वैयक्तिक डाटा कोणत्या आधारावर प्रोसेस करतो?

आम्ही खालीलपैकी एक किंवा अधिक आधारावर अवलंबून तुमचा वैयक्तिक डाटा प्रोसेस करतो:

  • तुम्ही निर्दिष्ट कारणांसाठी तुमच्या वैयक्तिक डाटाला प्रोसेस करण्यास संमती दिली आहे.
  • कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सी, सरकारी एजन्सी, नियामक इत्यादींबाबत आमच्याकडे असलेल्या कोणत्याही कायदेशीर दायित्वाचे पालन करण्यासाठी हे प्रोसेसिंग आवश्यक आहे.
  • रोजगाराच्या उद्देशांसाठी आवश्यक प्रोसेसिंग.
  • आमचे वाजवी उद्देश पूर्ण करण्यासाठी आवश्यक प्रोसेसिंग. (उदा., क्रेडिट स्कोअरिंग, डेब्टची रिकव्हरी, आमची प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेसचे मूल्यांकन, विकास आणि सुधारणा करण्यासाठी फसवणूकीसह कोणत्याही बेकायदेशीर क्रियेचा प्रतिबंध आणि शोध)
  • तुमच्यासोबत अंमलबजावणी केलेल्या ॲग्रीमेंट अंतर्गत आमची करार दायित्वाची पूर्तता करण्यासाठी हे प्रोसेसिंग आवश्यक आहे आणि अशा ॲग्रीमेंट अंतर्गत तुम्ही त्यासाठी संमती प्रदान केली आहे.

11. तुमच्या वैयक्तिक डाटाशी संबंधित तुमचे अधिकार काय आहेत?

तुमच्याकडे आमच्यासोबत असलेल्या तुमच्या वैयक्तिक डाटासंदर्भात काही अधिकार आहेत आणि आम्ही त्यांना प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहोत. आम्ही तुमच्या अधिकारांची यादी दिली आहे, तथापि कृपया लक्षात घ्या की ते प्रत्येक प्रकरणात नेहमीच लागू होणार नाहीत.

  • माहितीचा अधिकार: तुम्हाला आमच्यासोबत असलेल्या तुमच्या वैयक्तिक डाटाचे कन्फर्मेशन आणि सारांश मिळवण्याचा, इतर सपोर्टिंग माहिती मिळवण्याचा तसेच त्या सर्व थर्ड पार्टीची ओळख प्राप्त करण्याचा अधिकार आहे ज्यांच्यासोबत तुमचा वैयक्तिक डाटा शेअर केला गेला आहे.
  • दुरुस्तीचा अधिकार: आमच्यासोबत असलेल्या तुमच्या वैयक्तिक डाटामध्ये त्रुटी किंवा अयोग्यता आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्हाला ते सुधारण्यासाठी विचारण्याचा अधिकार आहे. तुमचा वैयक्तिक डाटा अपूर्ण किंवा कालबाह्य आहे असे तुम्हाला वाटत असल्यास आम्हाला ते अपडेट करण्यास सांगण्याचा अधिकार देखील तुम्हाला आहे.
  • मिटविण्याचा अधिकार: काही परिस्थितीत आमच्यासोबत असलेला तुमचा वैयक्तिक डाटा मिटविण्यास सांगण्याचा अधिकार तुम्हाला आहे.
  • तक्रार निवारणाचा अधिकार: जर तुम्हाला 7 दिवसांच्या आत आमच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही तर तुम्हाला डाटा संरक्षण मंडळाकडे तक्रार दाखल करण्याचा अधिकार आहे.
  • नामनिर्देशन करण्याचा अधिकार: मृत्यू किंवा अक्षमतेच्या बाबतीत तुमच्या वतीने कार्य करण्यासाठी एखाद्या व्यक्तीस नामनिर्देशित करण्याचा तुम्हाला अधिकार आहे.
  • थर्ड पार्टीला प्रकटीकरण प्रतिबंधित करण्याचा अधिकार: काही परिस्थितीत थर्ड पार्टीला तुमच्या वैयक्तिक डाटाचे प्रकटीकरण प्रतिबंधित करण्यास सांगण्याचा तुम्हाला अधिकार आहे.

जिथे प्रोसेसिंग तुमच्या संमतीवर आधारित आहे, तुमच्याकडे कधीही तुमची संमती मागे घेण्याचा पर्याय आहे. तुमची संमती मागे घेण्याची तुमची विनंती प्राप्त झाल्यानंतर, रद्द करण्याचे परिणाम तुम्हाला कळविले जातील. बर्‍याच प्रकरणांमध्ये, संमती मागे घेणे आम्हाला आमची प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस ऑफर करणे सुरू ठेवण्यापासून प्रतिबंधित करू शकते.

आपल्या दरम्यान चालू असलेल्या कराराच्या संबंधात, संमती मागे घेण्याची तुमची विनंती केवळ तेव्हाच पूर्ण केली जाऊ शकते जेव्हा मूळ संमतीशी संबंधित तुमच्या सर्व करार-आवश्यक जबाबदाऱ्या पूर्ण केल्या गेल्या असतील.

तुम्ही 'आमच्याशी संपर्क साधा' विभागात नमूद केलेले तपशील वापरून आमच्याशी संपर्क साधून तुमची संमती मागे घेऊ शकता.

जर तुम्हाला तुमचे कोणतेही अधिकार वापरायचे असतील, आमच्या गोपनीयता पद्धतींबद्दल चिंता नोंदवायची असेल किंवा इतर गोपनीयता-संबंधित माहितीची विनंती करायची असेल, तर तुम्ही 'आमच्याशी संपर्क साधा' विभागात निर्दिष्ट केलेल्या तपशीलांचा वापर करून आमच्याशी संपर्क साधू शकता. तथापि, जर तुम्ही टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेसचे विद्यमान किंवा पूर्वीचे ग्राहक असाल तर आम्ही करार दायित्व बंद केल्यानंतर अशा किमान कालावधीसाठी आमच्या सिस्टीममधून तुमचा वैयक्तिक डाटा डिलिट करण्याच्या स्थितीत असणार नाही कारण आम्ही लागू कायदे आणि नियमांतर्गत प्रदान केल्याप्रमाणे कायदेशीररित्या टिकवून ठेवण्यास बांधील आहोत. याव्यतिरिक्त, कोणत्याही चालू असलेल्या खटल्याच्या उद्देशाने असा कोणताही वैयक्तिक डाटा राखून ठेवणे आवश्यक असल्यास, आम्ही तो खटला पूर्ण होईपर्यंत तो ठेवू.

12. अन्य वेबसाईटसाठी लिंक

आमच्या वेबसाईटमध्ये इतर संस्थांच्या वेबसाईटच्या लिंक असू शकतात. हे गोपनीयता धोरण संस्था वैयक्तिक डाटाला कसे प्रोसेस करते हे कव्हर करत नाही. तुम्ही भेट देत असलेल्या इतर वेबसाईटचे गोपनीयता धोरण वाचण्यासाठी आम्ही तुम्हाला प्रोत्साहित करतो.

13. आम्ही ही पॉलिसी अद्ययावत कशी ठेवतो?

ते अद्ययावत आणि अचूक असल्याची खात्री करण्यासाठी आम्ही नियमितपणे आमच्या गोपनीयता धोरणाचा आढावा घेतो आणि अद्ययावत करतो. भविष्यात आम्ही या गोपनीयता धोरणात केलेले कोणतेही बदल या पेजवर पोस्ट केले जातील. जेव्हा आम्ही या गोपनीयता धोरणामध्ये बदल पोस्ट करतो, तेव्हा आम्ही "अंतिम अपडेट" तारखेला सुधारित करू.

14. टीव्हीएसCS कायदेशीर अस्वीकरण काय आहे?

या साईटच्या माध्यमातून प्रदान केलेली माहिती ही “जशीची तशी” आणि “उपलब्धतेच्या प्रमाणे” असेल. तुम्ही सहमत आहात की, या साईटचा वापर तुमच्या रिस्कच्या अधीन आहे. कायद्याने परवानगी दिलेल्या पूर्ण मर्यादेपर्यंत, टीव्हीएसCS, त्याचे अधिकारी, संचालक, कर्मचारी आणि एजंट साईट आणि तुमच्या वापरासंदर्भात व्यक्त किंवा निहित सर्व वॉरंटीचे अस्वीकरण करतात. टीव्हीएसCS डिलिट करण्याचा, चुकीच्या वितरणाच्या किंवा कम्युनिकेशन स्टोअर करण्याच्या वैयक्तिक सेटिंग्स किंवा इतर डाटा संचयित करण्यात अयशस्वी होण्याची कोणतीही हमी देत नाही. टीव्हीएसCS साईट किंवा कोणत्याही हायपरलिंक केलेल्या वेबसाईटद्वारे किंवा कोणत्याही बॅनर किंवा इतर जाहिरातींमध्ये वैशिष्ट्यीकृत केलेल्या थर्ड पार्टी द्वारे जाहिरात केलेल्या किंवा ऑफर केलेल्या कोणत्याही प्रॉडक्टची किंवा सर्व्हिसची हमी, समर्थन, गॅरंटी देत नाही किंवा जबाबदारी स्वीकारत नाही, आणि टीव्हीएसCS तुमच्या आणि थर्ड पार्टी फायनान्शियल सर्व्हिस प्रदात्यांमधील कोणत्याही ट्रान्झॅक्शनचा पक्ष असणार नाही किंवा कोणत्याही प्रकारे देखरेखीसाठी जबाबदार असणार नाही कारण कोणत्याही माध्यमात किंवा कोणत्याही वातावरणात कोणत्याही फायनान्शियल सर्व्हिसेसचा लाभ घेताना तुम्ही तुमच्या विवेकबुद्धीचा वापर केला पाहिजे आणि योग्य तेथे सावधगिरी बाळगली पाहिजे. टीव्हीएसCS या साईटच्या सामग्रीची किंवा या साईटशी लिंक केलेल्या कोणत्याही साईटच्या सामग्रीची अचूकता, पर्याप्तता, समयसूचकता किंवा पूर्णतेच्या बद्दल कोणतीही हमी किंवा प्रतिनिधित्व देत नाही आणि सामग्री किंवा कोणत्याही त्रुटी, चुकणे, चुका किंवा चुकीचे दायित्व किंवा जबाबदारी स्वीकारत नाही.

15. दायित्वाची मर्यादा काय आहे?

कोणत्याही परिस्थितीत टीव्हीएसCS चे अधिकारी, संचालक, कर्मचारी किंवा एजंट तुम्हाला कोणत्याही अप्रत्यक्ष, आनुषंगिक, विशेष, दंडात्मक किंवा परिणामी नुकसानीसाठी जबाबदार असणार नाहीत. जे निर्माण होऊ शकतील यापासून (i) कंटेट मधील त्रुटी, चुका किंवा अनियमितता, (ii) वैयक्तिक इजा किंवा मालमत्तेचे नुकसान, कोणत्याही स्वरूपाचे, साईटवर तुमच्या प्रवेशामुळे आणि वापरामुळे झालेले, (iii) आमच्या सुरक्षित सर्व्हरवर कोणताही अनधिकृत प्रवेश किंवा वापर आणि/किंवा कोणतीही आणि सर्व वैयक्तिक माहिती आणि/किंवा त्यात साठवलेली फायनान्शियल माहिती, (iv) साईटवर किंवा तेथून प्रसारित होणारा कोणताही व्यत्यय किंवा समाप्ती, (iv) कोणतेही बग, व्हायरस, ट्रोजन हॉर्स किंवा यासारखे, जे कोणत्याही थर्ड पार्टीद्वारे साईटवर किंवा त्याद्वारे प्रसारित केले जाऊ शकतात, (v) कंटेट मधील कोणत्याही त्रुटी किंवा वगळणे, (vi) यूजर सबमिशन किंवा कोणत्याही थर्ड पार्टीचे बदनामीकारक, आक्षेपार्ह किंवा बेकायदेशीर आचरण, (vii) साईटच्या कोणताही भागाच्या तुमच्या वापरामुळे किंवा वापरण्याच्या अक्षमतेमुळे उद्भवलेल्या कोणत्याही अप्रत्यक्ष, आकस्मिक, विशेष, दंडात्मक किंवा परिणामी नुकसानांसाठी किंवा साईटद्वारे पोस्ट केलेल्या, प्रसारित केलेल्या किंवा अन्यथा उपलब्ध केलेल्या कोणत्याही सामग्रीच्या वापरामुळे तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानासाठी किंवा हानीसाठी तुमच्या प्रति जबाबदार असणार नाही, मग ते आश्वासन, करार, छेडछाड किंवा इतर कोणत्याही कायदेशीर सिद्धांतावर आधारित असो किंवा नसो, आणि कंपनीला उक्त नुकसानीच्या शक्यतेबद्दल सूचित केले गेले असो किंवा नसो; वरील दायित्वाची ही मर्यादा लागू अधिकारक्षेत्रातील कायद्याने परवानगी दिलेल्या पूर्ण मर्यादेपर्यंत लागू होईल.

16. विवाद निराकरणाचे मार्ग कोणते आहेत?

टीव्हीएसCS आणि तुमच्या दरम्यान या ॲग्रीमेंटमधून उद्भवणारे सर्व विवाद, फरक, क्लेम आणि प्रश्न या सादरीकरणाशी किंवा येथे असलेल्या कोणत्याही गोष्टीशी किंवा या सादरीकरणाशी संबंधित किंवा उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकारे किंवा संबंधित सर्व विवाद लवाद आणि सामंजस्य कायदा 1996 अंतर्गत टीव्हीएसCS द्वारे नियुक्त केलेल्या एकमेव लवादाकडे पाठविले जातील. टीव्हीएसCS मध्ये रजिस्ट्रेशन करताना यूजरने दिलेल्या ईमेल आयडी वर लवादाने प्रतिवादींना ईमेलद्वारे कोणतीही माहिती पाठवली असेल तर ती यूजरसाठी पुरेशी माहिती मानली जाईल. लवादाच्या कार्यवाहीची किंमत आणि खर्च यूजरद्वारे दिले जातील. आर्बिट्रेशनचे ठिकाण चेन्नई येथे असेल. आर्बिट्रेटरचा निकाल हा अंतिम आणि सर्व पार्टीज वर बंधनकारक असेल.

17. तुम्ही आमच्याशी संपर्क कसा साधू शकता?

गोपनीयता संबंधित कोणत्याही अधिक शंका आणि तक्रारींसाठी, तुम्ही खालील ॲड्रेस वर आमच्याशी संपर्क साधा:
gdpo@tvscredit.com

कोणत्याही तक्रार निवारण किंवा एस्क्लेशनसाठी, तुम्ही खालील ॲड्रेसवर आमच्याशी संपर्क साधू शकता:
तक्रार निवारण अधिकारी (श्री. चरणदीप सिंह चावला)
gro@tvscredit.com
टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेड.
नं 29, जयलक्ष्मी इस्टेट,
3rd फ्लोअर, हॅडोज रोड,
नुंगमबक्कम,
चेन्नई – 600034

साईन-अप करा आणि मिळवा नवीन अपडेट्स आणि ऑफर्स

व्हॉट्सॲप

ॲप डाउनलोड करा

संपर्कात राहूया!