सौजन्या आलुरी यांनी इंडियन स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए पूर्ण केले आहे आणि त्यांना आघाडीच्या तंत्रज्ञानाची दृष्टी आणि धोरण, तसेच प्रॉडक्ट मॅनेजमेंट, इंजिनीअरिंग, ऑपरेशन्स, अजाईल परिवर्तन, क्लाउड आणि सायबर सुरक्षा यासारख्या अनेक तांत्रिक क्षेत्रांवर देखरेख करण्याचा 25 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. त्यांनी कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्समध्ये मास्टर ऑफ सायन्स देखील केले आहे.
टीव्हीएस क्रेडिटमध्ये सौजन्या कंपनीचे टेक आणि डिजिटल धोरण तयार करण्याच्या प्रभारी आहेत. टीव्हीएस क्रेडिटमध्ये सामील होण्यापूर्वी, त्या नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) मध्ये डिजिटल तंत्रज्ञानाच्या प्रमुख होत्या, जिथे त्यांनी मोबाइल पेमेंट प्लॅटफॉर्म, डेटा प्लॅटफॉर्म, एआय मॉडेल, क्लाउड ट्रान्सफॉर्मेशन आणि ब्लॉक चेन सेटलमेंट सिस्टीमच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी जीई डिजिटल, सिफी आणि ॲक्सेंचरसह देखील काम केले आहे. वैयक्तिक जीवनात त्यांना पर्यावरण आणि शाश्वतता तसेच वाचन यात स्वारस्य आहे.