चरणदीप सिंह हे टीव्हीएस क्रेडिटचे मुख्य विपणन अधिकारी (सीएमओ) आहेत. त्यांनी पंजाब कृषी विद्यापीठातून कृषी अभियांत्रिकीमध्ये बी.टेक आणि नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, मुंबई येथून मार्केटिंग मध्ये एमबीए पदवी संपादित केली आहे. त्यांना बीएफएसआय आणि ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री मध्ये मार्केटिंग, सेल्स, सीआरएम आणि स्ट्रॅटेजी कौशल्य यामध्ये 18 वर्षांपेक्षा अधिक अनुभव आहे. त्यांनी ब्रँड कम्युनिकेशन, मार्केट रिसर्च, डिजिटल बिझनेस, ॲनालिटिक्स आणि कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमधील अनेक उपक्रमांचे व्यवस्थापन आणि नेतृत्व केले आहे. कंपनीच्या वेबसाइट्स आणि मोबाइल ॲप्सच्या निर्मितीसह, तसेच, अनेक पुरस्कार-विजेत्या विपणन मोहिमांसह त्यांनी विविध परिवर्तनीय प्रयत्नांचे नेतृत्व केले आहे. त्यांनी कस्टमर एंगेजमेंट आणि अनुभव सुधारणारे प्रोग्राम प्रभावीपणे राबवले आहेत.
टीव्हीएस क्रेडिटची नवीन ब्रँड ओळख प्रस्थापित करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याचा परिणाम म्हणून बदलत्या बिझनेस आवश्यकतांना प्रतिसाद म्हणून नवीन व्हिज्युअल आयडेंटिटी सिस्टीम आणि ब्रँड पुनर्स्थित करण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, फर्मला प्रख्यात आरएमएआय फ्लेम अवॉर्ड्स एशिया 2018 मध्ये दी बेस्ट व्हिजिबिलिटी आणि व्हिज्युअल कॅम्पेन ऑफ द इयर सह विविध विपणन उपक्रमांसाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना 2020 साठी आशियाचे टॉप कंटेंट मोगल, 2018 साठी ॲडोब डिजी100 द्वारे टॉप 100 डिजिटल मार्केटर्स आणि 2018 साठी लिंक्डइनद्वारे टॉप 50 कंटेंट मार्केटिंग लीडर्स या सीएमएस द्वारेही मान्यताप्राप्त झाली. याव्यतिरिक्त, एमएमएफएसएल मध्ये असताना, 2017 च्या ग्रामीण विपणन पुरस्कारांमध्ये त्यांना युथ अचिव्हर ऑफ द इयर म्हणून गौरवण्यात आले.