श्री. बी. श्रीराम हे उल्लेखनीय कारकीर्द असलेले एक कुशल व्यावसायिक आहेत. ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स (पूर्वीचे इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ बँकर्स), मुंबईचे सर्टिफाईड असोसिएट आहेत आणि त्यांनी इंडियन अकॅडमी ऑफ इंटरनॅशनल लॉ अँड डिप्लोमसी, नवी दिल्ली येथून आंतरराष्ट्रीय कायदा आणि डिप्लोमसी मध्ये डिप्लोमा, तसेच, ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन, नवी दिल्ली येथून एआयएमए मॅनेजमेंट मधील डिप्लोमा पूर्ण केला आहे. ते ऑनर्स पदवीधर आहेत आणि त्यांनी सेंट स्टीफन्स कॉलेज, दिल्ली विद्यापीठातून भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवी देखील संपादित केली आहे.
त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत, श्री. श्रीराम यांनी जुलै 2014 ते जून 2018 या कालावधीत आयडीबीआय बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक यासह विविध कार्यकारी पदांवर काम केले आहे. डिसेंबर 1981 मध्ये त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये परिविक्षाधीन अधिकारी म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि बँक आणि ग्रुपमध्ये क्रेडिट अँड रिस्क, रिटेल, ऑपरेशन्स, आयटी, ट्रेझरी, इन्व्हेस्टमेंट बँकिंग आणि इंटरनॅशनल ऑपरेशन्स यासारख्या महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या आहेत.
श्री. श्रीराम सध्या आयसीआयसीआय बँकेच्या मंडळावर स्वतंत्र संचालक म्हणून आणि बँकेच्या विविध समितीचे सदस्य/अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. अन्य कंपन्यांच्या मंडळावर स्वतंत्र संचालक म्हणूनही काम करतात. याव्यतिरिक्त, त्यांनी काही सल्लागार पदावर देखील महत्वाच्या भूमिका बजावल्या आहेत.