श्री. टी.सी.सुशील कुमार हे लाईफ इन्श्युरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी) मधून जानेवारी 2021 मध्ये मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. जवळपास चार दशकांचे त्यांचे समृद्ध करिअर ठरले आहे. आपल्या कार्यकाळाच्या दरम्यान, श्री. कुमार यांनी एलआयसी मध्ये विविध पदांवर मोठी भूमिका बजावली. ज्यामध्ये मॅनेजिंग डायरेक्टर, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि झोनल मॅनेजर म्हणून भारत तसेच परदेशात आपली सेवा बजावली. त्यांनी मार्केटिंग, सीआरएम, एचआर, फायनान्स, ऑडिट, कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि इन्व्हेस्टमेंट यासारख्या प्रमुख डिपार्टमेंटचे व्यवस्थापन केले आणि मॉरिशसमध्ये एलआयसीच्या परदेशी कामकाजाचे नेतृत्व केले.
श्री कुमार हे विश्लेषण आणि स्ट्रॅटेजिक बिझनेस प्लॅनिंगच्या सखोल ज्ञानासाठी ओळखले जातात, त्यांच्या मार्गदर्शनाखाली एलआयसीला पहिल्या वर्षाच्या प्रीमियम इन्कम आणि मार्केट लीडरशीप ग्रोथ मध्ये महत्वपूर्ण टप्पे गाठण्यास मदत झाली. त्यांनी मिलेनियल्सना लक्ष्य करीत मार्केट रिसर्च प्रोग्रामची सुरूवात केली, परिणामी 2020-21 मध्ये 100,000 पेक्षा जास्त नवीन एजंट्स जोडले गेले. त्यांनी रिअल-टाइम ऑटोमेटेड बिझनेस डाटा संकलन आणि विश्लेषण यांची देखील अंमलबजावणी केली, धोरणात्मक निर्णयक्षमता वाढवली.
एलआयसी मधील त्यांच्या जबाबदारीच्या व्यतिरिक्त श्री. कुमार यांनी ॲक्सिस बँक लिमिटेड, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लिमिटेड, लक्ष्मी मशीन वर्क्स आणि नॅशनल म्युच्युअल फंड (मॉरिशस) सह अनेक प्रमुख कंपन्यांच्या बोर्ड वर आपली सेवा प्रदान केली आहे. सध्या ते मनप्पुरम फायनान्स लिमिटेड, फिलिप्स कार्बन ब्लॅक लिमिटेड आणि फर्स्ट सोर्स सोल्यूशन्स लिमिटेडच्या बोर्डवर इंडिपेंडंट डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत.