श्री. वेणु श्रीनिवासन हे एक कार्य निपुण अभियंता आहेत आणि यूएसए स्थित पर्ड्यू विद्यापीठातून व्यवस्थापशास्त्रात पदवी संपादित केली आहे. वर्ष 1979 मध्ये त्यांनी सुंदरम-क्लेटन या टीव्हीएस मोटरच्या होल्डिंग कंपनीचे सीईओ म्हणून पदभार स्वीकारला आणि भारतातील दुचाकी उद्योग जगतात क्रांती घडवून आणण्याचं सर्वोपतरी श्रेय त्यांच्या नावावर आहे. त्यांनी भारतातील संयुक्त उपक्रम आणि नवीन पिढीच्या दुचाकींचा परिचय करून दिला. त्यामुळे भारतीय कंपन्यांना जागतिक दर्जाचे बनण्याचा आणि उत्कृष्टतेची वचनबद्धता आणि नाविन्यपूर्ण संस्कृती आत्मसात करून अपवादात्मक उत्पादने तयार करण्याचा मार्ग प्रशस्त झाला. वर्ष 2014 मध्ये कोरिया गणराज्याच्या अध्यक्षांकडून ऑर्डर ऑफ डिप्लोमॅटिक सर्व्हिस मेरिट, वर्ष 2004 मध्ये अखिल भारतीय व्यवस्थापन संघटनेकडून जेआरडी टाटा कॉर्पोरेट लीडरशिप पुरस्कार आणि वर्ष 2010 आणि 2020 मध्ये भारताच्या राष्ट्रपतींकडून अनुक्रमे पद्मश्री आणि पद्म भूषण पुरस्कार यासह अनेक प्रशंसा आणि पुरस्कार मिळाले आहेत. वर्ष 2019 मध्ये टोटल क्वालिटी मॅनेजमेंट (टीक्यूएम) मधील त्यांच्या योगदानाबद्दल डेमिंग ‘डिस्टींग्विश्ड सर्व्हिस अॅवॉर्ड फॉर डिसिमिनेशन अँड प्रमोशन ओव्हरसीज’ प्राप्त करणारे ते पहिले भारतीय उद्योगपती ठरले आहेत. सध्या, श्री. श्रीनिवासन टीव्हीएस मोटर कंपनीचे मानद अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.