कस्तुरीरंगन पीव्ही हे चार्टर्ड अकाउंटंट आणि कॉस्ट आणि मॅनेजमेंट अकाउंटंट आहेत. ज्यांना विविध फायनान्शियल विषयांमध्ये 25 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. टीव्हीएस क्रेडिटचे मुख्य कोषागार अधिकारी म्हणून त्यांनी दायित्व व्यवस्थापन, गुंतवणूक, रेटिंग आणि बाह्य भागधारकांच्या परस्परसंवादाचे कामकाज चोखपणे पाहिले. कर आकारणी, परिव्ययांकन, लेखापरीक्षण, आर्थिक अहवाल आणि धोरणात्मक आर्थिक नियोजन आणि व्यवस्थापन हे त्यांच्या कौशल्याच्या क्षेत्रांपैकी आहेत. टीव्हीएस क्रेडिट मध्ये सहभागी होण्यापूर्वी ते निस्सान अशोक लेलँड जेव्ही मध्ये सीएफओ म्हणून कार्यरत होते. टीव्हीएस आणि अशोक लेलँड या दोन महत्त्वाच्या संस्थांसह अनेक क्षेत्रात काम करण्यासोबतच त्यांना आंतरराष्ट्रीय नोकरीचा अनुभव आहे.